न उमजणारी माणसे

Submitted by मनोजकुमार देशमुख on 8 May, 2020 - 14:58

मुक्त सारे आभाळ आज
अशी कोंडलेली माणसे
ओरबाडून ही धरेला
जहर सांडलेली माणसे

वृक्षांची ती रम्य चादर
साफ कापणारी माणसे
निर्मळ पाणी हे नद्यांचे
कसे नासनारी माणसे

दूध संपवून स्तनातील
रक्त शोषणारी माणसे
हक्क मारून वंशजांचे
भोग पोसणारी माणसे

मीच स्वामी असे जगाचा
मिथ्या समजणारी माणसे
निसर्गाचा शाप विषाणू
सत्य न उमजणारी माणसे

Group content visibility: 
Use group defaults