इतस्ततः
पाणी
पाणी
ब्रेस्ट-कॅन्सरचे निदान ऐकून मनात येणाऱ्या भावनांचे हे विविध टप्पे...
...प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अनुभवलेले.
काल होते नीट, आज गमावला सूर;
भासू लागे सारे मला, धूसर धूसर
काय केला गुन्हा, आला आजार हा भाळी;
माझीयाच घरा लागे नजर का माझी ?
गमावले सुख, सारे एकाच क्षणात;
रीती झाली संध्याकाळ, तनात-मनात
मनी वाटे, सांगू नये कोणालाही काही;
आपलेच भोग, मन एकटेच साही
काढले चिमटे, तरी दु:स्वप्न तुटेना;
सैरभैर मन, कशामधेही रमेना
सख्या येती भेटायाला, सांगती अनुभव;
कोठल्या, कोणाची, एक तरी आठवण
बोलता सांगता, फेरा इतरांचा कळे;
घरटी एक माता याच्या आगीमधे जळे
।। श्री ।।
माझे काका वारले,तेव्हा ते साताऱ्याला मुलीकडे म्हणजे माझ्या चुलतबहिणीकडे होते. आणि योगायोगाने ती माझी 'जाऊ'ही लागते. माझे वडिल हयात नसल्याने माझे कन्यादान माझ्या या काका-काकूंनीच केले होते. वयस्कर, आजारी काकांनी शेवटच्या दिवसात मुलीकडे राहण्याची इच्छा प्रदर्शित केली, त्यामुळे अंतसमयी ते साताऱ्याला होते.
कळले तसे आम्ही सर्वजण साताऱ्याला जमलो. सगळे दिवस होईपर्यंत अगदी घरात घरात राहून आमची छोटी मुले सगळी कंटाळली होती. 'दिवस' झाल्यावर चुलतभाऊ त्याच्या बायकोला म्हणाला, "तू आणि वैजयन्ती सगळ्या मुलांना जरा बागेत नेऊन आणा."
।। श्री ।।
एकदा एका घरी हळदीकुंकवाला गेले असताना घरच्या बाईंनी माझी एका बाईंशी ओळख करून दिली. नांव, गांव, कुठे राहतो विचारताना लक्षात आले कि आम्ही नातेवाईकच आहोत. म्हणजे त्या बाई माझ्या चुलत आते जाऊबाईच लागत होत्या.त्याची खातरजमा झाल्यावर त्यांनी मला घरी बोलावले. त्या रहातही होत्या आमच्या घराजवळच. त्यानंतर लगेच श्रावणातल्या पूजेच्या निमित्ताने त्यांनी घरी बोलावले. मी लहान असल्याने मीच आधी त्यांच्या कडे जाणे सयुक्तिक होते.
आज बसमध्ये गर्दी नाही हे पाहून अनुने समाधानाने एक मोठ्ठा श्वास घेतला. खूप दिवसांनी असा दिवस आला होता. माणसं शोधता शोधता हल्ली जिथं माणसं नसतील अशी जागा शोधावी लागते. बऱ्याच दिवसांनी खिडकीजवळची सीट रिकामी मिळाली होती. जागा पकडून ती शांत नजरेने लहान मुलं जशी उत्सुकतेने बाहेर बघतात तशी बाहेर बघू लागली. जास्त ट्राफिक नसल्याने बसही वेगाने चालत होती. वारा केसांशी खेळत होता. छान हसली अनु. गालातल्या गालात. एकटीच.
निमित्त फक्त एका भेटीचे
परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर.
शेखर एका बड्या कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. त्याची पत्नी वासंती ही माझी मैत्रीण. लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. उभयतांना एक मुलगी आहे. संसार सुखाचा सुरू होता. निदान आम्हा मैत्रिणींना तरी असं वाटायचं. शेखरचे त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या स्त्रीशी असलेल्या अफेअरची खबर बाहेर आली. त्यातल्या सत्यतेची खात्री झाल्यावर वासंतीने त्याच्याशी बोलणं टाकलं. संसार तुटण्याच्या मार्गावर आहे.