जायचे अजून फार दूर...
जायचे अजून फार दूर
जगणे तिथे असेल गं...
वाट दाट सावली
काट पाऊली फसेल गं
कोस मैल चाललो
न थांबता मी दौडलो
चढण ही अशी जशी
धराच घातली पालथी
दमलो जिथे तिथे आता
विसावा मीच शोधतो
वळणावर आंधळया अशा
फिरल्याच पार त्या दिशा
कधी कसा कुठे आता
मीच मजला न कळे
तिथे तुझीच साथ गं
शोधण्यात गुंतलो....
बेट ते तिथे दिसे
शीड घेतले तसे
किनारी मी उभा आणि
काठ सागरात शोधतो
जायचे अजून फार दूर
जगणे तिथे असेल गं...
रोहित गद्रे ,१८/०२/२०१३.