प्रकाशचित्रण

घोगल्याफोड्या करकोचा/Asian Open bill Stork

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 16 December, 2014 - 02:55

आमच्या घराच्या मागे एक शेत आहे. त्या शेतात जवळ जवळ ऑक्टोबर पर्यंत काही प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले असते. त्यामुळे तिथे भरपूर हिरवळ आहे. ह्या पाण्यासाठी अनेक पक्षी तिथे विहार करतात. ऑक्टोबर मध्ये हा घोगलफोड्या करकोचा पक्षी अचानक सकाळी दृष्टीस पडला. पाण्यातील किटक वा छोटे मासे यांच्यासाठी त्याचा संथगतीने शोध चालू होता. एक एक पाऊल आवज न करता टाकत सावध गतीने आपली शिकार जाऊ नये यासाठी त्याची संथ धडपण चालू होती आणि माझी तशीच संथ धडपण त्याचे फोटो काढण्यासाठी चालू होती.

शब्दखुणा: 

खग ही जाने खग की भाषा - भाग ४

Submitted by कांदापोहे on 16 December, 2014 - 00:16

गेली काही वर्ष पक्षीनिरीक्षण करताना मिळालेले निवडक पक्षी मायबोलीवर प्रकाशचित्रणात डकवावेसे वाटत होते पण लिमीटेड नेट व इथे प्रकाशचित्र देणे हे सोप्पे काम नोहे हे कळुन चुकल्यामुळे केलेला कंटाळा यामुळे ते जमत नव्हते. इथे २० च्या वर प्रकाशचित्र टाकणार्‍या सर्व छायाचित्रकारांना हॅटस ऑफ. Happy

याआधीचे काही प्रयत्न खाली बघता येतील. Happy

उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 1 इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 2 इथे http://www.maayboli.com/node/32865 बघता येईल.

शब्दखुणा: 

'फ फोटोचा' २०१४ आणि 'द फोटो सागा' २०१४

Submitted by सावली on 15 December, 2014 - 00:23

नमस्कार,

फोटो सर्कल सोसायटी, ठाणे गेले दोन वर्ष फोटोग्राफीला वाहीलेला मराठी दिवाळी अंक 'फ फोटोचा' प्रकाशित करत आहे. २०१४ हे या दिवाळी अंकाचे तिसरे वर्ष. दरवर्षी या अंकाचे प्रकाशन ठाणे महापौर चषक स्पर्धेच्या बक्षिस समारंभाच्या दिवशी ठाणे महापौरांच्या हस्ते होते. ( यावर्षी निवडणुकांच्या कारणास्तव बक्षिस समारंभ उशिरा झाला आणि त्यामुळे या अंकाचे प्रकाशनही आम्ही दिवाळीत करु शकलो नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत)

गुडमॉर्निंग फुले.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 December, 2014 - 06:12

सगळ्यांना फुलांद्वारे सुप्रभात करावे ह्या उद्देश्याने सकाळी बाहेर फोटो काढायला जाते तेंव्हा मलाच सगळी फुले गुड मॉर्निंग करतात असे वाटते. फार प्रसन्न वाटते सकाळी ह्या फुलांचे दर्शन घेताना. हे फोटो आत्पजनांना वॉट्स अ‍ॅपवर सुप्रभात करण्याच्या उद्देशाने मोबाईलवरून काढलेले आहेत. सर्व माबोकरांनाही ह्या फुलांद्वारे शुभेच्छा.

1) शेडींगचा गुलाब

शब्दखुणा: 

दत्त जयंती सोहळा - २०१४

Submitted by विश्या on 9 December, 2014 - 02:53

दत्त जयंती सोहळा - २०१४
sane गुरुजी वसाहत - कोल्हापूर

हा सोहळा दर वर्षी माझ्या मामाच्या घरी असतो .
त्यांच्या घरी मूळ गादी असल्यामुळे तो त्यांच्या नवीन घरी केला जातो पूर्वी हाच सोहळा भुई गल्ली येथे असायचा जुन्या घरी .

सकाळी भल्या पहाटे पहाटे दत्तांच्या गाण्यांनी सुरवात होते . दिवसभर उपवास असतो घराच्या सगळ्यांचा (मी सोडून ) पूजा मांडणीसाठी लागणारे साहित्य (फुलांचे decoratiaon करणार असल्यामुळे ,
वेग वेगळी फुले , विविध रंगाची चकमक , स्पंज, ई.) याचा वापर करून पूजा बान्दलि जाते
3.JPG
(पिक -१)

शब्दखुणा: 

देव भूमी ........भाग-०३

Submitted by manas on 8 December, 2014 - 04:40

भाग -०२ http://www.maayboli.com/node/51792
देव भूमी.....भाग-०३
पुढे दुपारी जेवन करून मुन्नारच्या दिशेने जाताना वाटेत एका मसाल्याच्या खेड्याला (बागेला) भेट देऊन केरळचे प्रसिध्द असे मसाले खरेदी करण्याचा आनंद घेतला....त्याच बरोबर केरळच्या अप्रतिम सौंदर्याचा आनंद घेत-घेत मुन्नारच्या दिशेने मार्गक्रमण केले........ रात्रीचा मुक्काम मुन्नार येथे एका प्रशस्त अशा हॉटेलवर केला....

प्रचि--- २३(काळी मिरी...)

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण