एक सॉरी
बसमधून उतरता उतरता तो बोलला.
"सॉरी. माफ करा. जे काही झाले ते मुद्दाम नाही केले मी."
"सगळेच पुरुष सारखेच तुम्ही. बेशरम! बाई दिसले की आले लांडगे धावत!"
हे काल घडले.
"अहो सौभाग्यवती. लक्ष कुठे आहे तुमचे? इतक्या कुठे रमलात तुम्ही?" अजितने हलवून विचारले.
"काही नाही हो. असंच बसले होते शांत." मी उगाच म्हटले त्याला तसे आणि विषय टाळला.
आता यांना कसे सांगू की, माझ्या मनात काय चाललंय ते.समजून घेतील का ते?
'बायकोचा मित्र आणि नवऱ्याची मैत्रीण' हि दोन असून नसलेली नाती आहेत; ज्यांना कधीच समाज मान्य करत नाही. समाजच काय तर? आपणही कधी मान्य करत नाही; करणार नाही.