नातीगोती

बापू..

Submitted by दुसरबीडकर on 12 August, 2013 - 06:47

बालपणीचा काळ खरचं सुखाचा असतो..मग ते बालपण कितीही गरिबीतले असले तरिही..आमच कुटूंब खर्या अर्थान फार मोठ्ठ होत...जवळपास वडिल धरुन सहा चुलत्यांचा विस्तार..सगळ्याच्या चुली वेगळाल्या पण बाकी कारभार सगळा एकत्र..सगळ्याच्या एका रांगेत दोन दोन खोल्या होत्या..अन बाहेर एक ऊंबराच आभाळ कवेत घेणार एक मोठ्ठ झाड..आणि त्या झाडाखाली एक बांबूची,सणकाड्यांनी शाकारलेली झोपडी असायची अन तिथे रहायचा या सगळ्या खटल्यावर लक्ष ठेवणारा 'सम्राट'..बापू..आमचे आजोबा..!!

हल्ली गावी जात नाही

Submitted by तनवीर सिद्दीकी on 6 August, 2013 - 23:09

गेल्यावर
तिच्या पाठीला कणा फुटतो
मागच्या वेळचेच जाताना हातात कोंबलेले
शंभर रुपये निघतात
धुणीभांडीची चार दिसांची सुट्टी निघते
''मी नसल्याच्या'' संप्रेरकांनी जपून ठेवलेले सण निघतात

अस्वस्थता येते

आणि
सांगायची लाज वाटते
की आई
हे बघ

या पुस्तकाच्या सातव्या पानावर तुझ दु:ख छापून आलंय

हे त्यातलेच शंभर रुपये ग
ठेव

********************
कधी कविता आणि आई
दोघांना
सांगताच आले नाही
की

''मी यासाठी शहरात आलेलो नाहीये ''
आणि

पूर्णविराम

Submitted by ashishcrane on 28 July, 2013 - 12:34

पूर्णविराम

(भाग पहिला... नेहाच्या मनातला)

"करर्र्र्र" दरवाज्याच्या आवाजासकट तो आत आला. मधुचंद्राची रात्र होती त्याची. टिव्हीमध्ये दाखवतात तसा बिछाना सजवलेला नव्हता किंवा टेबलावर दुधाचा ग्लास नव्हता. सर्वसामान्य माणसाच्या घरातला मधुचंद्र बिछान्याच्या कर्र्रर्र आवाजासकटच साजरा केला जातो.
बिछान्यावर नेहा स्तब्ध बसली होती. शवात आणि विचारांच्या भोवऱ्यात खोल बुडालेल्या माणसात फक्त श्वासाचाच फरक असतो.

शब्दखुणा: 

जीवन

Submitted by vaiju.jd on 12 July, 2013 - 14:45

॥ श्री ॥

चालता चालता पायात रुततो कधी काटा
म्हणून कां कोणी सोडून देतो चालत जाणं वाटा.

लखलखता विजेचा लोळ कधी उतरून जाळतो
सौंदर्यातला दाहकपणा त्यातूनच कळतो.

कधीतरी अडवणूक करतो कोसळणारा पाऊस
म्हणून ’पाऊस नकोच!’ असा करतं कां कोणी नवस?

मध्य़ान्हीचा तळपता सूर्य, पावलांना जाळी
पण जातं कां आयुष्य कॊणाचं बसून छपराखाली?

तापला तवा देऊन जातो चरचरीत चटका
आपसूकच पुढच्यावेळी फिरतो हात नेटका!

चुकुन फिरतं धारधार पातं लागते रक्ताची धार
म्हणून त्यावर आघात करून करत कां कोणी प्रतिकार?

प्रिय मुलास

Submitted by दाद on 5 July, 2013 - 05:37

प्रिय मुलास....

तुझी-माझी पहिली भेट... तुला आठवत नसणारचय असं गृहीत धरतेय... मी विसरूच शकले नाहीये.
तान्ह्याला पहिल्या आठेक दिवसांत कोवळ्या उन्हात न्यावं म्हणे... म्हणून मी घरातल्या गाऊनमधेच तुला घेऊन आईच्या घरी मागे अंगणात तुळशीपाशी उभी आहे. तुला मी नवीन.... पण मलाही तू नवीनच, की.
... मऊ, मवाळ उन्हाची तुझ्या कोवळ्या कायेशी सलगी होतेय असं बघत... तुला झुलवत मी काहीबाही बोलतेय, दाखवतेय. आकाश, माड, पेरूचं झाड, शेवग्यावरला ऐकू येणारा काऊ, मलाही न दिसलेली चिऊ, मधेच डोकाऊन गेलेले आबाजी, वरच्या मजल्यावरल्या भाभीनं सक्काळीच वाळत घातलेलं रंगेबीरंगी पातळ... असलच काहीबाही.

एकत्र कुटुंबाचा तिढा कसा सोडवायचा ????

Submitted by मिताली on 1 July, 2013 - 19:27

नमस्कार मायबोलीकर.

घरातल्या सगळ्या प्रकारामुळे अत्यंत अस्वस्थता आली आहे, नैराश्याच्या वाटेवर आम्ही दोघे (मी आणि नवरा) चाललो आहोत.
कुणाशी तरी बोललं तर मन हलकं होईल म्हणून इथे लिहीत आहे. जाणकार सल्ल्यांची आणि मार्गदर्शनाची गरज तर आहेच.

आमच्या लग्नाला दहा वर्षे झाली. नवरा-४० वर्षे, मी ३४ वर्षे. गेल्या ७-८ वर्षांपासून आम्ही दोघे शिक्षण, नोकरी अशा सबबींवर बाकीच्या कुटुंबापासून वेगळे राहत आहोत.आम्हाला ७ वर्षांचा एक मुलगा आहे.

गावाकडे ९ लोकांचं कुटुंब आहे.
१. सासू - ६५ वर्षे,
२. सासरे- ७२ वर्षे

पितृदिन २०१३

Submitted by संयोजक_संयुक्ता on 16 June, 2013 - 00:48

pitrudin2013 poster copy.jpg

आज १६ जून २०१३ रोजी आपण मायबोलीवर 'संयुक्ता'तर्फे पितृदिन साजरा करतोय. 'बाबा, तू मला खूप आवडतोस' हे आवर्जून सांगायचा आजचा दिवस! बाबांसाठी एक पिता म्हणून अनुभवसमृद्ध होतानाचं एक नवं वर्ष जणू आज सुरू होतंय. या निमित्ताने मायबोलीकरांसाठी खालील उपक्रम सादर करतो आहोत. दोन्ही उपक्रम आपल्याला आवडतील अशी आशा आहे.

बाबाच्या राज्यात

मुलगा वयात येताना

Submitted by संयोजक_संयुक्ता on 16 June, 2013 - 00:47

fathersday1.jpg

'राहुल वयात येतोय' हे लक्षात आल्यावर राहुलचे आई-बाबा काय करतात? त्याची मानसीताई जशी त्यावेळी जरा बावरली होती तश्या राहुललापण काही शंका, प्रश्न असतील का असा विचार एका मुलाचे पालक म्हणून त्याचे आई-बाबा करतात का ?

बाबाच्या राज्यात

Submitted by संयोजक_संयुक्ता on 16 June, 2013 - 00:47

Pitrudin2013_0.jpg

आपण लहान असताना जेव्हा आई बाहेर जायची आणि थोडावेळ घरावर आपलं आणि बाबांचं राज्य असायचं तेव्हा काय धमाल यायची आठवतंय? कधी घरीच मनसोक्त खेळणं, कधी बाबांच्या हातचे मस्त पदार्थ खाणं, कधी बाहेर जाऊन भेळ पुरी नाही तर आइसक्रीमवर ताव मारणं! अगदी वाट पाहायचो आपण त्या बाबांबरोबरच्या मजेची!

मनात घर करणारा चित्रपट : 'अनुमती'

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 15 June, 2013 - 07:55

डोळ्यांना सुखावणारं आल्हाददायी निसर्गचित्रण, श्रवणेंद्रियांना शांत करणारं मधुर पार्श्वसंगीत, मनाची पकड घेणारी व गुंतवून टाकणारी पटकथा आणि आपल्या कसदार, विलक्षण ताकदीच्या अभिनयाने हा सारा पट जिवंत करणारे, मनावर ठसा उमटवून जाणारे अभिनेते.... 'अनुमती' चित्रपटात ह्या सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात! एक संपन्न, समृद्ध अनुभव देताना तुमच्या-आमच्या मनात ही 'अनुमती' घर करून जाते हे निश्चितच!

Pages

Subscribe to RSS - नातीगोती