जेंव्हा पासून युती बद्दल कळाले (राजकारणीय नाही ) शनिदेव आणि गुरुदेव ह्यांच्या तेंव्हा पासून कधी एकदा बघतोय आणि फोटो काढतोय असं झालं होतं . रविवारी ठरवलं आणि आमच्या कोथरूड मधील जवळच्या एका टेकडीवर आम्ही सहपरिवार दाखल झालो. ५ वाचताच पोहोचलो , पोराने इतर TP , मी बर्ड फोटोग्राफी असे उद्योग करत होतो , पण एक डोळा किंवा २ डोळे (दुर्बीण) म्हणा हवे तर आकाशात होता . आणि हळू हळू अंधार पडायला सुरुवात झाली आमच्या सारखे अजून उत्साही काही मंडळी पण होती तेवढ्यात गलका चालू झाला, दिसला दिसला गुरु दिसला. आणि मग काय आम्ही पण सरसावून बसलो सॉरी उभे राहिलो आणि ३४५ वर्षांनी आलेल्या ह्या अभूतपूर्व नैसर्गिक घटनेकडे पाहायला लागलो. आधी डोळ्यांनी , मग दुर्बिणीतून आणि मग कॅमेऱ्यातून पहिले आणि धन्य झालो. इतके सुंदर दिसत होते कि बास. माझ्या मुलगा तसा लहान असल्यनाने (५ वर्ष) त्याला उत्साह भरपूर होता ..त्याने इतकं गमतीदार वाक्य टाकले कि सगळे लोकं हसायला लागले. तो म्हणाला "बाबा मला saturn दिसत नाहीये नीट मोबाईल ची बॅटरी लाव ना :)" . असो अशा रीतीने बराच वेळ आम्ही ह्या खगोलीय घटनेला अनुभवत उभा राहिलो .
शनिदेव आणि गुरुदेव - एक खगोलीय अविष्कार
Submitted by mabopremiyogesh on 22 December, 2020 - 04:47
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.
छान फोटो!!
छान फोटो!!
छान!
छान!
बारीक चांदण्यांचा फोटो कसा
बारीक चांदण्यांचा फोटो कसा मिळाला?
srd - एक्सपोजर बरोबर होतं
srd - एक्सपोजर बरोबर होतं आणि एडिटिंग मध्ये जरा स्नॅपसीड मोबाइल एप चे डार्क फिल्टर वापरले
छान फोटो!!
छान फोटो!!
हा मी आज काढलेला
हा मी आज काढलेला
गुरूचे चंद्र आणि शनीची कडी दिसत आहेत.
वावे तुम्ही फोटो कसा काढलात?
वावे तुम्ही फोटो कसा काढलात?
माझ्याकडे निकॉन P900 आहे.
माझ्याकडे निकॉन P900 आहे. त्यात पूर्ण झूम करून एक्स्पोजर +0.7 ठेवलं.
वावे .. छान फोटो आहे.
वावे .. छान फोटो आहे.
वावे ,मस्त क्लिकलेत.
वावे ,मस्त क्लिकलेत.
"बाबा मला saturn दिसत नाहीये
"बाबा मला saturn दिसत नाहीये नीट मोबाईल ची बॅटरी लाव ना :)" >>>
कित्ती गोड.
अशा रीतीने बराच वेळ आम्ही ह्या खगोलीय घटनेला अनुभवत उभा राहिलो . >>> वाह छान अनुभव, फोटोही छान.
वावे सुपर्ब क्लिक.
वावे, फोटो मस्तंच. शनीची
वावे, फोटो मस्तंच. शनीची कडीसुद्धा दिसताहेत. म्हणजे p900 पक्षी आणि ताऱ्यांसाठीही उपयोगी आहे!!
वावे, मस्त फोटो.
वावे, मस्त फोटो.
अमच्याइथे गेल्या महिन्यात दोघेही ठळक व सुंदर दिसत होते, कारण रात्री उशिरापर्यंत दिसायचे.
पण या महिन्यात दोघेही निस्तेज झाले. संध्याकाळच्या वेळेस इथे आकाशात ढगांचा थर असतोच, त्यामुळे निस्तेज दिसतात. आणि त्यात हे आठपर्यंत क्षितीजावर टेकतात. 21 ला ही युती पाहणारे आम्ही दोघेच होतो, सात नंतर साधारण दिसायला लागले.
काल पासून शनी गुरूच्या खालच्या बाजूला दिसायला लागला.
सर्वांना धन्यवाद _/\_
सर्वांना धन्यवाद _/\_
@srd, ताऱ्यांचे नाही, पण ग्रह आणि चंद्राचे फोटो चांगले येतात मात्र.
@ साधनाताई, हो, कालपासून शनी खाली आलाय.
वावे, फारच छान आला आहे फोटो.
वावे, फारच छान आला आहे फोटो. शनीचे रंगही दिसत आहेत. एक्स्पोजर अजून कमी केलं तर गुरुचे रंग दिसतील का, मी एक्स्पर्ट नाही, पण एक शंका.
@हरचंद पालव, रंगीत पक्ष्यांचे
@हरचंद पालव, रंगीत पक्ष्यांचे (चित्रबलाक वगैरे) फोटो काढताना थोडंसं अंडरएक्स्पोज करावं, म्हणजे रंग जास्त छान, उठून दिसतात. त्यामुळे तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे.
मी या फोटोत एक्स्पोजर प्लस बाजूला ठेवलंय कारण मला गुरूचे उपग्रह हवे होते.
नुसत्या कॅमेऱ्याने फोटो काढण्याला शेवटी खूप मर्यादा आहेत. त्यामुळे गुरूचे रंग येतीलच असं नाही. टेलिस्कोपला कॅमेरा जोडून काढले पाहिजेत ग्रहांचे फोटो. माझ्याकडे सध्या टेलिस्कोप नसल्यामुळे नुसत्या कॅमेऱ्यावरच हौस भागवत आहे.
वावे - खूपच मस्त आलाय. काल
वावे - खूपच मस्त आलाय. काल जास्त छान दिसत होतं . हा मी काल काढलेला
धन्यवाद वावे.
धन्यवाद वावे.
योगेश, छान आलाय फोटो.
योगेश, मस्त आलाय तुमचा फोटो.
योगेश, मस्त आलाय तुमचा फोटो. शनीची कडीही स्पष्ट दिसतायत. काल खरंच जास्त छान दिसत होतं.