कोठून?

Submitted by ashishcrane on 26 March, 2013 - 06:57

किरणं कोवळी कोवळी,
पाहती आभाळी पोटुन,
त्वरा आली हि पहाट,
पदर शोधू रे कोठून?

रात काल जगले मी प्रीतीची,
दृष्ट पारधी तू .....घेतले सावज गाठून,
क्षण धावती बेधुंद त्या वाऱ्याच्या पाठून,
थांबेल मजसंगे....वेळ अशी...आणू रे कोठून?

पापणीला बजावले,"तू मिटायचे नाही,
त्या मिठीतून आज मज सुटायचे नाही"
अशी वेडीपिशी झाले...केस मोकळे सोडून,
सांग...तो शहारा जादूचा...तू आणला कोठून?

ओढ इतकी भाभडी...मज शांत राहावे ना बोलून,
स्पर्श प्रीतीचा तुला असा भेटला कोठून?
काल हिंडले तुझ्यात....पण थकले शोधून,
तुझ्या गंधाचं अत्तर...सांग....मज मिळेल कोठून?

तू जाणतो मनातले....कसे पाहिलेस अंधारातून?
उसास्से माझ्यातले.....तू शोधले कोठून?
चोरलीस तू माझी छाया...राती जागून जागून....
तुझ्यातून स्वतःला....शोधू कशी रे कोठून?

--आशिष राणे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users