मला आणले जेथे ते स्मशान होते
कळले शरीर माझे गतप्राण होते
चौथऱ्यावर होती चिता मांडलेली
प्रेत माझे ज्यावर जणू सामान होते
दक्षिण दिशेस होती मांडली पिंडे
कावळे झाडावर का सावधान होते
सोपस्कार सर्व उरलेले पूर्ण झाले
शरीरास नमुन लोकांचे प्रस्थान होते
दुःखात काही,ओठांवर काही स्मित
जाणे काय मना त्यांच्या अवधान होते
पेटली शेवटी ती चिता जी होती शांत
शेवटचा पाश तुटला ,वर अस्मान होते
गुरुवार , २८/०३/२०२४ , ०१:४८ PM
अजय सरदेसाई (मेघ )
हे झाल कि ते अन ते झाल की हे,
एकाच मातीत एकावर एक......
असे कित्येक मढे जळतात,
रोज त्याच त्याचं स्मशानात.......
लाकडावर मनसोक्त झोपतात,
शांततेच कफन पांघरतात.......
कानांना अगदी घट्ट बंद करतात,
आक्रोशाला जणू नजरअंदाज करतात......
होते शरीराची राख,
उरतात कधी एकास दोन हाडे.....
यतो आक्रोशाचा लोंढा,
वाहून जाते राखेखालची मातीही त्यात.....
सुन्न होतो आश्रुंचा पूर,
डूबतात त्यात आठवनींच्या नावा....
कावळ्याने शिवता पिंडाला,
संपत त्याच अस्तित्व अन विरुन जातात आठवनींच्या ठेवा...
आज मी स्मशानात आलो जाऊन ....
पाहिले थोडा वेळ....मी त्या मुडद्यांत राहून....
शांत वाटले त्यातले काही ...
पाहिले काहींना मरूनही...इच्छांसाठी अजूनही जिवंत पाहून....
काही देह....तेथे हि हसरे होते....
जितके मिळाले त्यातच सुख त्यांचे..मागणे ना अजुनी कसले होते....
सज्जनाच्या बाजूला देह एका दुर्जणाचाही होता....
काही फरक न दिसला मजला त्यांत...दोघेही जळतच होते....
काहींच्या ओठी काळजी मुलाबाळांची होती,
काहींच्या ओठी....गाणी रडकी....भूतकाळाची होती,
काहींच्या मनी अजूनही......न सुटलेले हिशोब होते,
दहाच बोटे हाताची....तरी पुन्हा तीच तीच ते मोजत होते....