नमस्कार मायबोलीकर,
संयुक्ताद्वारे आजपर्यंत मायबोलीवर अनेक समाजाभिमुख, चर्चात्मक व स्त्रियांसाठीचे उपक्रम यशस्वीपणे राबविले गेले आहेत. माहितीजालाच्या जगतात या उपक्रमांबद्दल एकत्रित स्वरूपात वाचता यावे यासाठी 'संयुक्ता' विजेट कोड आणि 'संयुक्ता' फेसबुक पान हे दोन उपक्रम अंमलात आणले गेले. आज ते आपल्यासमोर आणताना आनंद होत आहे.
१. संयुक्ता विजेट कोड
स्त्रियांबाबत केली जाणारी हिंसा ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु दिवसेंदिवस या हिंसेचे वाढत चाललेले उग्र रूप ही एक अत्यंत चिंतेची व शरम आणणारी वस्तुस्थिती बनत चालली आहे. आजूबाजूच्या या परिस्थितीकडे काणाडोळा करून उपयोग नाही, कारण त्याची झळ कधी तुम्हांला लागेल ते सांगता येत नाही. अनेकदा स्त्रियांचे बाबतीत घडणारा हिंसाचार हा त्यांच्या जोडीदाराकडून होतो. इ.स. २०१२मध्ये हत्या झालेल्या स्त्रियांमधील जवळपास अर्ध्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबसदस्याकडून मारल्या गेल्या.
सध्याच्या काळात गुंतवणूकीला पर्याय नाही. सुरक्षित भविष्यासाठी आपले पैसे वेळीच योग्य ठिकाणी गुंतवायला हवेत याची जाणीव बहुतांश जोडप्यांना आहे. त्या दृष्टीने नवरा-बायको मिळून वा एकेकटे अनेक ठिकाणी उपलब्ध पैसे, गरज आणि पर्यायांनुसार गुंतवणूक करत असतात. प्रश्न असा आहे, की अशा गुंतवणूकीची माहिती, त्यांची कागदपत्र कुठे ठेवली आहेत हे एकमेकांना माहित असतात का?
वर्तमानपत्रांमध्ये किंवा टीव्हीवर आपण संशयापोटी, भांडणातून किंवा अन्य काही कारणांतून जोडीदाराचा खून, हल्ला, हिंसा, अॅसिड अॅटॅक यांबद्दलच्या बातम्या आजकाल रोजच वाचत व पाहात असतो. काही वेळा त्या क्षणी तोल ढळणे, मानसिक संतुलन बिघडलेले असणे ही कारणे जरी ग्राह्य धरली तरी कित्येकदा अशा घटनेची चाहूल ही हिंसाचार करणार्या व्यक्तीच्या इतर वर्तनातून अगोदरच लागलेली असते.
काही दिवसांपूर्वी एक लेख वाचनात आला. त्यातील ''सुपरवूमन सिंड्रोम'' या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले. मग जालावर थोडी शोधाशोध केल्यावर या विषयाशी संबंधित पुष्कळ लेख मिळाले. बरीच अभ्यासपूर्ण माहिती वाचनात आली. उपयुक्त वाटली. त्याच माहितीचा सारांश येथे देत आहे.
बायका लिहा-वाचायला शिकू लागल्या, घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करू लागल्या, स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागल्या.... पण त्यानुसार त्या करत असलेल्या घरातील पारंपारिक कामांमध्ये काही फरक झाला का?
स्थळ : पुण्यातील सुप्रसिद्ध बी. एम. सी. सी. कॉलेजचे टाटा सभागृह. सकाळची वेळ. खच्चून भरलेल्या सभागृहातील तरुण विद्यार्थिनींमध्ये उत्सुकता, कुतूहल व कार्यक्रम सुरू होण्याअगोदरची अस्वस्थ चुळबूळ. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होते. पांढरे टी-शर्ट व निळ्या जीन्स या वेशातील तरतरीत कॉलेज कन्या मायक्रोफोनचा व मंचाचा ताबा घेतात. समोरील श्वेतपटावर सरकणार्या अतिशय नाजूक व संवेदनशील विषयावर आधारित चित्रांसोबत दिल्या जाणार्या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच सभागृहातील अस्वस्थ चुळबूळ थांबते व सार्या श्रोत्या तरुणी - स्त्रिया बघता बघता कार्यक्रमाच्या विषयात समरस होऊन जातात...
विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणार्या स्त्रियांची थोडक्यात माहिती इथे संकलित करूयात.
ही माहिती आपल्या मुलामुलींना आवर्जून वाचायला द्या / वाचून दाखवा. समाजात फार काही आदर्श राहिलेले नाहीत. या आणि अशा काही ठिणग्याच आपल्या मुलामुलींकरता मार्गदर्शक ठरतील.
जगाच्या पाठीवर सर्वच स्त्रियांना कधी ना कधी लैंगिक शोषणाचा / उपद्रवाचा सामना करावा लागतो. अश्लील शेरे, स्पर्श, शीळ, कटाक्ष वगैरे गोष्टी तर नेहमीच्याच असतात. कदाचित त्यांना सामान्य असेही म्हणता येईल. आणि अर्थार्जन करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांनाही अशा अनुभवांना सामोरे जावे लागते. अनेकदा पुरुषप्रधान कार्यक्षेत्रात पदार्पण करताना स्त्रियांना त्याचा जास्तच उपद्रव होतो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण हे एकाप्रकारे हिंसेचेच दुसरे रूप आहे.
'फक्त स्त्रियांसाठी' असा ग्रूप तर तयार केला खरा, पण करतात काय या बायका मिळून? या ग्रूपसंबंधी माहितीच्या धाग्यावरुन साधारण कल्पना येत असली तरी नेमकं काय चालू आहे? अश्या प्रकारचे प्रश्न हल्ली अधूनमधून लोकांकडून ऐकले. 'संयुक्ता' सुरु होऊन ४ महिने होत आले आहेत. सदस्यांच्या संख्येनेही शतक ओलांडले आहे. काही उपक्रम हळूहळू मूळ धरत आहेत. तेव्हा वाटलं सगळ्या मायबोलीकरांशी बोलायची ही चांगली वेळ आहे, म्हणून हा प्रपंच!