चिमणी

चिमणी

Submitted by अरिष्टनेमि on 11 July, 2020 - 17:02

माझ्या लहानपणी सुदैवानं पोकेमॉन वगैरे जन्मले नव्हते आणि असतील तरी भारतात अवतरले नव्हते. त्यामुळं लहानपणी असंख्य सुंदर गोष्टी ऐकता आल्या, चष्मे न लागता वाचता आल्या. जवळ-जवळ सगळ्या गोष्टीत चिमणी-कावळा असायचेच अन् या गोष्टीतल्याच हजारो चिमण्या गावभर असायच्याच. अगदी कधीही दिवसभरात एक मिनीट चिमणी नाही असं नाही. बघता-बघता अचानक चिमणी हा पक्षी कधीकाळी इतका दुर्मिळ होईल असं वाटलं नव्हतं.

शब्दखुणा: 

चिमणी

Submitted by स्वप्नील रसाळ on 17 January, 2019 - 13:35

किलबिलाट सारा आज शून्य होता,
दुडदुडत्या पैंजनाचा आवाज संथ होता
कोपऱ्यातून हुंदक्याच्या आवाज आला कानी,
व्याकुळ झाला तो, पाहता रडती चिमणी

उंबऱ्यात दिसता बाबा, आता उधाण आले
भरले तुडुंब डोळे, गाली काजळ ओघळले
त्याने पसरता हात, चिमणी धावत आली
पैंजनांचे मौन तोडीत ती, बाबाला बिलगली

डोळे पुसता पुसता, त्याला हुंदक्यात बोलली
मलाही हवा शालू, चिमणी हट्टाला पेटली
मिळाला नवा शालू, नटली नवरी लाडकी
गालावर खळ पेरीत चिमणी आनंदून हसली

शब्दखुणा: 

चिमणी, चिमणी ....... अग्दी शाणी

Submitted by पुरंदरे शशांक on 30 January, 2013 - 12:09

चिव चिव चिमणी ........ ये ना राणी
अंगणात ठेवलंय ....... दाणा पाणी

का गं अशी ...... रुसल्यावाणी
खा ना जरा ..... मऊशी कणी

टिपते हळुच ....... इवली कणी
बघते कशी .... दचकल्यावाणी

चिव चिव करीत ....... गाते गाणी
उड्या मारते ....... पायावर दोन्ही

पायात बांधा ...... घुंगुर कोणी
घुंगराच्या तालावर ...... नाचेल राणी

चिमणी, चिमणी ....... अग्दी शाणी
म्मं म्मं संपली ...... पटाक्कनी

किती गं बाई ...... शोनू/मोनू/बंटी गुणी
गागू करा .... पाखरावाणी .....

Subscribe to RSS - चिमणी