ताडोबा

थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग ५

Submitted by अरिष्टनेमि on 24 October, 2020 - 14:29

हा पंचधारेचा नाला ओलांडताना हळू. डावी उजवी पहा. इथं नाल्यात थंडाव्याला वाघ कधीही येईल बरं, काही भरवसा नाही. टी-५४ इथं असायचा. आजकाल हा टी-१०० पण दिसू लागलाय. आहे बाकी तसाच, धिप्पाड. नाहीच समजा दिसला, पण जर बारीक नजरेनं पाहिलंत तर घुबड दिसेल. त्याची एक पक्की फांदी आहे. ठिय्याच तिथं. बसून जागा साफसूफ झालीय. तिथं नसलं तर थोडं इकडं-तिकडं. आता घुबड म्हटलं की उंदीर आठवतो. पण हा गडी जरा भरकटला. याला मासे खायचा नाद. याचं नावच मासेखाऊ घुबड. आता रात्रीच्या अंधारात एखाद-दुसरा उंदीर किंवा साप त्यानं पोटात टाकलाच तर कोणाला माहित? हा असा आज संध्याकाळी पाचेक वाजताच पंचधारेच्या धारेवर आला.

शब्दखुणा: 

ताडोबा सफर

Submitted by king_of_net on 19 October, 2020 - 06:48

नमस्कार मंडळी!
आपल्यापैकी कोणी जर ताडोबा सफर स्वतः प्लान करुन पार पाडली असेल तर क्रुपया मदत करा.
आम्ही तिघे (पालक / मुलगा) नोव्हेंबर मधे ताडोबाचा प्लान करत आहोत.. ४ ते ५ दिवस stay + २ दिवस प्रवास
२-३ ठिकाणी चौकशी केली.. पण त्यांच्याकडे फक्त २ दिवसांचाच आणी ट्रेन चा सेकंड क्लासचा प्लान आहे.
त्यांच्याबरोबर customization साठि बोलणे चालु आहे. पण सेफ म्हणुन हा खटाटोप.

खालील मुद्द्यांबद्दल माहिती हवी आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग ४

Submitted by अरिष्टनेमि on 3 October, 2020 - 16:35

एकदा अशीच मजा. पेंचमध्ये सलामा-भिवसनच्या मध्ये जाता जाता मला दिसला ब्लॅक राजा. म्हणजे फुलपाखरू आहे हे. फर्र करून उडून गेलं. पण ते येणार हे नक्की. कारण वाघाच्या पहाटेच्याच विष्ठेवर ते बसलं होतं. मी तिथंच थांबलो.

तोवर भिवसनकडून गाडी आली. “वाघीन हाये वाघीन. ती नाय का तर बसूनसनी हाय. तीन बच्चे घेऊन. बिलकूल रोडावर.”

“खरं म्हणता काय? बरं जातोच.”

शब्दखुणा: 

थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग ३

Submitted by अरिष्टनेमि on 27 September, 2020 - 09:35
sarpagarud

कोणताही प्राणी-पक्षी-किडा पुन्हा पुन्हा दिसला तरी पुन्हा पुन्हा मोह होतो फोटोचा. अगदी या सर्पगरुडाचंही तेच. मीही तयार आणि तोही हौसेनं फोटो काढून घेतो. हेच बघा ना. मागच्या भागातला अस्वलहि-याचा गरुड जसा शांत होता, तितकाच, तसाच हा काटेझरीतला. पुन्हा दिसला, अशाच शांत मूडमध्ये. काही घाई नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग २

Submitted by अरिष्टनेमि on 22 September, 2020 - 13:44

असो. एक कान्हातला अनुभव सांगतोच. मोरघार (Changeable Hawk-Eagle) सशावर टपली होती. दोन प्रयत्न वाया गेले. तिस-या प्रयत्नात ती होती. ससा गवताच्या गचपणात. मोरघारीनं उतरुन चोच मारुन पाहिलं पण काही जमलं नाही. आता सशानं थोडंसं डोकं काढायचा अवकाश की घारीनं नख्यांत उचलून नेलाच म्हणून समजा.

मागून गाडी आली. “शेर है क्या?”

“नही. वो देखो इगल शिकार कर रहा है खरगोशका.”

“हूं!!! इसको क्या देखना?”

आम्ही वेडे सोडलो तर कोणीच थांबलं नाही तिथं. सगळ्यांना वाघच पहायचे होते आणि मोजायचे होते. म्हणजे परत गेल्यावर सांगता आलं असतं “तीन दिवसात बारा वाघ” वगैरे स्कोअर.

शब्दखुणा: 

थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग १

Submitted by अरिष्टनेमि on 21 September, 2020 - 12:44
वाघ

महाराष्ट्रात वाघ म्हटलं की ताडोबा आठवतं. कारण जवळपास महाराष्ट्रातले निम्मे-अर्धे म्हणजे ११५ वाघ ताडोबातच आहेत. जवळच्या पेंचमध्येही ६० वाघ आहेत. अर्थात पेंच तसंही ताडोबाच्या अर्धंच आहे म्हणा. पण म्हणून महाराष्ट्रात हमखास वाघ पहायचा तर लोक दोनच ठिकाणं निवडतात; पेंच नाहीतर ताडोबा.

9E3A8273.jpg

शब्दखुणा: 

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त - वाघीण (एका आईची गोष्ट)

Submitted by अरिष्टनेमि on 29 July, 2020 - 13:22

वाघीण – एक आई

२०१० सरत आलं होतं. थंडीचा जोर वाढू लागला. झाडांची पानगळ सुरु झाली. ताडोबातल्या तळ्यात विदेशी पाहुणे येऊन मुक्त संचार करु लागले. याच वेळी पांढरपवनीची गर्भार वाघीण दिवस भरत आले म्हणून अस्वस्थ होऊ लागली. माहितीतल्या सुरक्षित ठिकाणांना वारंवार भेटी देऊन पिल्लांसाठी सुरक्षित ठिकाण शोधू लागली. अखेरीस एक ठिकाण तिनं नक्की केलं. त्याच्या आसपासच दोनेक दिवस ती रेंगाळली. फार दूर गेली नाही. एके दिवशी कळा सुरु झाल्या आणि आडोसा शोधून तिनं चार बच्चांना जन्म दिला; तीन माद्या आणि एक नर. डोळे मिटलेल्या गुलाबी गोळ्यांना ती प्रेमानं चाटू लागली.

ताडोबाचे वाघोबा

Submitted by आशुतोष०७११ on 3 November, 2015 - 12:36

ताडोबा अभयारण्य पावसाळ्यानंतर पुन्हा पर्यटकांसाठी १६ ऑक्टोबरपासुन खुले होणार ही बातमी वाचल्यासरशी मी ही १६ ऑक्टोबर याच दिवशी ताडोबाला सकाळची जंगल सफारी मिळतेय का याची चाचपणी चालू केली. ४-५ मित्रांनाही विचारुन बघितलं येण्याबद्दल. पण सगळ्यांचच तळ्यात मळ्यात चालू होतं.माझ्या दुर्दैवाने सकाळऐवजी दुपारची सफारी मिळत होती. १ल्या दिवसाच्या सगळ्या सकाळच्या सफारीज फुल्ल झाल्या होत्या.दुपारची का होईना पण १ल्याच दिवसाची सफारी मिळतेय म्हटल्यावर मी लगेचच बुक करुन टाकली, त्याच बरोबर पुढच्या ४ दिवसाच्या सफारीपण बुक केल्या. हॉटेल आणि रेल्वे बुकिंगला फारसे प्रयास पडले नाहीत.

विषय: 
शब्दखुणा: 

ताडोबा, कालेश्वरम व हेमलकसा

Submitted by मंजूताई on 24 December, 2014 - 01:37

पंचवीस वर्षे झाली नागपुरात येऊन पण अगदी जवळपासची ठिकाणं पाहायला जमली नाही. त्यातले एक ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प व दुसरे पंचमढी! गाडी गाडी पे लिखा है घुमनेवाले का नाम , ताडोबाचा अनपेक्षित योग आला. आमचे मित्र रागीट ह्यांच्या मित्राचे येणे रद्द झाले अन आयत्या गाडीत आम्ही नागोबा नागीण बसलो अन एक अविस्मरणीय निसर्ग, सामाजिक व धार्मिक असं त्रिवेणी पर्यटन घडलं. संध्याकाळी सात वाजता नागपूरहून निघालो व ऊर्जानगर (चंद्रपूर)ला साडेदहावाजता श्री निंबाळकर (श्री रागीट ह्यांचे मित्र) ह्यांच्या घरी पोचलो. निंबाळकरांचे घर ऊर्जानगर गेटपासून शेवटच्या टोकाला, रस्त्यावर शुकशुकाट!

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ताडोबा