प्रकाशचित्रण

कोकणातला दशावतार अर्थात धयकालो...

Submitted by गिरीविहार on 31 December, 2014 - 05:57

बर्याच वर्षांनी ग्रामदेवता सातेरीच्या वार्षिक उत्सवाच्या निमित्तने कोकणात जाणे झाले...त्या वेळी काढलेले काही प्रचि....

उत्सवाच्या निमिताने सजलेला देऊळ परीसर...
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३
उत्सवाचा निमित्तने सजलेले देवीचे वारुळ....

कोकण फ्रेश !

Submitted by Yo.Rocks on 28 December, 2014 - 05:59

नेहमीच्या दिनक्रमाला कंटाळला असाल तर कुठे तरी शांत निवांत जागी जावून यावेसे वाटते.. आता अश्या ठिकाणी जायचे म्हणजे माझ्यासाठी दोनच पर्याय... एक तर सह्याद्रीच्या कुशीत नाही तर कोकणच्या कुशीत.. मग दोन दिवस का होइना.. तुमचे मन फ्रेश झालेच समजा !!!

प्रचि १ . सुप्रभात !

प्रचि २ :

जॉर्डन - एक सुंदर देश

Submitted by कंसराज on 26 December, 2014 - 20:20

नोव्हेबंर मधे जॉर्डनला कामानिमित्त जाण्याचा योग आला. तेथे काढलेले फोटो देत आहे.

अम्मान येथे ईंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. भारतीयांना व्हिजा ऑन अरायव्हल मिळू शकतो.

अम्मान सिटाडेल (कला)
१.

शब्दखुणा: 

स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कास्टन

Submitted by kulu on 26 December, 2014 - 06:29

उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला जाण्याचा योग आला. तिथे राहुन टुरिस्टांचा एक आणि स्विस लोकांचा एक, अशी स्वित्झर्लंड ची दोन्ही सुंदर रुपं पहायला मिळाली. मुळात दिनेशकडुन खुप ऐकलं होतं. त्यामुळे बघायची खुप उत्सुकता होतीच. पण मी बैठ्या प्रकृतीचा (आळशी म्हटलं तरी चालेल) असल्याने आयती संधी आल्याशिवाय कुठेही जाणं जमत नाही Proud सुदैवाने माझी घरमालकीण मार्था ही भटक्या प्रवृत्तीची असल्याने तिने पुर्ण स्वित्झर्लंड पालथा घातला आहे.

शब्दखुणा: 

Ice Kingdom, Winter Wonderland...

Submitted by सेनापती... on 24 December, 2014 - 17:00

लंडनमधल्या हाईड पार्क येथे दरवर्षी नाताळ निमित्त 'विंटर वंडरलँड' म्हणजे जत्रा भरते. वेगवेगळे खेळ, राईड्स आणि खाण्या-पिण्याची धमाल. सर्वात जास्त आवडले ते 'आईस किंगडम.' सर्व बर्फमय असल्याने तापमान -६° इतके होते. कूठे भव्य तर कूठे बारकाईने केलेले नाजूक काम. कलाकारांना दाद द्यावी तेवढी कमीच.

Kew Royal Botanical Garden...

Submitted by सेनापती... on 23 December, 2014 - 09:28

गेल्या आठवड्यात लंडनमधील Kew Royal Botanical Garden ला भेट दिली. त्यावेळी टिपलेली काही क्षणचित्रे.

Kew Garden ची स्थापना १८४० मध्ये झालेली असली तरी १७७२ पासूनच इथे जगभरातून झाडे आणणे आणि रूजवणे सुरु झाले होते. हे आता जगातले सर्वात मोठे, सर्वात जूने बोटॅनिकल गार्डन असून ३०,००० पेक्षा अधिक विविध प्रजाती सांभाळल्या आहेत. खाली दिलेल्या प्रकाशचित्रांमधील झाडे १५०-२०० वर्ष जूनी आहेत.

२००३ साली Kew Garden ला यूनेस्को वर्ड हेरिटेज साईटचा दर्जा लाभलेला आहे. लंडनला येणार्‍या प्रत्येकाने Kew Garden ला आवर्जून भेट नक्की द्यावी असे हे ठिकाण.

शब्दखुणा: 

धोडप ते सप्तश्रुंगी

Submitted by Yo.Rocks on 21 December, 2014 - 21:01

क्षणात दिसून जाशी क्षणात लपून.. असाच काहीतरी खेळ सुरु होता.. ढगांच्या महासागरात सारा आसमंत बुडालेला.. पाच फुटापलिकडे काही दिसत नाही असे म्हणेस्तोवार बेफाम वारा येउन थैमान घालायचा नि क्षणात ढगाचा पडदा दूर लोटून भवतालाचा नजारा दिसायचा.. अगदी मंद धुंद वातावरण.. 'धोडप' च्या "रेलिंगबंद" अशा भिंती वरुन चालताना ह्या वातावरणाचा आस्वाद घेत होतो.. मग तो ढगांच्या अभिषेकात न्हाहून गेलेला धोडपचा माथा असो वा निसर्गाचा आविष्कार समजली जाणारी 'डाईक' भिंत असो !

ऑस्ट्रेलियातील आमचे पक्षीजगत

Submitted by सुमुक्ता on 17 December, 2014 - 13:27

लग्न होऊन पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया ला गेले तेव्हा सगळच नवीन होते. नवीन संसार, नवीन देश, भाषा नवीन नसली तरी उच्चारण ऐकले की "आपल्याला नक्की इंग्रजी येत ना?" अशी शंका यायची. तिथे गेल्या गेल्या जाणवलेली आणि आवडलेली गोष्ट म्हणजे आमच्या घराच्या आसपास कायम विविध प्रकारचे पक्षी यायचे!!! घराला छान गच्ची असल्यामुळे पक्षीनिरीक्षण करण्यात तासन तास अगदी मजेत वेळ जात होता. जेव्हा नोकरी करत नव्हते तेव्हा घरात कधी एकटेपणा जाणवला नाही, तो ह्याच पक्ष्यांमुळे. मला खरतरं पक्षीनिरीक्षणाचा विशेष अनुभव नाही. भारतात असताना एक-दोनदा मित्रमैत्रिणींच्या आग्रहाखातर अग्निपंख (flemingos) बघायला भिगवण जवळ जाऊन आले होते.

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण