मला बघताच झुडूपात बसलेला लालबुड्या बुलबुल अकारण अस्वस्थ झाला. फांदीवर बसून भयंकर टिवटीवीनं निषेध करू लागला. त्याचं घरटं की काय म्हणावं इथं? पण त्या तपासात मी पडलो नाही. घाबरतात पाखरं फार. लहान काय अन् मोठी काय? घरटं प्रत्येकाला जपायचं असतं. आपल्या या विश्वासावरच तर चिवचिवती पिल्लं मोठी होतात. उडून जायचं बळ त्या धडपडत्या पंखात घरटंच तर भरतं. मग त्या पाखराच्या घरट्याशी त्याला घाबरवण्यात काय शहाणपण? ‘नाही रे बा. तुझ्याशी मी येत नाही. शांत रहा. पिलांना बळ दे. पंखावर आनंद घेऊन उडू दे त्यांना माझ्या रानात अन् घरट्याची ताकद या रानाला लाभू दे. रान फुलू दे, फळू दे, वाढू दे.’
पुस्तकविश्ववरती फार पूर्वी लिहीलेला एक पुस्तकपरिचय सापडला.
_____________________
सप्तरंगी कावळा
पुस्तकविश्ववरती फार पूर्वी लिहीलेला एक पुस्तकपरिचय सापडला. कोणी डेलावेअरचे आहे का? लुइस नावाचा डेलावेअरमधला भाग अतोनात निसर्गसंपन्न आहे. एकंदरच डेलावेअरला पक्ष्यांचीचविपुलता आहे.
________________________________
.
चालता चालता पडलो मी डबक्यात
बेडूक म्हणाला चल निघ इथून एका फटक्यात
चालता चालता पडलो मी तळ्यात
खेकडा म्हणाला जाऊन मर मेल्या मळ्यात
चालता चालता पडलो मी विहिरीत
मासा म्हणाला पाय घसरून कसा पडलास मोरीत
चालता चालता पडलो मी नदीत
कोलंबी म्हणाली फेरी मार एकदा मुंजाच्या हद्दीत
चालता चालता पडलो मी सागरात
Hr म्हणाली कोविड 19 मुळे कपात होणार पगारात
टेक्सासच्या उल्कापात वाटावा अशा उन्हाळ्यात इथे गार वाटते म्हणून आम्ही नियमितपणे जातो.
सिबलो निसर्गकेंद्र हे अजिबात प्रसिद्ध नाही पण इथे तास दोन तास फिरायला प्रसन्न वाटते. शाळेच्या अधूनमधून येणाऱ्या सहली आणि पाच दहा पक्षीमित्र सोडले तर इथे विशेष कुणी येत नाही. कधी कधी फोटो शूट चाललेली दिसतात. त्यामुळे नेहमीच निवांत , शांत असते. घराजवळ असल्याने मलाही सुटसुटीत वाटते.
अधून-मधून इकडं पाण्यावर येणा-या या बिबटाची विश्रामगृहाच्या लोकांना खोड चांगलीच माहिती. मी परतल्यावर यावर ब-याच गप्पा झाल्या. दोन बाजूला डोंगर अन् पसरत गेलेलं रान. जनावराला तोटा नाही. ससे, भेडकी, कोठरी, सांबरं, रोही, डुकरं, कधी चितळं तर कधी चराईला आलेलं चुकार ढोर. अन् काही नाही मिळालं तर रात्री गाव राखणीचं मोकाट कुत्रं.
हिमालयातल्या बर्फात, दगड-गोट्यात रमणारा माझा मित्र रंजन. मी कधी त्याला रंजन म्हणालो नाही, “रंजा” हेच त्याचं नाव. हा गडी नेहमी मला म्हणायचा, “चल ट्रेकिंगला.” पण तो आपला प्रांत नव्हे हे मला पूरेपूर उमगलं होतं. १-२ वेळा मी हिमालयात गेलोही. पण तिथं सगळ्यांबरोबर चालणं माझ्याच्यानं नाही झालं. मी आपला फुलपाखरं, फुलं, पक्षी पहात पहात मागंच रेंगाळायचो. मी कधी त्याच्याबरोबर गेलो नाही ट्रेकिंगला, पण त्याच्या डोक्यात मी वनभ्रमंतीचा किडा सोडला. एका रविवारी दोघांनाही वेळ होता. त्याला जंगल दाखवायला घेऊन गेलो…आणि त्याला ती नशा पुरेपूर भिनली. त्याचा हिमालय सुटला नाही.
मुक्त सारे आभाळ आज
अशी कोंडलेली माणसे
ओरबाडून ही धरेला
जहर सांडलेली माणसे
वृक्षांची ती रम्य चादर
साफ कापणारी माणसे
निर्मळ पाणी हे नद्यांचे
कसे नासनारी माणसे
दूध संपवून स्तनातील
रक्त शोषणारी माणसे
हक्क मारून वंशजांचे
भोग पोसणारी माणसे
मीच स्वामी असे जगाचा
मिथ्या समजणारी माणसे
निसर्गाचा शाप विषाणू
सत्य न उमजणारी माणसे
लहानपणी गणपतीच्या आणि सशाच्या गोष्टीतला चंद्र अगदी आवडायचा. उन्हाळ्याच्या रात्री बाहेर झोपताना या चंद्रानंच तर झोपवलं आहे चांदण्यात गुरफटून. नंतर त्याच्यावरचे खड्डे, गुरुत्वाकर्षण, परिक्रमा शिकलो. पण इतक्या तांत्रिक गोष्टींमध्ये घुसूनसुद्धा चंद्र पाहिला की त्या गोष्टी कधीच आठवत नाहीत. कदाचित चंद्र हा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर ‘केवळ आवडणे’ या एकाच गोष्टीसाठी निर्माण झाला असावा.