निसर्ग

शनिदेव आणि गुरुदेव - एक खगोलीय अविष्कार

Submitted by mabopremiyogesh on 22 December, 2020 - 04:47

जेंव्हा पासून युती बद्दल कळाले (राजकारणीय नाही ) शनिदेव आणि गुरुदेव ह्यांच्या तेंव्हा पासून कधी एकदा बघतोय आणि फोटो काढतोय असं झालं होतं . रविवारी ठरवलं आणि आमच्या कोथरूड मधील जवळच्या एका टेकडीवर आम्ही सहपरिवार दाखल झालो. ५ वाचताच पोहोचलो , पोराने इतर TP , मी बर्ड फोटोग्राफी असे उद्योग करत होतो , पण एक डोळा किंवा २ डोळे (दुर्बीण) म्हणा हवे तर आकाशात होता . आणि हळू हळू अंधार पडायला सुरुवात झाली आमच्या सारखे अजून उत्साही काही मंडळी पण होती तेवढ्यात गलका चालू झाला, दिसला दिसला गुरु दिसला.

"रानपिंगळा - अज्ञातवास व पुनर्शोध" - पुस्तक परिचय

Submitted by mabopremiyogesh on 19 December, 2020 - 11:52

साल १९९८, पेपर मध्ये सगळी कडे बातमी आली होती कि "रानपिंगळा" हा पक्षी ११३ वर्षांनी सापडला आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे साधारण माझ्या मूळ गावाच्या प्रदेशात म्हणजेच खान्देशात सापडला होता. ह्याचा पुनर्शोध अमेरिकन स्त्री पक्षी संशोधक पामेला रासमुसेन ह्यानी लावला होता.

चंद्रायण..!

Submitted by सत्यजित... on 2 December, 2020 - 06:56

ही रात निळीशार,
ओतीत चंद्र-धार...
स्वप्नातल्या कळ्यांना
देते नवा आकार!

पाण्यात चंद्र-पक्षी,
मांडून सौख्य-नक्षी...
किरणावरी शशीच्या
होतात मंद स्वार!

पाहून चंद्र-मेळा,
क्षितिजास ये उमाळा...
नक्षत्र बांधतात
तारांस एक-तार!

स्वप्नील चंद्र-गाणे
मधु-मीलनी उखाणे...
गातात फूल, वारे
छेडीत गंध-तार!

एकांत चंद्र-वेडा,
वितळून जात थोडा...
देतो अनामिकेला
अलगूजशी पुकार!

उचलून चंद्र-मेणा,
र्‍हदयात चंद्र-वेणा...
कित्येक चंद्र-वेळा,
करतात येरझार!

— सत्यजित

नातीगोती! - भाग ६.५

Submitted by अज्ञातवासी on 22 November, 2020 - 12:26

भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 

थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग ५

Submitted by अरिष्टनेमि on 24 October, 2020 - 14:29

हा पंचधारेचा नाला ओलांडताना हळू. डावी उजवी पहा. इथं नाल्यात थंडाव्याला वाघ कधीही येईल बरं, काही भरवसा नाही. टी-५४ इथं असायचा. आजकाल हा टी-१०० पण दिसू लागलाय. आहे बाकी तसाच, धिप्पाड. नाहीच समजा दिसला, पण जर बारीक नजरेनं पाहिलंत तर घुबड दिसेल. त्याची एक पक्की फांदी आहे. ठिय्याच तिथं. बसून जागा साफसूफ झालीय. तिथं नसलं तर थोडं इकडं-तिकडं. आता घुबड म्हटलं की उंदीर आठवतो. पण हा गडी जरा भरकटला. याला मासे खायचा नाद. याचं नावच मासेखाऊ घुबड. आता रात्रीच्या अंधारात एखाद-दुसरा उंदीर किंवा साप त्यानं पोटात टाकलाच तर कोणाला माहित? हा असा आज संध्याकाळी पाचेक वाजताच पंचधारेच्या धारेवर आला.

शब्दखुणा: 

मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..) Landscape Photography..

Submitted by अ'निरु'द्ध on 18 October, 2020 - 08:31

मुखपृष्ठ :

मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)

मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)
Landscape Photography..

फोटोग्राफीला आपण सुरुवात करतो त्यात सुरुवातीला बहुतेक सगळ्यांचा सगळ्यात जास्त आवडता प्रकार असतो तो म्हणजे निसर्ग दृश्य किंवा लँडस्केप फोटोग्राफी.
(हल्ली हे स्थान सेल्फीने पटकावलेले आहे. Wink )

थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग ४

Submitted by अरिष्टनेमि on 3 October, 2020 - 16:35

एकदा अशीच मजा. पेंचमध्ये सलामा-भिवसनच्या मध्ये जाता जाता मला दिसला ब्लॅक राजा. म्हणजे फुलपाखरू आहे हे. फर्र करून उडून गेलं. पण ते येणार हे नक्की. कारण वाघाच्या पहाटेच्याच विष्ठेवर ते बसलं होतं. मी तिथंच थांबलो.

तोवर भिवसनकडून गाडी आली. “वाघीन हाये वाघीन. ती नाय का तर बसूनसनी हाय. तीन बच्चे घेऊन. बिलकूल रोडावर.”

“खरं म्हणता काय? बरं जातोच.”

शब्दखुणा: 

थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग ३

Submitted by अरिष्टनेमि on 27 September, 2020 - 09:35
sarpagarud

कोणताही प्राणी-पक्षी-किडा पुन्हा पुन्हा दिसला तरी पुन्हा पुन्हा मोह होतो फोटोचा. अगदी या सर्पगरुडाचंही तेच. मीही तयार आणि तोही हौसेनं फोटो काढून घेतो. हेच बघा ना. मागच्या भागातला अस्वलहि-याचा गरुड जसा शांत होता, तितकाच, तसाच हा काटेझरीतला. पुन्हा दिसला, अशाच शांत मूडमध्ये. काही घाई नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

बाल- रोप संवर्धन उपक्रम - रित्विक ( रुपाली विशे- पाटील)

Submitted by रूपाली विशे - पाटील on 27 September, 2020 - 05:50

रित्विक - ११ वर्षे

मी प्राथमिक शाळेत असताना माझ्या शाळेचे हेडमास्तर आम्हां सर्व मुलांना शाळेच्या आवारात एक रोपटे लावायला सांगायचे. प्रत्येक विद्यार्थ्याने एक रोप लावायचे आणि त्या रोपाची जोपासना करायची. हेडमास्तर स्वतः यायचे आणि रोपट्यांचे निरिक्षण करायचे आणि ज्या विद्यार्थाने व्यवस्थित रोपट्याची काळजी घेतलेली असे त्याचे कौतुक प्रार्थनेच्या तासाला सर्वांसमोर केले जायचे. मायबोलीच्या बाल - रोप संवर्धन ह्या उपक्रमाच्या निमित्ताने मला माझ्या शाळेतल्या रोप - संवर्धन उपक्रमाची प्रकर्षाने आठवण झाली.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - निसर्ग