Submitted by king_of_net on 19 October, 2020 - 06:48
नमस्कार मंडळी!
आपल्यापैकी कोणी जर ताडोबा सफर स्वतः प्लान करुन पार पाडली असेल तर क्रुपया मदत करा.
आम्ही तिघे (पालक / मुलगा) नोव्हेंबर मधे ताडोबाचा प्लान करत आहोत.. ४ ते ५ दिवस stay + २ दिवस प्रवास
२-३ ठिकाणी चौकशी केली.. पण त्यांच्याकडे फक्त २ दिवसांचाच आणी ट्रेन चा सेकंड क्लासचा प्लान आहे.
त्यांच्याबरोबर customization साठि बोलणे चालु आहे. पण सेफ म्हणुन हा खटाटोप.
खालील मुद्द्यांबद्दल माहिती हवी आहे.
१. मुबंईहुन प्रवासाचा उत्तम पर्याय
२. ताडोबाच्या आस-पास रहाण्याची चांगली सोय. MTDC / Tigar village resorts etc. नेट वर बघीतली आहेत, पण कोणाचा स्वानुभव असल्यास चांगलं
३. सफारी बुकिंग process, info etc
4. इतर महत्वाची माहीती
धन्यवाद!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Contact Go Wild - Mangesh
Contact Go Wild - Mangesh Desai
अरिष्टनेमी यांना विचारा.
अरिष्टनेमी यांना विचारा. त्यांचे अनेक लेख ताडोबा/पेंच वर लिहिलेले तुम्हाला इथे मिळतील.
धन्यवाद उनाडटप्पअ, टवणे सर !
धन्यवाद उनाडटप्पअ, टवणे सर !
ताडोबाला उन्ह्याळ्यात जावे,
ताडोबाला उन्ह्याळ्यात जावे, तरच जनावरे , वाघ बघायला मिळतात. तसे काही नसेल तर आत्ता जाऊ शकता.
आत्ता जावून फिरुन याल.
विनिता.झक्कास जी,
विनिता.झक्कास जी,
ताडोबामध्ये ३ वाघिणींनी प्रत्येकी २-३ बछड्यांना जन्म दिला आहे आणि सध्या त्यांचे दर्शन हमखास होते असं एकण्यातं आल आहे
तसेही उन्ह्याळ्यात ताडोबा बायकोला झेपणार नाही
हो का? अरे वा! जाच मग
हो का? अरे वा! जाच मग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उन्हाळा खरंच आपल्याला झेप्ण्यासारखा नसतोच. मी वर्ध्याहून परत आल्यावर महिनाभर आजारी होते त्या उन्हाने!
Twine Outdoors Jungle Safari
Twine Outdoors Jungle Safari
कपिल रानडे
https://www.maayboli.com/node/40601
माबोवरच वाचले आहे.
बघा आणि इथे प्रतिसाद ही लिहा
धन्यवाद निलुदा!!
धन्यवाद निलुदा!!
नक्की फोन करतो त्यांना
Nilufa, धन्यवाद इतक्या सुंदर
नीलुदा, धन्यवाद इतक्या सुंदर लेखाची लिंक दिल्याबद्दल.
_/\_
_/\_
ताडोबात जरी तीन वाघिणींनी
नमस्कार king_of_net,
ताडोबात जरी तीन वाघिणींनी बच्चे दिले असतील तरी ते दिसतील याची खात्री नाही. आता-आताच जरा बाहेर येऊ लागलेत.पण साधारण ४ सफारी केल्या तर वाघ दिसू शकतो. सध्या खात्री कशाचीच नाही.
१) मुंबईहून प्रवासाचा उत्तम पर्याय
मुंबईहून रेल्वे तर बंद आहेत सध्या. समजा सुरु झाल्याच तर ठीकच. विमानाने आलात तर, नागपूरचा विमानतळ अगदी नागपूर-चंद्रपूर रस्त्यावरच आहे. रेल्वे स्टेशन किंवा विमानतळाहून ताडोबाला जाण्यासाठी इनोव्हा वगैरे सोयिस्कर आहे. १३ रुपये किमीनुसार साधारणपणे ४,५००/- आणि छोटी गाडी घेतली तर ३८००/- वगैरे घेतील. तीन-साडेतीन तासाचा प्रवास आहे.
नागपूरहून चंद्रपूरला येताना वाटेत साधारण मधोमध ‘जाम’ हे गाव लागतं. तिथं हॉटेल अशोक आहे. चांगलं आहे. इथं जेवण करु शकता.
रेल्वेनं थेट चंद्रपूरला आलात तर १५०० रुपये वगैरे घेतील रिसॉर्टला सोडायचे. तासाभराचा रस्ता.
२) ताडोबाच्या आस-पास रहाण्याची चांगली सोय. MTDC / Tiger village resorts etc. नेट वर बघीतली आहेत, पण कोणाचा स्वानुभव असल्यास चांगलं
कोअरमध्ये फिरायचं असेल तर मोहर्ली आणि खुटवंडा या प्रवेशद्वारातून जाण्यासाठी मोहर्लीला रहाणं उत्तम. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं (MTDC) चांगलं रिसॉर्ट आहे. छान आहे ही जागा. (www.maharashtratourism.gov.in इथं बुक करु शकता.) हे ३ ते ४ हजार घेतात एका खोलीचे (खाण्याचे वेगळे.) टायगर व्हिलेज आणि सॅन्क्चुरी ताडोबा रिसॉर्ट्ससुद्धा उत्तम आहेत. आवडतील. इतरही भरपूर खाजगी रिसॉर्ट्स आहेत. साधारणपणे एका खोलीचे ३,०००/- ते ४,०००/- रुपये खाण्यासह घेतात. यापेक्षा वरच्या दर्जाची रिसॉर्ट्ससुद्धा आहेत.
इतर पर्यटकांची गजबज नको, छान निवांत आणि टापटीप पाहिजे असेल तर होमस्टेमध्ये थांबू शकता. उदा. सालई होम स्टे. उत्तम सोय होईल.
इच्छा असल्यास मोहर्लीकडून आगरझरी आणि देवाडा-आडेगाव इथून बफरची सफारी करता येईल.
कोअरच्याच नवेगाव किंवा कोलारा प्रवेशद्वारातून जाण्यासाठी कोलारा इथं थांबा. (नवेगावला पण दोन रिसॉर्ट्स आहेत.) कोला-याला भरपूर रिसॉर्ट्स आहेत, ४ हजारापासून ५० हजारांपर्यंत. तारु वन आणि स्वसारा रिसॉर्ट्स माझ्या माहितीत चांगली आहेत. बाकी पण भरपूर आहेत. इकडून कोलारा झोन, मदनापूर, नवेगाव झोन, सिरकाडा आणि अलिझंजा ही बफरची चांगली प्रवेशद्वारं आहेत.
कोलारा आणि मोहर्ली दोन्ही नागपूरहून सोयिस्कर आहेत. फक्त रस्ता वेगळा आणि अर्धा तास कोला-याला कमी लागेल इतकाच फरक.
३) सफारी बुकिंग process, info etc
www.mytadoba.org या ताडोबाच्या अधिकृत शासकीय साईटवर सफारी बुक करा. ताडोबामध्ये सफारी करण्यासाठी माणशी पैसे घेत नाहीत तर एका जिप्सीचे पैसे घेतले जातात. जिप्सीत एक माणूस बसो की सहा माणसं बसोत.
सध्या करोनामुळं चारच माणसांना बसू दिलं जातं. १० ते ६५ वर्षे वयोगटातल्याच पर्यटकांना सध्या प्रवेश दिला जातो. १० च्या आत आणि ६५ च्या वर प्रवेश नाही. बघूयात काही बदल झाले यात तर.
सफारीचे दरआता साधारणपणे खर्चाचा अंदाज बघा –
नागपूर – ताडोबा प्रवास = ४,५००/-
ताडोबा – नागपूर प्रवास = ४,५००/-
३ मुक्काम (राहणे व खाण्यासह) – ३ X ५,००० = १५,०००/-
६ सफारी = ६ X ५,००० (अंदाजे) = ३०,०००
असा एकूण ५४,०००/- साधारणपणे खर्च आहे. कमी अधिक धरुन साधारणपणे ५० ते ६० हजार लागतील.
४) इतर महत्वाची माहिती
अ) ६० ते १२० दिवस आधी बुक केलेली सफारी आणि तात्काळ सफारी रद्द होऊ शकत नाही.
ब) ४ ते ५९ दिवस आधी बुक केलेली सफारी १५ दिवस आधी रद्द केली तर ५०% पैसे परत मिळतात. नंतर रद्द केलं तर काहीच मिळत नाही.
जिप्सीचे 30000 कसे झाले. चार
जिप्सीचे 30000 कसे झाले. चार जण जाणार असतील तर किती लागतील? प्रत्येकाला 5000 रुपये द्यावे लागतील काय?
गडबड होते आहे काही तरी. मी
गडबड होते आहे काही तरी. मी सफारीचे दर टाकले आहेत, पण ते दिसत नाहीयेत.
सफारी कधी बुक करताय त्यावर दर अवलंबून आहेत.
१२० दिवस आधी आरक्षण सुरु होतं.
साधारणपणे ४,०००/- पासून ११,०००/- पर्यंत एक जिप्सी सफारी पडते.
King of net..
King of net..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Have a great trip
चांगली माहिती मिळते आहे.
@बोकलत
@बोकलत
३०,०००/- हा ६ सफारींचा अंदाजे खर्च आहे. सफारीचे पैसे एका जिप्सीचे असतात. पुढच्या महिन्यात यायचं असेल तर एका सफारीचे एका जिप्सीचे अंदाजे ५,००० रुपये. एका जिप्सीत किमान १ ते कमाल ६ माणसं जाऊ शकतात. सध्या कोव्हिड-१९ मुळं निर्बंध आहेत. नाहीतर ८ वर्षांच्या आतल्या मुलांना परमिटमध्ये नाव नसलं तरी जाता येतं.
तुम्ही ४ लोक जाणार असाल तर चौघांवर हा खर्च विभागून पडेल.
२२ आसनी कॅन्टर सफारी आता सुरु होतील. प्रत्येकी ४००/- रुपये घेतात. मोठा गट असला तर एका वेळी २२ लोक एकत्र जाऊ शकतात.
राहण्याचं आणि जिप्सीचं
राहण्याचं आणि जिप्सीचं डिस्कशन वर झाल आहे. पण ताडोबासाठी उन्हाळाच बेस्ट. उन झेपणारं नसतं पण वाघ दिसायचे चान्सेस वाढतात. पावसानन्तर सर्वत्र दाट झाडी असल्यामुळे लाईन ओफ साईट कमी होते. अगदी वाघ तुमच्या बाजूच्या जाळीत असेल तरी तो दिसणार नाही. तो तुम्हाला पाहील पण तुम्ही त्याला पाहू शकणार नाही. अर्थात बाकीची जनावरं भरपूर दिसतील. आम्ही २०२० च्या जानेवारीत गेलो होतो. पहिल्या नाईट सफारीत तो ओझरता दिसल्यामुळे आम्ही दिवसाच्या अजून २ सफारी बुक केल्या पण नन्तर काही दर्शन झाले नाही.
सविस्तर माहितीसाठी धन्यवाद
सविस्तर माहितीसाठी धन्यवाद अरिष्टनेमि! खुप उपयुक्त माहिती आहे.
निलुदाने दिलेल्या लींक वरील कपिलशी संपर्क साधुन Twine Outdoors मुंबईच्या विद्यानंद यांच्याशी सविस्तर बोलणे झाले.
त्यांना माझी नीकड निट समजावुन सांगीतली आणी त्यांच्याकडुन तुम्ही नमुद केल्या इतकेच कोट आले आहे.
ठाणे - नागपुर रेल्वे आणी विमान सेवा दोन्ही चालु आहेत..
चंद्रपूर रेल्वे सेवा सध्या बंद असल्यामुळे ताडोबा वाया नागपुर ऑप्शन हाताशी आहे.
रहाण्याची सोय पण मोहर्ली परीसरात होतेय.
बघु काय होते ते...
माहितीसाठी परत एकदा धन्यवाद!!
सविस्तर माहितीसाठी धन्यवाद
सविस्तर माहितीसाठी धन्यवाद अरिष्टनेमि>>>+1111
मला अजून एक विचारायचं आहे की सफारी बुकिंग आधीच ऑनलाईन करून ठेवावी लागते की तिकडे जाऊन पण करू शकतो.
@बोकलत
@बोकलत
कोअरमध्ये ऑनलाईन बुकींग करुनच जाता येतं. स्पॉट बुकिंग नाहीच.
बफरमध्ये स्पॉट बुकिंग आहे. उपलब्ध असेल तर मिळतं. नसलं तर नाही.
माहितीबद्दल धन्यवाद
माहितीबद्दल धन्यवाद अरिष्टनेमि.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकूण खर्चिक आहे .
एकूण खर्चिक आहे .
Srd, बरेच ग्रुप १० ते १२
Srd, बरेच ग्रुप १० ते १२ हजारांमध्ये विकांताचे पॅकेज देतात. ह्या मध्ये प्रवास, रहाणे, खाणे व ३-४ सफारी एवढ असतं...
प्रवास सेकंड ३ टायर कोच (मुंबई - नागपुर - मुंबई )
नागपुर - ताडोबा - नागपुर प्रवास
होम/हॉटेल स्टे, ३ वेळेचं खानं
३-४ सफारी