' आजकाल धावपळीच्या युगात दिवाळीचा फराळ घरी करणे म्हणजे फारच अवघड काम. बाजारात वेगवेगळ्या दरांमध्ये हेच पदार्थ सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे सध्या विकतचेच गोड मानुन दिवाळी साजरी करण्याचा ट्रेंड आहे . पुर्वी घरच्याघरीच ४-५ पदार्थ तरी सहज बनवले जायचे आणि एवढ करुन देखिल ' यंदा जास्त काही करता आल नाही हो.. ' अशी खंत मनात बाळगणार्या गृहीनी अश्या फराळाच्या रंगतदार गोष्टी चविचविने सांगत. आजकालच्या स्त्रिया घर आणि ऑफीस दोन्ही सांभाळताना तारेवरच्या कसरती प्रमाने जीवनाची कसरत करत जगतात, तर हे सगळे पदार्थ करण्यासाठी आपल्याकडे किती वेळ असणार म्हणा .... काही घरात मात्र अजुनही काही पदार्थ केले जातात. खुप सारे दिवाळीचे पदार्थ तर आजकालच्या मुलांना माहीतच नाहीत . असाच एक हरवलेला पदार्थ म्हणजे तांदळाची बोर.'
एक आठवण - ' सगळा फराळ केला तरीही आजीने बोर केली नाहीत तर आजोबा खट्टु होऊन बसायचे. " यंदा दिवाळीला काय मजा नाही बुवा " हे त्यांचं ठरलेल वाक्य. " म्हातार्याना बोर पाहीजेत ना.... करते मग... माझ्या मागे कोण करणार आहे हे सगळ. हयात आहे तोपर्यंत करते." अस म्हणत मग आजी दिवाळी संपता-संपता तरी बोर करायचीच.
' आता आजी पण राहीली नाही....आजोबाही गेले.... बोर ही कालवष झाली असच म्हणव लागेल. पण दरवेळेस दिवाळी आली की आजीची आठवण येते. आणि त्या आठवणीमध्ये बोराच स्थान अढळ .... मग मी एखादा शनीवार-रवीवार सगळ आवरुन बसते. आजीच्या आठवणी आणि बोर दोन्हीचा प्रपंच मांडून.... तर चला आज आठवणींची बोर करुया.
***
बोरासाठी तांदळाचं पीठ बनवण्यासाठीची कृती - इथे भाकरीसाठी वापरलेले पीठ न वापरता थोडे वेगळ्या प्रकारे बनवलेले पीठ वापरले जाते. स्वच्छ धुतलेले तांदुळा ४ तास भिजत घालायचे, मग व्यवस्थित निथळून घायचे . २-३ तास कडक उन्हामध्ये वाळवुन, जाड बुडाच्या पातेली मध्ये हलकेच खरपुस भाजायचे आहे. अजीबात काळे वगैरे करायचे नाहीत . थोडा दुधाळ रंग होई पर्यंत भाजावे. मगच दळणासाठी द्यायचे . आणि दळणार्याला द्यावयाच्या सुचनाही भारी असायच्या . " भाऊ जास्त बाईक करु नका हो. जास्त जाड ही नको. दुसरे कोणते धाण्य या दळणामध्ये मिक्स करु नका.... सेपरेटच दळा हो .... " काय आणि काय. बिचारा दळणारा... ' नक्की दळायच कस ' त्याच्या मनात प्रश्न येत असावा. एखादातर चटकन म्हणे , " वैनी तुम्हीच हे दळण करता का ? "
***
साहित्य- चार वाटी तांदळाचं पीठ, चार चमचे (टीस्पून) बारीक रवा , थोडे पांढरे तीळ , थोडी खसखस , २५० ग्रॅम गूळ , १ कप सुख \ओलं खोबरं , मीठ चवीपुरतं , तेल तळण्यासाठी , एक कप दुध.
.
कृती- एक पातेलं गॅसवर ठेवा आणि ते थोडं तापलं की २-३ पेला पाणी घाला. त्या पाण्यात गूळ घालून तो पातळ करुन घ्या. यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, तीळ, खसखस, खोबरं, मीठ , दुध हे सगळे घटक एकत्र करुन घ्या. हे मिश्रण थोड थंड झालं की मग हलक्या हाताने मळुन घ्यायचे . भाकरीच्या पीठाप्रमाने घट्टसर असेच मळून घावे . पातल करु नये.
आता याचे लहान-लहान बोराच्या आकाराची गोळे करावे आणि मंद आचेवर तळावे . एका वेळेस आपण कढई मध्ये १०-१५ बोरे टाकुन तळू शकतो. त्यामूळे जास्त वेळ लागत नाही. जास्त करपू देऊ नयेत.
.
टिप-
* बोरं तळताना त्यांना थोडे तडे गेले पाहिजे तरच ते कुरकुरीत लागतात. म्हणजेच बोर थोडीशी फुटली पाहीजेत.
* प्रत्येक पदार्थ करताना त्याच्या शी निगडीत कटू-गोड आठवणी मध्ये रमुन जा.... मग त्यामध्ये काही काही कमी-जास्त झाले तरी चालेल. त्याला जी चव येते ती पर्फेक्ट मेजरमेन्ट वापरुन केलेल्या पदार्थालाही येणार नाही.
सिद्धि चव्हाण
वेगळीच पाककृती!
वेगळीच पाककृती!
मस्तच.
मस्तच.
>>>>> " म्हातार्याना बोर पाहीजेत ना.... करते मग... माझ्या मागे कोण करणार आहे हे सगळ. हयात आहे तोपर्यंत करते." अस म्हणत मग आजी दिवाळी संपता-संपता तरी बोर करायचीच.>>>>>> हाहाहा
छान लागेल. प्रथमच ऐकतोय या
छान लागेल. प्रथमच ऐकतोय या पाकृविषयी.
लिहिलय सुध्दा खुप छान!
माझी आई करायची पूर्वी. आता
माझी आई करायची पूर्वी. आता तिलाही उरकत नाही व्याप. दोघांपुरतं जमेल तसं करते आणि लागेल ते विकत आणते. बोरं छान लागतात.
मुसलमानी गुलगुले हेच का ?
मुसलमानी गुलगुले हेच का ?
मस्त रेसिपी आणि फोटो.ही
मस्त रेसिपी आणि फोटो.
ही जागूची रेसिपी आठवली तुमची पाहून.
हे पहिल्यांदाच वाचतेय. पण पीठ
हे पहिल्यांदाच वाचतेय. पण पीठ दळून वगैरे आणायचं म्हणजे करायचा चान्स नाही. मस्त पाकृ आणि लेख सिध्दि!!
मी हे बोर प्रकरण याचवर्षी
मी हे बोर प्रकरण याचवर्षी पहिल्यांदा खाल्लं. खास भारतातून आलं होतं. ज्यांनी दिलं त्यांनीही आमच्याकडे प्रचंड आवडतं आहे सगळ्यांचं असं सांगून दिलं. मला ठीकच वाटलं. जेव्हा समोरची व्यक्ती एखाद्या पदार्थाचं खूप कौतुक करते पण आपल्याला तोच पदार्थ तितका काही भारी वाटत नाही तेव्हा ‘नॉस्टॅल्जिया’ हे मेन कारण असतं असं लक्षात आलेलं आहे.
@ सायो, किंवा चव डेव्हलप होणे
@ सायो, किंवा चव डेव्हलप होणे देखील असू शकेल
पण माझाही खूपद भ्रमनिरास होतो. विशेषतः सिनेमा अथवा गाण्यांच्या बाबतीत.
हो सामो, चव डेव्हलप होणं हे
हो सामो, चव डेव्हलप होणं हे ही आहेच.
छान. ह्याचं तिखट व्हर्जन कसं
छान. ह्याचं तिखट व्हर्जन कसं लागेल असा विचार करतेय.
बहुधा तिखट लागेल, राखी.
बहुधा तिखट लागेल, राखी.
@स्वाती - काय हे असं गुपित
@स्वाती - काय हे असं गुपित फोडायचं नसतं
लोल!
लोल!
छान आहे लेखन आणि रेसिपी.
छान आहे लेखन आणि रेसिपी.
फोटो छान आलाय, तळलेली बोर इथे
फोटो छान आलाय, तळलेली बोर इथे मिळणार्या डोनट-होल्स सारखी दिसतायत.
नॉस्टेलजिया बाबत सायोशी सहमत.
मस्त दिसतायत बोरं. एक तामिळी
मस्त दिसतायत बोरं. एक तामिळी मैत्रीण कृष्णजन्माष्टमीला यासारखा दिसणारा ‘चिडै’ नावाचा पदार्थ आणत असे. ते गोड आणि खारे/तिखट दोन प्रकारचे असत.
मस्तच! माझीही आजी करायची ही
मस्तच! माझीही आजी करायची ही बोरं. यात काळा भोपळा नसतो का? मीही खूप वर्षांत खाल्ली नाहीयेत, पण माझ्या आठवणीत या बोरांना भोपळ्याची चव आहे.
अह्हा! बोरं. मस्तच दिसताहेत.
अह्हा! बोरं. मस्तच दिसताहेत.
कुणी बोरांची पाकृ लिहिल असं वाटलं नव्हतं.
सिध्धी, तुमच्या पाकृ संकलित करुन ठेवा.
देवकी, सामो, शाली, प्रज्ञा९,
देवकी, सामो, शाली, प्रज्ञा९, BLACKCAT, स्वाती, सायो, स्वप्ना, राखी, चंद्रा, वावे, प्राजक्ता, अन्जू, राखी, सस्मित - प्रतिसादासाठी सगळ्यांचे आभार.
* शाली तुमची विपु जस्ट पाहीली... पाकृ आणि विपु काय योगायोग आहे.
* मुसलमानी गुलगुले हेच का ? - BLACKCAT नाही हा.... अजीबात नाही . गुलगुले वेगळे असतात.
* स्वाती - ही जागूताई ची रेसिपी म्हणजे गव्हाची बोर... ती ही करतात आमच्याकडे. ती कडक होतात थोडी... तांदळाची बोरं खुसखुशीत होतात. अस म्हणतात दात असतील त्याने गव्हाची बोर खावी.
* स्वप्नादी - भाकरीसाठी वापरतात ते पीठ ही इथे वापरता येते पण बोर थोडी चिवट होण्याची शक्यता असते . म्हणुन हे दळणीचे पीठ वापरतात.
* राखी -ह्याचं तिखट व्हर्जन अजीबात चांगल लागत नाही. थोडा ओवा आणि मिरची पावडर टाकुन करुन पाहील होत मी .
* वावे - यात काळा भोपळा नसतो.
* चंद्रा - ‘चिडै’ ची पाकृ असेल तर, जमल तर लिंक वगैरे देऊन ठेवा .
* सस्मित - थॅक्स...सगळ्या पाकृच ब्लॉगवर संकलित करुन ठेवलेल आहे.
हो माझी आई करायची हि बोरे
हो माझी आई करायची हि बोरे त्यात लहान चमचाभर भाजलेली बडीशेप चा कूट टाकल्यास अजून छान चव येते.
Mstch... Mi pn lahanpani
Mstch... Mi pn lahanpani shejari rahayche tyachakde khalleli ahe ... Bt ata khup varsh zali.. tu evdhi Chan bnvli ahet ... Ghevun aalis tr ajun Chan vatel... KY vichar ahe mg siddhi ... Andheri te belapur jast distance nahi ahe ..
मस्त पाकृ..
मस्त पाकृ..
वाह मस्त रेसिपी
वाह मस्त रेसिपी
छानच रेसीपी, ऑफैसात चघळायला
छानच रेसीपी, ऑफैसात चघळायला छान आहेत. मी ते चिडै खाल्लेले आहेत दातपाडू प्रकरण आहे. दिवाळी फराळात नॉ व्हेल टी म्हणून मस्त आहे प्रकार.
हा काळा भोपळा काय प्रकार आहे
हा काळा भोपळा काय प्रकार आहे बुवा????
भोपळ्याच्या पाच जाती आहेत :
भोपळ्याच्या पाच जाती आहेत :
कुकर्बिटा अर्जिरोस्पर्मा, कु. फिसीफोलिया, कु. मोशाटा, कु. मॅक्सिमा आणि कु. पेपो.
यातला कु. मोशाटा म्हणजे काळा भोपळा.
.
पिवळा, लाल, काळा, काशी ईत्यादी कलर असतात .
Ajnabi , Urmila, अंकु,
Ajnabi , Urmila, अंकु, urmilas, अमा - प्रतिसादासाठी थँक्स.
* Urmila Mhatre - Andheri te belapur jast distance nahi ahe. होना तू सुद्धा Andheri ला सहज येऊ शकतेस . दिवाळीच advance मध्ये invitation देते....नक्की ये. मग मी पण belapur ला येणार.
सिध्दि, धन्यवाद. पण हा भोपळा
सिध्दि, धन्यवाद. पण हा भोपळा काळा कुठे दिसतोय? आतुन काळा असतो का?
Siddhi ...दिवाळीच advance
Siddhi ...दिवाळीच advance मध्ये invitation देते....नक्की ये. मग मी पण belapur ला येणार. .. tu ye g aadhi .... Mi pn yein...
Pages