कोकणातले आकाश दर्शन
Submitted by अवल on 21 December, 2014 - 04:25
अचानक दोन दिवस मोकळे मिळाले आणि शोधाशोध सुरू केली. अर्थातच प्रथम मायबोलीवरच शोधाशोध केली. अन अपेक्षित लगेच मिळाले. जिप्सीच्या एका धाग्यावर सागर सावली, दापोली ( लाडघर) ची माहिती मिळाली. अन बेत ठरला. मधले अधले दिवस असल्याने राहण्याचीही सोय चटकन झाली.
या वेळेस लेकाच्या कार ड्रायव्हिंगचे कौशल्य पहायचे होते. अर्थातच माझी रवानगी मागील सीट वर होती. प्रवास सुरू झाला . मी थोडी काळजीपूर्वक पुढचा रस्ता बघत होते. लेकाचे मात्र पुढच्या रस्त्याबरोबरच आजूबाजूच्या आणि रेअर मिरर मध्येही नीट लक्ष होते. त्यानेच मला मागे सूर्योद्य बघायला सांगितला.