संस्कृती
आंबट चुका (लंडन २)
हिमनग आणि सोळा वर्षे (लंडन १)
“काय गो, भाताचं काय करता तिकडे? आपला उकडा तांदूळ मिळतो का परदेशात?” लंडनहून पहिल्यांदा रत्नागिरीला गेल्यावर एका काकूंनी विचारलं.
“नाही, बासमती मिळतो.” मी त्यांची काळजी दूर करायच्या हेतूने म्हणाले, पण झालं उलटंच!
“मेलीस! रोज तो लांबलांब दाणा खायला लागतो की काय?” त्या ओरडल्या.
कोकणातला तांदूळ लंडनमध्ये मिळत नाही तो नाहीच, वर पोरीला रोज अख्खा बासमती खाऊन दिवस काढावे लागतायत म्हणजे परांजप्यांवर भलताच प्रसंग गुदरलाय असं वाटून काकूंना आमची फार दया आली होती त्यवेळी.
तांदळाची बोरं, विथ सम गपशप
' आजकाल धावपळीच्या युगात दिवाळीचा फराळ घरी करणे म्हणजे फारच अवघड काम. बाजारात वेगवेगळ्या दरांमध्ये हेच पदार्थ सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे सध्या विकतचेच गोड मानुन दिवाळी साजरी करण्याचा ट्रेंड आहे . पुर्वी घरच्याघरीच ४-५ पदार्थ तरी सहज बनवले जायचे आणि एवढ करुन देखिल ' यंदा जास्त काही करता आल नाही हो.. ' अशी खंत मनात बाळगणार्या गृहीनी अश्या फराळाच्या रंगतदार गोष्टी चविचविने सांगत. आजकालच्या स्त्रिया घर आणि ऑफीस दोन्ही सांभाळताना तारेवरच्या कसरती प्रमाने जीवनाची कसरत करत जगतात, तर हे सगळे पदार्थ करण्यासाठी आपल्याकडे किती वेळ असणार म्हणा ....
आपल्या सणावारांतुन नेमकं अपेक्षित ते काय??
आपल्या सण-वारांतुन नेमकं अपेक्षित ते काय??
रात्रीच्या साडेबारापर्यंत मोठ्या आवाजात डिजे आणि साऊंड लावुन दांडीयाच्या नावाखाली विक्षिप्त गाणी लावुन नाचत राहण किती योग्य आहे?
आमच्या कॉलनीत गेले 5 वर्ष नवरात्रीचा कार्यक्रम साजरा होत आहे.पण होणार्या त्रासाचा आलेख मात्र चढत्या क्रमाने आहे.या मंडळातर्फे गेल्या 9 दिवसांत फक्त अष्टमीच्या दिवशी पैठणीचा खेळ घेण्यात आला.फक्त लहान मुलांसाठी म्हणुन कोणताच खेळ /उपक्रम घेण्यात आलेला नाही.
तर गणपती,नवरात्रीसारखे सण तद्दन भंगार गाणी,विचित्र डान्स आणि लाऊड म्युझिकपुरतेच मर्यादित राहिलेत का?
अन्न, स्त्रीवाद आणि मी (मूळ लेखिका आर्किटेक्ट शीतल पाटील)
संस्कृतीच्या नावाखाली हजारो वर्षांचा लेप मनांवर बसला आहे. मनं अधू झाली आहेत. असंवेदनशील झाली आहेत. इतकी असंवेदनशील कि रांधा, वाढा, खरकटी काढा हि स्त्रियांची कामेच आहेत, यात बदलण्यासारखे काय आहे? असा कोडगा व निलाजरा प्रश्न सहजगत्या विचारला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी स्वत: त्या स्त्रीला सुद्धा याची जाण नसते. मानसिक गुलामगिरी सारखा दुर्दैवी प्रकार नसेल. नांगराच्या शोधानंतर निर्माण झालेली जमिनीची मालकी. त्यासाठी पुरुषांच्या हाणामाऱ्या. ती मालकी पुढे नेण्यासाठी वंश नावाचा प्रघात. व त्यातून पुढे निर्माण झालेला स्त्रियांवरचा मालकीहक्क.
खरेच सार्वजनिक गणेशोत्सव बन्द झाला पाहिजे.
प्राचिन ऋद्धि-सिद्धि विनायक मंदिर
निसर्गाच्या सानिध्यात असणार अस आमचं छोटंसं उरण हे मूर्ती लहान पण कीर्ती महान प्रमाणेच माझ्या ऋदयात घर करून आहे. आमच्या उरणमध्ये मोरा बंदर, करंजा बंदर व पिरवाडी -दांडा या निसर्गसंपन्न समुद्रकिनार्यांची झालर आहे. पिरवाडीचा समुद्रकिनारा हा आम्हा रहिवाशांसाठी मनःशांती, करमणुकीचे मोठे स्रोत आहे. सुट्टीच्या दिवसांत अनेक पर्यटक ह्या समुद्रकिनारी भेट देऊन मनात आनंद घेऊन जातात. उरणमध्ये पूर्वी खूप खाड्या होत्या, मिठागरे होती. परंतू आता औद्योगिककरणामुळे त्यांचे प्रमाण कमी आहे. तरीही काही खाड्या शाबूत आहेत. त्यातील पाणज्याची खाडी ही विदेशी रोहीत पक्षांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे.
भारत का दिल देखो : तान्हा पोळा, मारबत आणि गोटमार
भारत का दिल देखो : तान्हा पोळा, मारबत आणि गोटमार
इडा पीडा, रोगराई, भ्रष्टाचार घेऊन जाय गे मारबत ...
इबोला, स्वाईन फ्लू, मंदी घेऊन जाय गे मारबत..
काही अर्थ लागतोय का? नागपूरकरांना नक्कीच लागला असेल.
दरवर्षी येतो पावसाळा आणि पावसाळा संपता संपता येतो बैलपोळा.
इकडे विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भरतो तान्हापोळा.
“दहीहंडी” पुन्हा प्रकशित
“दहीहंडी”
शब्दरचना:- तुषार खांबल/महेश घाणेकर
काल रक्षाबंधनानिम्मित बहिणीकडे गेलो होतो. सोसायटीच्या आवारात १५-२० लहान मुले दहीहंडीचा सराव करताना दिसली. त्यांच्या एकंदरीत हावभावावरून हा सण कसा करायचा याबाबत चिंतातुर असावे असं वाटत होत.
त्यांच्याच दुसऱ्या बाजूला त्या सोसाटीमधील काही जेष्ठ (३५ ते ४५ वयोगटातल्या) व्यक्ती बसलेल्या होत्या. आम्ही असताना कसे सर्व छान चालायचं, कसे सण साजरे होत असत, आम्ही कसे थर लावायचो यावर फुशारक्या मारत बसले होते.