
साल १९९८, पेपर मध्ये सगळी कडे बातमी आली होती कि "रानपिंगळा" हा पक्षी ११३ वर्षांनी सापडला आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे साधारण माझ्या मूळ गावाच्या प्रदेशात म्हणजेच खान्देशात सापडला होता. ह्याचा पुनर्शोध अमेरिकन स्त्री पक्षी संशोधक पामेला रासमुसेन ह्यानी लावला होता.
कट २ - अचानक काही दिवसापूर्वी "रानपिंगळा - अज्ञातवास व पुनर्शोध" ह्या डॉ. जयंत वडतकर लिखित पुस्तकाबद्दल वाचण्यात आलं. बरेच दिवस झालेले नवीन पुस्तक घेऊन, म्हणून पटकन हे पुस्तक मागवलं . ३ दिवसात पुस्तक घरपोच आलं आणि एका बैठकीमध्ये वाचून काढलं . आता पक्षी हा माझा सगळ्यात आवडता विषय आणि त्यातून हा पक्षी विशेष म्हणजे ११३ वर्षांनी सापडलेला .. तर ह्या पुस्तका बद्दल थोडी माहिती. ह्या पुस्तकाला वनऋषी मारुती चितमपल्ली, नितीनजी काकोडकर आणि असाद रहमानी ह्यांची प्रस्तावना आहे. ह्या पुस्तकात रानपिंगळा ह्या पक्ष्या बद्दल सगळी माहिती आहे. तो पूर्वी कसा सापडला होता (१८७२ साली), त्याचे नामकरण आणि प्रजाती कशी ठरवली गेली होती पासून ते ११३ वर्षां नंतर कसा शोध घेण्यात आला पासून सद्यस्थिती ह्या बद्दल जयंतजींनी विस्तृत माहिती दिली आहे. ह्या पक्षासाठी कशाप्रकारे शोध मोहीम आखण्यात आल्या ह्या बद्दल वाचतांना त्यांच्या बद्दलचा आदर खूपच वाढतो.
साधारण ३ पिंगळा प्रजाती आहेत. ठिपकेवाला पिंगळा (Spotted Owlet), जंगल पिंगळा (Jungle Owlet ) आणि रानपिंगळा (Forest Owlet ). त्यातला पहिला (ठिपकेदार) सगळी कडे दिसतात (मोठ्या शहरात पण), रान आणि जंगल पिंगळा साधारण जंगलात आढळतात . इतर दोन आणि रान पिंगळ्या मध्ये महत्वाचा फरक म्हणजे रान पिंगळा हा दिवसा शिकार करतो. रान पिंगळा आणि ठिपकेवाला पिंगळा मध्ये बऱ्यापैकी साधर्म्य तरी काही खास फरक म्हणजे रान पिंगळ्याचा पोटाकडचा भाग हा पांढरट असतो आणि ठिपके कमी असतात. तसेच त्याचे डोके ठिपकेवाल्या पिंगळा पेक्षा थोडे चपटे असते . अजून एक महत्वाचा फरक म्हणजे रान पिंगळ्याच्या डोक्यावरील तपकिरी भाग जास्त दिसतो. साधारण विरळ शुष्क जंगलात रान पिंगळा आढळतो आणि पूर्णतः मांसाहारी असतो. सध्या २०० च्या आसपास संख्या आहे आणि मेळघाट मध्ये सगळ्यात जास्त संख्या आहे. इतर वन्यजीवासारखे ह्याची पण संख्या अधिवास नष्ट झाल्यामुळे कमी होत आहे. तसेच वणवे, शेती साठी जंगलावर झालेले आक्रमण, विकासाच्या नावाखाली रस्ते ह्या मुळे पण परिणाम झाला आहे. ह्या पुस्तकात अशा प्रकारच्या खूप माहितीपूर्ण नोंदी आहेत. ह्या मध्ये असलेले फोटो पण अप्रतिम आहेत. तर असे हे सुंदर पुस्तक सगळ्यांनी नक्की घेऊन वाचा.
पुस्तकाचे नाव - "रानपिंगळा - अज्ञातवास व पुनर्शोध"
लेखक - डॉ. जयंत वडतकर
किंमत - १४० /- (५ पुस्तकांचा संच ५५०) (१० पुस्तकांचा संच - १००० /-)
प्रकाशक - सातपुडा बुक्स
संपर्क - वर्षा वडतकर - 7522945749 (गुगल पे )
छान परिचय!
छान परिचय!
मला मात्र वेगळीच भीती वाटली होती.
छान परिचय!
छान परिचय!
छान परिचय.
छान परिचय.
छान
छान
पशु पक्षी वनस्पती ह्यात करियर असणारे जीव धन्य आहेत
पिंगळा आवडतो.
पिंगळा आवडतो.
छान ओळख करून दिलीयं
छान ओळख करून दिलीयं रानपिंगळ्याची ...
मला आधी वाटलं अज्ञातवासींनी लेख लिहिलायं...
छान ओळख!
छान ओळख!
आवडला पुस्तक परिचय. धन्यवाद.
आवडला पुस्तक परिचय.
धन्यवाद.
छान ओळख!
छान ओळख!
लहानपणी बाहुली सारखा दिसणारा पिंगळा मी खरोखरच बाहुली म्हणून पिंगळ्याला पकडायला गेले होते.. आणि भीतीमुळे पुढचे २ दिवस तापाने चांगलीच फणफणले होते.. तेच आठवलं..
धन्यवाद सगळ्यांना. पुस्तक छान
धन्यवाद सगळ्यांना. पुस्तक छान आहे वेगळीच माहिती मिळते , किती डेडिकेटेड लोकं आहेत ते कळते . आजमितीला ५०+ लोकं रानपिंगळ्यावर कामं करत आहेत.
अज्ञातवासी - भीती कशाबद्दल म्हणजे तुमच्या id साठी का?

मन्या S - हम्म..आपल्याला लहान पाणी अशा नको त्या भीती घातल्या जातात. वास्तविक घुबड, पिंगळा हे तर आपले चांगले मित्र आहेत
छान परिचय.
छान परिचय.