प्रथमला निरोप द्यायला चित्रा दारात येऊन उभी राहिली. तो फाटकातून बाहेर पडेपर्यंत ती तिथेच थांबली. मनात बरीच कामं घोळत होती. प्रथम आता दोन तीन दिवस येणार नाही म्हणजे निवांतपणा होता. शांतपणे राहिलेलं काम हातात घेता येणार होतं. दार लोटून ती आत जाणार तेवढ्यात फाटकाच्या दिशेने परत येत असलेल्या प्रथमकडे तिचं लक्ष गेलं. पटकन पायर्या उतरत ती पुढे झाली.
"काय रे? काही राह्यलं का?"
प्रथमने तिचे दोन्ही हात हातात घेतले. त्याच्या नजरेतल्या व्याकुळपणाने तिचाच जीव घुसमटल्यासारखा झाला.
"प्रथम?" ती पुटपुटली.
ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश.
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १.
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट.
राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर.
राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा.
राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १.
राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ११. पिटी परेड.
सकाळी बराच उशीरपर्यंत झोपलो होतो . जाग आली आणि पाहिल तर मंजू अजूनही झोपली होती . ती इतका वेळ कधी झोपत नाही म्हणून पाहिले तर तिने डोळे उघडले आणि तिला बराच त्रास असल्याच जाणवल . ऑफिसला सुट्टी असल्यामुळे फार घाई नव्हती पण तिचा त्रास जरा जास्त वाटला त्यामुळे नुसता आराम न करता डॉक्टरांकडे जाण्याबद्दल तिला सुचवल . ती सुरूवातीला नाही म्हणाली पण तिला जास्त त्रास होत असावा ज्यामुळे ती तयार झाली डॉक्टरांकडे यायला .डॉक्टरांकडे पोहोचल्यावर पटकन नंबर मिळाला .
मधुरा सुंद्रीकर ला फेसबुकवर जबरदस्त फॅन फॉलोइंग होतं. ती काही रोजच आपले फोटो अपलोड करत होती असे नाही. एखादे दिवस गॅप देखील घ्यायची. तिच्या फोटोंमुळे घायाळ झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. ती जेव्हां जेव्हां लॉगिन करीत असे तेव्हां ९०० + फ्रेण्ड रिक्वेस्टी पेंडींग असलेल्या दिसत. त्या वेळीच क्लिअर केल्या नाहीत तर मात्र हा आकडा फुगत जऊन एक दिवस प्रोफाईलचं काही बरं वाईट होईल असं वाटून ती आपल्या कोमल बोटांनी अनेकांच्या रिक्वेस्टींवर कात्री चालवत असे. स्त्री प्रोफाईल्सकडून तिला कमीच रिक्वेस्टी येत.
सकाळी आश्विन दचकून जागा झाला असं म्हणता येणार नाही.
रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागलाच नव्हता. झोप नव्हती, तर जाग येण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो?
पण अशा प्रसंगी कोणाच्याही मनात यावी तशी स्वाभाविक शंका आश्विनच्या मनात आली – तो जागा आहे? की स्वप्नात आहे?
पण त्याला एकदम जाणवतं की नाही, हे स्वप्न नाही.
दु:खाचे ते सगळे क्षण आश्विनला आठवतात.
तो मुकाट्याने उठतो. सवयीने आंघोळ उरकतो. तो तयार होतो तेव्हा रोजच्याप्रमाणे सकाळचे साडेसहा वाजलेले असतात.
आधीच्या भागानंतर बरीच गॅप आल्यामुळे आधीच्या भागांची लिंक देतो आहे.
मना तुझे मनोगत - १ - http://www.maayboli.com/node/54052
मना तुझे मनोगत - २ - http://www.maayboli.com/node/54066
*************************************************************************************************************
"हॅलो..."
"तू फोन करणार होतास ना?"
"हो.. म्हणजे, योगेशला विचारतो. त्याला माहिती असेल कदाचित." राहुलनी फोन योगेशला दिला.
"हॅलो...., मी योगेश बोलतोय.."
"सॉरी, फोनवर राहुल आहे कळालच नाही मला!"
"हो..."
"तुझ्या घरी फोन केला होता तेव्हा तू राहुलकडे आहेस असं सांगितल तुझ्या आईनी.."
"अहो सर कशाला विषाची परीक्षा घ्यायला निघाला आहात तुम्ही ? आणि बाकी फक्त तुम्ही तुमच्यापुरता निर्णय घेत असता तर माझा काही अधिकारही नव्हता तुम्हाला विरोध करायचा पण तुम्ही इतक्या मुलांना सोबत घेऊन जायचं म्हणत आहात मी कशी परवानगी देऊ ? आणि ज्यांना घेऊन जाणार आहात त्या मुलांच्या पालकांची परवानगी नको का ? आणि एकदा का त्यांना समजलं की मुलांना कुठे घेऊन जायचं म्हणत आहात तर शाळेवरची कौलच काय पण आपल्या डोक्यावरचे केसही शिल्लक राहणार नाहीत . "
" ते का सर ? "
" अहो इतके जोडे पडल्यानंतर केस राहतील का ? "
" ते नाही सर मी म्हणतोय ते लोक अस का करतील ? "