रित्विक - ११ वर्षे
मी प्राथमिक शाळेत असताना माझ्या शाळेचे हेडमास्तर आम्हां सर्व मुलांना शाळेच्या आवारात एक रोपटे लावायला सांगायचे. प्रत्येक विद्यार्थ्याने एक रोप लावायचे आणि त्या रोपाची जोपासना करायची. हेडमास्तर स्वतः यायचे आणि रोपट्यांचे निरिक्षण करायचे आणि ज्या विद्यार्थाने व्यवस्थित रोपट्याची काळजी घेतलेली असे त्याचे कौतुक प्रार्थनेच्या तासाला सर्वांसमोर केले जायचे. मायबोलीच्या बाल - रोप संवर्धन ह्या उपक्रमाच्या निमित्ताने मला माझ्या शाळेतल्या रोप - संवर्धन उपक्रमाची प्रकर्षाने आठवण झाली.
असो. एक कान्हातला अनुभव सांगतोच. मोरघार (Changeable Hawk-Eagle) सशावर टपली होती. दोन प्रयत्न वाया गेले. तिस-या प्रयत्नात ती होती. ससा गवताच्या गचपणात. मोरघारीनं उतरुन चोच मारुन पाहिलं पण काही जमलं नाही. आता सशानं थोडंसं डोकं काढायचा अवकाश की घारीनं नख्यांत उचलून नेलाच म्हणून समजा.
मागून गाडी आली. “शेर है क्या?”
“नही. वो देखो इगल शिकार कर रहा है खरगोशका.”
“हूं!!! इसको क्या देखना?”
आम्ही वेडे सोडलो तर कोणीच थांबलं नाही तिथं. सगळ्यांना वाघच पहायचे होते आणि मोजायचे होते. म्हणजे परत गेल्यावर सांगता आलं असतं “तीन दिवसात बारा वाघ” वगैरे स्कोअर.
महाराष्ट्रात वाघ म्हटलं की ताडोबा आठवतं. कारण जवळपास महाराष्ट्रातले निम्मे-अर्धे म्हणजे ११५ वाघ ताडोबातच आहेत. जवळच्या पेंचमध्येही ६० वाघ आहेत. अर्थात पेंच तसंही ताडोबाच्या अर्धंच आहे म्हणा. पण म्हणून महाराष्ट्रात हमखास वाघ पहायचा तर लोक दोनच ठिकाणं निवडतात; पेंच नाहीतर ताडोबा.

आमच्या घराच्या गॅलरीसमोर थोडं लांब एक नारळाचं झाड आहे. साधारणपणे गेल्या ऑक्टोबर अखेरपासून त्या झाडावर दोन-तीन घारींची ये-जा सुरू होती. त्यापैकी दोन घारींनी नोव्हेंबर महिन्यात झाडाच्या शेंड्यावर एका बाजूला घरटं बांधायला सुरुवात केली. लांब काड्या-काटक्या आणून ते घरटं बांधत होते. कधीकधी एक घार (बहुधा नर) मेलेला उंदीर किंवा पक्षी आणून, ते खाण्यासाठी दुसर्या घारीची वाट पाहताना दिसत असे.

हा त्यांच्या प्रियाराधनाचा प्रकार असावा.
“बाल-रोप संवर्धन उपक्रम”
स्वरूप व माहिती:- घरच्या घरी बियांपासून उगवणार्या रोपाचे संवर्धन करणे.
उपक्रमात भाग घेण्यासाठी मुलांनी छोटी कुंडी, अर्धी कापलेली प्लास्टीक बाटली किंवा एखादा रिकामा श्रीखंड-आम्रखंडाचा डबा अश्या कोणत्याही वस्तू मधे धने, बडीशेप, मटकी, मूग, ओवा, झेंडू, तुळस, आलं, पुदिना, लिली, कोरांटी, गोकर्ण, गुलबक्षी इत्यादी पैकी बियांपासून सहज उगवणाऱ्या रोपट्याचं जतन करायचं आहे.
एक महिन्यानंतर संयोजकांनी दिलेल्या लिंक वर मायबोलीकरांनी आपापल्या पाल्याने जपलेल्या रोपट्याचे फोटो अपलोड करावेत.
गाव
वाट चालता गावाची
दिसे चिमणी-पाखरं
घास ईवलुशा तोडांशी
पिंला वाटे ती साखरं
झाड एक पिंपळाचे
फार दिसते शोभून
आज्या जन्मीच्या सालचे
आई सांगते महान
त्रुण फेडाया मोत्याचे
बैल पोळा एक सण
सात जन्माचा सोबती
जिवाहुणी त्याचे प्राण
झाडे फुले वृक्षवेली
माझ्या निसर्गाची शान
ऊन पावसात येई
ईंद्रधनुची कमान
गावी सह्याद्रीचे वारे
दर्या खोरर्यांनी वाहते
भुमी वीरांची ही थोर
महती जगास सांगते
उषःकाल
चिरून छाती रात्रीची तांबडे फुटेल परत
दूर मग क्षितिजे उधळतील रंग गगनात
प्रभाव काळ्या निषेचा लुप्त होईल क्षणात
अनुपम सुंदर उषेचे रूप राहील मनात
परत एकदा आशेची हृदयात फुटेल पालवी
विश्वास होईल प्रबळ बदलेल सगळी स्थिती
मंतरलेल्या क्षणात तरी सावट कधी पडते
देखावा मोहक जरी वास्तव मग पछाडते
करते चिंता घर जादुचाच ठरेल प्रहर
वेगाने होईल क्षय उन्हे बोचतील परत
राहील तरी प्रतीक्षा उषेची मनातील सदैव
आशा राहील अतूट आणेल अभिप्रेत अर्थ
दिलीप फडके
१९९७ साली मी लिहिलेल हे पत्र रूपी मनोगत आहे.तसच्या तसं पुनः प्रकाशित करीत आहे
प्रिय-----व सौ----- यांस स न.वि.वि.
गेल्या खेपेस मी पाठविलेल्या पत्रास आपण दिलेला उत्स्फूर्त अन उत्तेजनात्मक प्रतिसाद पाहून मी पुनः लेख वजा पत्र लेखनास बसलोय.
गेल्या वीकांतास मी अनुभवलेल्या ,बेफाम वेडावून नेणार्या सृष्टी सौंदर्यास शब्दात बांधण्याचा हा एक खुळा प्रयत्न आहे.
आपण मित्रलोक कोणत्या जातीचे???
वाघीण – एक आई
२०१० सरत आलं होतं. थंडीचा जोर वाढू लागला. झाडांची पानगळ सुरु झाली. ताडोबातल्या तळ्यात विदेशी पाहुणे येऊन मुक्त संचार करु लागले. याच वेळी पांढरपवनीची गर्भार वाघीण दिवस भरत आले म्हणून अस्वस्थ होऊ लागली. माहितीतल्या सुरक्षित ठिकाणांना वारंवार भेटी देऊन पिल्लांसाठी सुरक्षित ठिकाण शोधू लागली. अखेरीस एक ठिकाण तिनं नक्की केलं. त्याच्या आसपासच दोनेक दिवस ती रेंगाळली. फार दूर गेली नाही. एके दिवशी कळा सुरु झाल्या आणि आडोसा शोधून तिनं चार बच्चांना जन्म दिला; तीन माद्या आणि एक नर. डोळे मिटलेल्या गुलाबी गोळ्यांना ती प्रेमानं चाटू लागली.