Submitted by santosh watpade on 25 February, 2013 - 10:11
का साळुंकी दारावरती ओरडते ही मला ठाव ना,
का थांबल्या डोळ्यावरती आज अनावर भावना...
माहेराचे कुणी अजुनही आले नाही फ़ार दिसाचे,
हे आभाळा आता एकदा आईचा चेहरा दाव ना....
लागे उचकी ठसक्यासरशी सय कुणाची येत असे,
दादा पडला गुडघ्यावरती हळद त्याला लाव ना....
रोज दिसे ते झाडावरती घरटे भरले कबुतरांचे,
एकटीच मी दुर कशी मज दिसेच माझा गाव ना...
घरात सारी भरुन इथेही नातीमाती आपुलकीची,
तरी उरातुन आजही पुसले माहेराचे नाव ना.....
सांज होता माळावरती बसुन रहावे असे वाटते,
वाट जरी ती रोजंच दिसते सरली माझी हाव ना....
कधी कावळा परसामध्ये ओरडला की धावतेच मी,
असेल दारामधे कुणी जर माहेराचा भला पावना...
राती सरती दिवसही सरते सणासुदीची वाट पहाते,
साळुंकीला मीच सांगते जा बाबांना बोलाव ना....जा बाबांना बोलाव ना
-- संतोष वाटपाडे (नासिक)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संतोष हे स्त्रीचे नाव असते का
संतोष हे स्त्रीचे नाव असते का ? कवितेवरून प्रश्न पडला
असो
वाटपाडे आडनाव आवडले
स्वागत मायबोलीवर
शुभेच्छा
काव्य छानच आहे
संतोषजी , खूपच आवडली कविता
संतोषजी ,
खूपच आवडली कविता .
स्वागत !
(वैवकु यांचा वरील प्रतिसाद गंमत म्हणून स्विकारा .)
"सांज होता माळावरती बसुन
"सांज होता माळावरती बसुन रहावे असे वाटते,
वाट जरी ती रोजंच दिसते सरली माझी हाव ना...." >>> .... छान
छान सुरुवात .
छान सुरुवात .