प्राचिन ऋद्धि-सिद्धि विनायक मंदिर
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 September, 2019 - 05:12
निसर्गाच्या सानिध्यात असणार अस आमचं छोटंसं उरण हे मूर्ती लहान पण कीर्ती महान प्रमाणेच माझ्या ऋदयात घर करून आहे. आमच्या उरणमध्ये मोरा बंदर, करंजा बंदर व पिरवाडी -दांडा या निसर्गसंपन्न समुद्रकिनार्यांची झालर आहे. पिरवाडीचा समुद्रकिनारा हा आम्हा रहिवाशांसाठी मनःशांती, करमणुकीचे मोठे स्रोत आहे. सुट्टीच्या दिवसांत अनेक पर्यटक ह्या समुद्रकिनारी भेट देऊन मनात आनंद घेऊन जातात. उरणमध्ये पूर्वी खूप खाड्या होत्या, मिठागरे होती. परंतू आता औद्योगिककरणामुळे त्यांचे प्रमाण कमी आहे. तरीही काही खाड्या शाबूत आहेत. त्यातील पाणज्याची खाडी ही विदेशी रोहीत पक्षांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे.
विषय:
शब्दखुणा: