Submitted by संयोजक_संयुक्ता on 16 June, 2013 - 00:48

आज १६ जून २०१३ रोजी आपण मायबोलीवर 'संयुक्ता'तर्फे पितृदिन साजरा करतोय. 'बाबा, तू मला खूप आवडतोस' हे आवर्जून सांगायचा आजचा दिवस! बाबांसाठी एक पिता म्हणून अनुभवसमृद्ध होतानाचं एक नवं वर्ष जणू आज सुरू होतंय. या निमित्ताने मायबोलीकरांसाठी खालील उपक्रम सादर करतो आहोत. दोन्ही उपक्रम आपल्याला आवडतील अशी आशा आहे.
बाबाच्या राज्यात
मुलगा वयात येताना
सर्व मायबोलीकरांना 'फादर्स डे' निमित्त शुभेच्छा!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा फारच छान.
वा फारच छान.
उपक्रमाबद्दल धन्यवाद. मी
उपक्रमाबद्दल धन्यवाद. मी ४३५३१ नोडवर कर्ट कोबेनचे मित्रास पत्र ह्याचा अनुवाद लिहीला आहे तो ही पित्रुदिनासंबंधानेच आहे. मुलीबद्दल बाबाला वाट्णारा हळवेपणा मराठीत आणायचा प्रयत्न केला आहे. आपल्याला योग्य वाटल्यास ते ललित ह्या उपक्रमात सहभागी करून घ्या.
काल आमही पित्रूदिनाच्या निमित्ताने एक सिल्क चॉकोलेट खाल्ले. ढिंकाचिका!
धन्यवाद.
मामी पित्रु नाही पितृ.. काल
मामी पित्रु नाही पितृ..
काल आमही पित्रूदिनाच्या निमित्ताने एक सिल्क चॉकोलेट खाल्ले. ढिंकाचिका!
लोकसत्ता मध्ये आलेल्या एका
लोकसत्ता मध्ये आलेल्या एका लेखाचि link येथे दिलेलि चालेल का?
या वर्षीचा पितृदिन होऊन ८-१०
या वर्षीचा पितृदिन होऊन ८-१० दिवस झाले देखील! आपल्यापैकी काहींनी या दिवसाच्या निमित्ताने वडिलांना शुभेच्छा दिल्या असतील, खास संवाद साधला असेल किंवा एकत्र येऊन एखादी आवडीची गोष्ट केली असेल. बर्याच मायबोलीकर बाबांना त्यांच्या चिमुकल्यांकडून गोड पत्रे, शुभेच्छा, फुले असेही मिळाले असेल. यंदा मायबोलीवर आपण पितृदिनाच्या निमित्ताने 'बाबाच्या राज्यात' व 'मुलगा वयात येताना' या विषयांवर चर्चा केली.
आपापल्या बाबांच्या राज्यातले अनुभव लिहिताना मायबोलीकरांनी अगदी मनापासून बाबांबद्दलच्या, त्या काळातल्या हृद्य आठवणी लिहिल्या. त्या निमित्ताने वडील-मुलांमधले गहिरे नाते अधोरेखीत झाले. हा उपक्रम सादर करताना सध्या वडिलांच्या भूमिकेत असलेल्या मायबोलीकरांकडून त्यांच्या स्वतःच्या राज्यातले अनुभव, मुलांबरोबर एक दिवस किंवा जास्त काळ घालवताना आलेल्या अडचणी, गमती याबद्दल लिहिणे अपेक्षित होते. तसे अनुभव मात्र वाचायला मिळाले नाहीत.
मुलगा वयात येताना या विषयावर चांगली चर्चा झाली, बरेच महत्त्वाचे मुद्दे समोर आले. मुलांकरता या अडनिड्या वयात लैंगिक शिक्षणाचे महत्त्व, आईवडीलांशी सुसंवाद असण्याचे महत्त्व व योग्य वेळी योग्य माहिती योग्य प्रकारे मुलापर्यंत पोचण्याचे महत्त्व हे सर्व मुद्दे चर्चेत आले. ज्यांची मुले आता या वयोगटात आहेत / जाणार आहेत त्यांना त्या दिशेने पाऊल उचलणे किती आवश्यक आहे याची जाणीव होणे किंवा जाणीव असेलच ती अधोरेखीत होणे हा या उपक्रमामागचा विचार होता.
या दोन्ही विषयांवर आपण अजूनही चर्चा करू शकतो, नवे व आवश्यक मुद्दे जितके येतील तितके हवेच आहेत व त्यावर सांगोपांग चर्चा होणेही आपल्या सर्वांच्या हिताचेच आहे. आतापर्यंत या उपक्रमामध्ये आपले विचार मांडणार्या, प्रतिक्रिया देणार्या सर्व मायबोलीकरांचे आभार!