नातेसंबंध

खरा पुरुषार्थ

Submitted by विनोद मेस्त्री on 17 May, 2017 - 04:10

काल पनवेलवरून घरी जाताना गाडीचा टायर पम्चर झाला. हायवे शेजारी पेट्रोलपंपाला लागून असलेल्या एका पम्चर काढणाऱ्याजवळ गाडी घेवून आलो. तो वयानं तिशीतला असावा. त्याचं काम चालू होतं आणि मी देखरेख करण्यासाठी बाजूला उभा होतो. तो होता पक्का बोलबच्चन. तोंडाची सतत बड़बड़ चालू होती. माझ्याकड़े पर्याय नसल्यामुळे मीही गप्पा चालू केल्या. त्याच्याविषयी विचारपुस चालू केली आणि कळलं त्याचं लग्न झालंय. तो सांगत होता. “सर मेरी बीवी ग्रॅज्युएट है. वो भी सायन्समें. लेकिन शादी तय होते वक्त मैंने साफ़ कह दिया. शादी के बाद पढ़ाई छोड़नी पड़ेगी. और जॉब नही कर सकती. साब ये औरते अगर जॉब करे ना तो इनके तेवर बदल जाते है.

सावट

Submitted by मोहना on 3 April, 2016 - 20:18

प्रथमला निरोप द्यायला चित्रा दारात येऊन उभी राहिली. तो फाटकातून बाहेर पडेपर्यंत ती तिथेच थांबली. मनात बरीच कामं घोळत होती. प्रथम आता दोन तीन दिवस येणार नाही म्हणजे निवांतपणा होता. शांतपणे राहिलेलं काम हातात घेता येणार होतं. दार लोटून ती आत जाणार तेवढ्यात फाटकाच्या दिशेने परत येत असलेल्या प्रथमकडे तिचं लक्ष गेलं. पटकन पायर्‍या उतरत ती पुढे झाली.
"काय रे? काही राह्यलं का?"
प्रथमने तिचे दोन्ही हात हातात घेतले. त्याच्या नजरेतल्या व्याकुळपणाने तिचाच जीव घुसमटल्यासारखा झाला.
"प्रथम?" ती पुटपुटली.

जोडप्यांसाठी : परस्पर-नातेसंबंधातील लाल बावटे (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 5 June, 2014 - 07:35

वर्तमानपत्रांमध्ये किंवा टीव्हीवर आपण संशयापोटी, भांडणातून किंवा अन्य काही कारणांतून जोडीदाराचा खून, हल्ला, हिंसा, अ‍ॅसिड अ‍ॅटॅक यांबद्दलच्या बातम्या आजकाल रोजच वाचत व पाहात असतो. काही वेळा त्या क्षणी तोल ढळणे, मानसिक संतुलन बिघडलेले असणे ही कारणे जरी ग्राह्य धरली तरी कित्येकदा अशा घटनेची चाहूल ही हिंसाचार करणार्‍या व्यक्तीच्या इतर वर्तनातून अगोदरच लागलेली असते.

आठवणी आजोबांच्या

Submitted by आशयगुणे on 9 April, 2012 - 17:37

सकाळचे ९ - ९.३० वाजले आहेत. मी बेडरूम मधून डोळे चोळत चोळत बाहेर येतो. आईने 'तोंड धु' असा आदेश दिलेला आहे. परंतु मी जातो हॉल मध्ये. हॉल सुरु होतो तिथल्या भिंतीआड उभा राहून मी कोपऱ्यातल्या सोफ्याकडे बघतो. सोफ्यावर पायांचा त्रिकोण करून पेपर वाचत एक व्यक्ती बसलेली आहे. पेपर इतका पसरलेला आहे की कंबरेपासून डोक्यापर्यंत सारे काही त्याच्या आड गेले आहे. मी गालातल्या गालात हसतो....हळूच तिकडे जातो...आणि पेपरवर हात मारून तो उस्कडून टाकतो. आपल्या वाचनात विघ्न आणू पाहणाऱ्या ह्या राक्षसाला शिक्षा न करता ती व्यक्ती त्याला उलट प्रश्न विचारते, " काय!

गुलमोहर: 
Subscribe to RSS - नातेसंबंध