Submitted by vaiju.jd on 12 July, 2013 - 14:45 ॥ श्री ॥ चालता चालता पायात रुततो कधी काटाम्हणून कां कोणी सोडून देतो चालत जाणं वाटा. लखलखता विजेचा लोळ कधी उतरून जाळतोसौंदर्यातला दाहकपणा त्यातूनच कळतो. कधीतरी अडवणूक करतो कोसळणारा पाऊसम्हणून ’पाऊस नकोच!’ असा करतं कां कोणी नवस? मध्य़ान्हीचा तळपता सूर्य, पावलांना जाळीपण जातं कां आयुष्य कॊणाचं बसून छपराखाली? तापला तवा देऊन जातो चरचरीत चटकाआपसूकच पुढच्यावेळी फिरतो हात नेटका! चुकुन फिरतं धारधार पातं लागते रक्ताची धारम्हणून त्यावर आघात करून करत कां कोणी प्रतिकार? नेमक्या वेळी हातातून सुटून जाते सुईचडफडतो तरी शोधतो आपण वेळेवर कामास येई. सोडतो कां आपण हे सारे, घेतो नां मिळतं जुळतं?कारण हेच जीवन आहे, हे आपल्याला कळतं मग, माणसासारखी माणसे, अडतील, पडतील, चुकतील.दुखवलं तरी हवीच ती, सोडता कशी येतील? विषय: काव्यलेखननातीगोतीGroups audience: मायबोलीवर स्वागतगुलमोहर - कवितागुलमोहर - ललितलेखनGroup content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail मग, माणसासारखी माणसे, अडतील, मग, माणसासारखी माणसे, अडतील, पडतील, चुकतील. दुखवलं तरी हवीच ती, सोडता कशी येतील? >>> छान !!! Submitted by पियू on 25 July, 2014 - 02:06 Log in or register to post comments
मग, माणसासारखी माणसे, अडतील, मग, माणसासारखी माणसे, अडतील, पडतील, चुकतील. दुखवलं तरी हवीच ती, सोडता कशी येतील? >>> छान !!! Submitted by पियू on 25 July, 2014 - 02:06 Log in or register to post comments
मग, माणसासारखी माणसे, अडतील,
मग, माणसासारखी माणसे, अडतील, पडतील, चुकतील.
दुखवलं तरी हवीच ती, सोडता कशी येतील?
>>>
छान !!!