डीसीच्या रस्त्यावरील पक्षांची एक गोष्ट

Submitted by हर्ट on 2 December, 2014 - 05:12

साळूंक्या, चिमण्या आणि कबुतराची ही गम्मत बघा. ही गम्मत मी डिसीच्या रस्त्यावर टिपली आहे:

रस्त्यावर काही चिमण्यांना टिश्यू पेपरमधे गुंडाळलेले मास सापडते आणि त्या चिवचिवत ते मास टिश्यू पेपरमधून बाहेर काढतात आणि चिमण्यांचा गलका वाढतच जातो:

इतक्यात तिथे साळू़यांचा एक थवा उतरतो आणि चिमण्यांना उडवून लावतो:

बिचार्‍या मुठभर चिमण्या उडून जातात.. इतक्यात गोल भरारी घेत मोठ्या एटीत एक शुभ्र कबुतर तिथे उतरतो आणि साळूंक्यां हताश होऊन एकटम बघत राहतात. हा प्रकार दुरवरुन चिमण्या बघतात आणि त्यातून काही प्रकाशचित्र साकार होतात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके ओके.. तरी मला नवल वाटले होते मी विर्जिनिया बीच वर खूप मोठ्या संख्येने सीगल्स पाहिले होते. त्यावेळी मला ते सीगल्स आहेत हे माहिती नव्हते. पण बीचवर कबुतर असतात ह्याचे एक नवीन चुकीचे ज्ञान मी गोळा केले होते Happy धन्यवाद Happy मी सीगल्सबद्दल मध्यंतरी एक पुस्तक वाचले होते. खूप सुरेख होते .. जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल असे काहीसे नाव होते. मस्ट रीड बुक!

इथे मिळेल ते पुस्तक.. छोटेखानी आहे आणि रिचार्ड बाख ह्या लेखकानी लिहिलेले आहे. एक दोन तासात संपून होईल. शिवाय पुस्तकांची भाषा वेध घेणारी आहे. मास्टरपीस असाव हे पुस्तक ईंग्रजी साहित्यात.

https://www.google.com.sg/?gfe_rd=cr&ei=UYl9VJ36G83M8gfCp4CIDw&gws_rd=ss...

एकदा वाचाच!

बीचवर कबुतर असतात ह्याचे एक नवीन चुकीचे ज्ञान मी गोळा केले होते
>>
असे करु नकोस बी त्या पक्षाची चोच बघ आणि पाय बघ! पायातले पडदे फोटोत पण दिसतात.
बी काही बाबतीत तुझे निरीक्षण एकदम तीक्ष्ण असते आणि मग एकदम अशी कॉमेन्ट करतोस.

निलिमा, प्रथमदर्शी हा पक्षी मला कबुतरच वाटला आणि आपल्या भारतिय लोकांना नवखा पक्षी मग पहिल्याच वेळी ओळखायला चुक होऊ शकते. असो धन्यवाद Happy