तिस-या दिवशी.... सकाळी लवकर पेरीयार साठी प्रस्थान करावयाचे होते.... प्रवासात मध्येच प्रसिध्द अशी केरळची शान असणारी अल्लापल्ली ते निडूमुडी अशी तेरा किमी लांबीची बॅक वॉटर राईड केली...अल्लापल्ली येथून बस सोडून राईड बोट मध्ये बसून राईड सुरू झाली मध्यंतरी एका ठिकाणी एका छोट्याशा हॉटेलवर केरळातील पारंपारीक पध्दतीचे जेवण केले...... आणि पुन्हा राईड सुरू झाली ती निडुमुडीच्या दिशेना.... या प्रवासात केरळला देवभूमी असे का म्हणतात? याचा प्रत्यय येतो.... या राईड मध्ये आपण राष्ट्रीय जल मार्ग क्र.03 ने 13 किमी चा प्रवास करतो.... हा प्रवास म्हणजे एक अप्रतिम आणि अविस्मरणिय प्रवास आहे.....
आजकालच्या जमान्यात लंडनला जाण्याची " अपूर्वाई " पहिल्यासारखी रहिली नसली तरी ही भारतीय मनाला अ़जूनही लंडनचे आकर्षण वाटतेच. अलीकडेच मला लंडनला जायची संधी मिळाली. लंडन वर आजपर्यंत भरपूर मान्यवरांनी लिहीले आहे, आपल्यासारख्या एका अति सामान्य बाईने त्यात आणखी कशाला भर घालावी ह्या विचारात काही दिवस गेले. पण मला लंडन खूप आवडले आणि शेवटी " असेल राजहंसाची चाल डौलदार पण म्हणून कावळ्याने चालूच नये की काय? " ह्या विचाराने गारुड केले आणि म्हणून हा लेखन प्रपंच.
साळूंक्या, चिमण्या आणि कबुतराची ही गम्मत बघा. ही गम्मत मी डिसीच्या रस्त्यावर टिपली आहे:
रस्त्यावर काही चिमण्यांना टिश्यू पेपरमधे गुंडाळलेले मास सापडते आणि त्या चिवचिवत ते मास टिश्यू पेपरमधून बाहेर काढतात आणि चिमण्यांचा गलका वाढतच जातो:
इतक्यात तिथे साळू़यांचा एक थवा उतरतो आणि चिमण्यांना उडवून लावतो:
माझं समुद्राचं वेड, त्याच्याशी असलेलं नातं तसं खुप जुनं आहे. अगदी सातवी आठवीत असल्यापासुनचं. अगदी सुरुवाती-सुरुवातीला, सकाळच्या वेळी समुद्राच्या कुशीतून हळुवारपणे वर येणार्या किंवा त्याच्या मिठीत सामावून जाणार्या, मालवणार्या दिनकराचे दर्शन हा खरेतर मुळ हेतु असायचा. आणि मग एकदा का सुर्योदय अथवा सुर्यास्त होवून गेला की तेव्हा कुठे त्या समुद्राकडे लक्ष जायचे....
मेणबत्तीचे झाड
ऋतू पावसाळा.सप्टेंबरचे अखेरचे दिवस.आजूबाजूला हिरवळ आणि फुलांची रेलचेल.रस्ता आम्हा दोघांचा नेहमीचाच २६ वर्ष जाण्यायेण्याचा.पण त्यादिवशी एक नवल घडलं.अनपेक्षितपणे अपूर्व,अभूतपूर्व असे काहीतरी दृष्टीसमोरून ओझरते गेले.लगेचच गाडी थांबवून तिथपर्यंत गेलो.
रस्त्याच्या कडेला ते नवल आमची वाट बघत होते.अहाहा! अतिशय आकर्षक,चमकदार पिवळ्या रंगाचे अलौकिक पुष्पगुच्छ विराजमान झालेले ते झाड मी प्रथमच पहात होते.निसर्गाला अगदी मनापासून दाद द्यावीशी वाटली.निव्वळ अप्रतिम!भान हरपून त्या फुलांकडे मी पहातच राहिले.मन एकदम प्रसन्न, शांत व समाधानी झाले.
या घरात रहायला आल्यापासून सकाळी उठून लिविंग रुममध्ये आलं की समोरच सुर्योदय दिसतो मला. रोजचे नवे विभ्रम! कधी कधी खूप मनोरम देखावा असेल तर फोटोही काढले जातात. आताशा म्हणजे गेल्या वर्षीपासून व्हॉट्सअॅम्प ग्रुपवर 'गुड मॉर्निंग'च्या मेसेज बरोबर रोज सुर्याचाही फोटो टाकण्याची सवयच झाली आहे. ग्रुपवरची मंडळीही वाट बघत असतातच.
माझ्या या घरात हिवाळ्यात सूर्य नेमका समोरच उगवतो. अर्थात मुंबईचा हिवाळा तो! उन्हं चांगलीच तापतात कधी कधी. उन्हाळ्यात मात्र सूर्य एक वळण घेतो आणि उन्हाळ्याची सकाळ बर्यापैकी सुसह्य करतो.
प्रचि:१
कही दूर जब दिन ढल जाये...
सांज की दुल्हन बदन चुराये, चुपके से आये...
मेरे ख़यालों के आँगन में, कोई सपनों के दीप जलाये...दीप जलाये...
समुद्र किनारा कोणाला नाही आवडत?… मला वाटते भावनांना मोकळीक देण्याचे हे योग्य ठिकाण असावे…
पाण्यात मनसोक्त डुम्बायचे… कधी किनार्यालगत दगडावर बसून तासंतास गत आयुष्यातील अनुभवांची उजळणी करत रममाण व्हायचे…
कधी संध्याकाळी जोडीदाराबरोबर किनार्यावर रोमैण्टिक सैर व्हावी आणि ओल्या मातीत बसून गोड स्वप्ने रंगवावीत…