देव भूमी ........भाग-०३

Submitted by manas on 8 December, 2014 - 04:40

भाग -०२ http://www.maayboli.com/node/51792
देव भूमी.....भाग-०३
पुढे दुपारी जेवन करून मुन्नारच्या दिशेने जाताना वाटेत एका मसाल्याच्या खेड्याला (बागेला) भेट देऊन केरळचे प्रसिध्द असे मसाले खरेदी करण्याचा आनंद घेतला....त्याच बरोबर केरळच्या अप्रतिम सौंदर्याचा आनंद घेत-घेत मुन्नारच्या दिशेने मार्गक्रमण केले........ रात्रीचा मुक्काम मुन्नार येथे एका प्रशस्त अशा हॉटेलवर केला....

प्रचि--- २३(काळी मिरी...)

प्रचि--- २४ (वेलची...)

प्रचि--- २५ (कोको...या पासून चॉकलेट बनवतात..)

प्रचि--- २६ (लेड पिंपळी..... खोकल्यासाठी वापर होतो )

प्रचि--- २७

पाचवा दिवस.... मुन्नार हे थंड हवेचे ठिकाण असून ते जवळ-जवळ 6हजार फुट उंचीवर आहे.... तिकडे वर्षभर इतकी थंडी असते कि.... हॉटेल मध्ये कोणत्याच खोलीत साधा पंखा सुध्दा जोडण्याची गरजचं भासत नाही...त्यामुळे मला कुठेच पंखा दिसून आला नाही.......
मुन्नार मध्ये प्रसिध्द असणा-या मत्तूपट्टी डॅम मधील सकाळच्या धुक्यात 'स्पीड बोट राईड' ही एक अविस्मरणीय राईड ठरली...

प्रचि--- २८ (मत्तूपट्टी डॅम)

प्रचि--- २९ (मत्तूपट्टी डॅम)

त्यानंतर केरळमधील एका Eco Point ला भेट दिली, या Eco Point चे खास वैशिष्ट म्हणजे इतर Eco Point प्रमाणे हा उंचावर नाही.. तर..समुद्र सपाटीला आहे...

प्रचि--- ३० ()

त्यानंतर केरळचे खास वैशिष्ठ असणा-या चहाच्या मळ्यात जरा फोटोग्राफी केली....

प्रचि--- ३१ ()

प्रचि--- ३२

प्रचि--- ३३

दुपारच्या सत्रात एरणाकुलम (राजमलाई) नॅशनल पार्कला भेट होती.... त्यासाठी मोठ्या बस किंवा मिनी बसने न जाता केरळधील स्थानिक जीप ने जाण्याची व्यवस्था केली होती. हॉटेल पासून 20-25 मिटांचा प्रवास करून नॅशनल पार्कच्या प्रवेद्वाराजवळ जावे लागते. तिथून पुढे पार्कच्या गाड्या वापराव्या लागतात. मिनी बस आहेत, त्या बस मधून अर्धे अंतर पार करावे लागते.परंतू रस्ता इतका अरूंद आणि वळणाचा आहे कि,आपण आपला ड्राव्हर नेला असता तर परत आलो असतो कि, नाही अशि मनात शंका येऊन गेली ........
तिथून पुढे अर्ध्या-पाऊन तासाचा ट्रेक करावा लागतो..... तो ट्रेक करत-करत वरती चढताना आपण कधी 8000 फुटावर येऊन पोहचतो हे समजत नाही.... आणि हा सगळा खटाटोप कशासाठी तर एक शेळी पाहण्यासाठी ….. कारण ती आहेच खास..... “ निलगिरी थार ” अस नाव आहे तिचं, ही शेळी जंगली शेळी म्हणून सुध्दा ओळखली जाते. अस मानल जात कि,जगात या व्यतिरिक्त ही इतरत्र कुठेही आढळून येत नाही. डोंगराच्या उभ्या कातळावर सुध्दा ही लिलया वावरत असते. आमच्या आगोदर सकाळी जो ग्रुप वर गेला होता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं कि, वरती काहीही नाही. इतकी उठाठेव करून काहीही पहायला मिळाले नाही....... परंतू आमचं नशिब चांगल असल्यामुळे या शेळीचा अख्खा कळपच आम्हाला पहायला मिळाला......

प्रचि--- ३४

प्रचि--- ३५

रात्रीचा मुक्काम कोचिन.....
सहावा दिवस....सहाव्या दिवशी कोचिन मधील स्थानिक सेंन्ट फ्रान्सीस चर्चला भेट दिली... असं मानला जात कि, हे भारतातील पहिलं चर्च आहे... येथे वास्कोदी गामाला दफन करण्यात आले होते... परंतू नंतर त्याच्या मुलाने त्याची दफनपेटी आपल्या देशात नेली, आत्ता फक्त चर्च शिल्लक आहे. ....त्यानंतर ज्यु लोकांचे उपासनास्थानाला भेट तसेच डच पॅलेसला भेट देऊन हर्बर क्रुझ राईड करत-करत चायनिज फिशिंग नेट पाहून पुन्हा हॅाटेल वर परत आलो. संध्याकाळी खरेदीसाठी वेळ देण्यात आला होता....

प्रचि--- ३६ (सेंन्ट फ्रान्सीस चर्च)

प्रचि--- ३७ (चायनिज फिशिंग नेट)

कोचिनमध्ये खास केरळी पध्दतीचे कपडे विशेषकरून साड्या अगदी उत्तम मिळतात.... कोचिनला फक्त कपड्याचे मोठ-मोठे मॅाल आहेत...तसेच तिकडे केळ्याचे चिप्स खुप छान मिळतात..... तिकडचे चिप्स खुप छान आहेत.... बरीचशी खरेदी केली.......
सातव्या दिवशी...... कोचिन एयरपोर्टसाठी प्रस्थान...........(आयुष्यातला पहिला विमान प्रवास.......)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर फोटोज ...
चायनीज फिशींग नेट्स पाहायला संध्याकाळच्या वेळी जायचे, मस्त सुर्यास्ताची पार्श्वभूमी असते Happy