Kew Royal Botanical Garden...

Submitted by सेनापती... on 23 December, 2014 - 09:28

गेल्या आठवड्यात लंडनमधील Kew Royal Botanical Garden ला भेट दिली. त्यावेळी टिपलेली काही क्षणचित्रे.

Kew Garden ची स्थापना १८४० मध्ये झालेली असली तरी १७७२ पासूनच इथे जगभरातून झाडे आणणे आणि रूजवणे सुरु झाले होते. हे आता जगातले सर्वात मोठे, सर्वात जूने बोटॅनिकल गार्डन असून ३०,००० पेक्षा अधिक विविध प्रजाती सांभाळल्या आहेत. खाली दिलेल्या प्रकाशचित्रांमधील झाडे १५०-२०० वर्ष जूनी आहेत.

२००३ साली Kew Garden ला यूनेस्को वर्ड हेरिटेज साईटचा दर्जा लाभलेला आहे. लंडनला येणार्‍या प्रत्येकाने Kew Garden ला आवर्जून भेट नक्की द्यावी असे हे ठिकाण.

१. बर्फाची चाहूल...

२.

३. ओक ट्री...

४. स्वीट चेस्टनट ट्री...

५. सुर्यदेवाचे आगमन...

६. Xylem Phloem of Tree... शाळेत शिकलोय हे आपण.

7. ईटूकला पिटूकला रॉबीन... अगदी जवळच बसला होता मस्तपैकी.

८. कॉमन हॉली ट्री...

९. Made from Willow (मराठी शब्द?)

१०.

११.

>

१२.

१३. Kew Palace...

14.

15. स्टोन पाईन ट्री...

१६.

दरवर्षी पर्यटकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी इथे नाताळचे आयोजन केलेले असते. नेहमी ४ वाजता बंद होणारे गार्डन संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत रोषणाईकरिता खूले केलेले असते. अर्थात ह्यास टिकिट असते.

१७.

१८.

१९. जॅपनीज पॅगोडा ट्री... हे झाड इथे १७६० साली आणले गेले. इथे अधिक माहिती आहे. आडवे वाढलेल्या ह्या झाडाला ४-५ ठिकाणी आधार देउन संरक्षीत केलेले आहे.

२०.

२१.

२२.

२३.

२४.

ज्यांना झाडे, निसर्ग अश्या बाबींमध्ये आवड आहे त्यांना एक दिवस पूरत नाही. त्यामूळे इथे पुन्हा जाणे होणार आहे हे नक्की. ४ वेगवेगळ्या ऋतूंमध्ये किमान ४ वेळा तरी जावेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.. पण अजून फोटो हवे होते. ( मला यायला जमेपर्यंत निदान फोटो तरी बघून घेईन. )

विलो ला मराठी नाव नाही पण क्रिकेटच्या बॅटी Happy आणि डोकेदुखीवरचे औषध दोन्हीसाठी वापर होतो.

अजून आहेत तसे बरेच फोटो पण निवडकच टाकलेत इथे. शिवाय यात ईंडोर हाउसेसचे फोटो नाहीयेत. Sad

तिथे प्रिंस ऑफ वेल्स ग्रीन हाउस मध्ये आंबा, नारळ , फणस पासून सर्व झाडे लावली आहेत. Happy
कार्नीव्होरस प्लान्ट्सचा एक वेगळा मोठा सेक्शन आहे.

सुंदर फोटो आहेत! झाडांवर लाइट्सचे इफेक्ट्स सही दिसताहेत.

विलो (Salix) म्हणजे वाळुंज्याचं झाड.

सगळेच फोटो मस्त...विशेषतः २३वा...

एक शंका...

५. सुर्यदेवाची आगमन... इथे सुर्यदेवाचे आगमन, असे हवे होते का?

मी शेवटच्या बाकावरचा विद्यार्थी असल्याने, शंका फार आणि व्याकरणाची बोंबाबोंब...चूक झाली असल्यास क्षमा करावी.

मस्तच रे सेना !
सहावा आणि दहावा खासच आले आहेत . पंधराव्या प्रचित ते झाड तसेच आहे की वार्‍यामुळे हेलकावे घेतानाचा फोटो आहे?

सेनापती

खुपच छान फोटो आहेत, मस्तच!! तुम्ही गेलात तेव्हा छान ऊन मिळाले आहे.

४ वेगवेगळ्या ऋतूंमध्ये किमान ४ वेळा तरी जावेच>> एकदम खरे !!

मी पण प्लान करते Happy

सर्वांना धन्यवाद.

जयंत, चूक दूरूस्त केलेली आहे. Happy

कांदेपोहे, माझे पक्ष्यांबद्द्लचे ज्ञान त्रोटक आहे पण हा पक्षी रॉबीन आहे याची खात्री आहे. Happy

विशाल, झाडच तसे आहे. Happy

गूलमोहर, नक्की जाउन या. Happy काही झाडे १२ महिने सदाहरीत असतात. Happy