सांगते ऐकाऽऽऽ

Submitted by लालू on 13 November, 2009 - 21:23

'फक्त स्त्रियांसाठी' असा ग्रूप तर तयार केला खरा, पण करतात काय या बायका मिळून? या ग्रूपसंबंधी माहितीच्या धाग्यावरुन साधारण कल्पना येत असली तरी नेमकं काय चालू आहे? अश्या प्रकारचे प्रश्न हल्ली अधूनमधून लोकांकडून ऐकले. 'संयुक्ता' सुरु होऊन ४ महिने होत आले आहेत. सदस्यांच्या संख्येनेही शतक ओलांडले आहे. काही उपक्रम हळूहळू मूळ धरत आहेत. तेव्हा वाटलं सगळ्या मायबोलीकरांशी बोलायची ही चांगली वेळ आहे, म्हणून हा प्रपंच!

शर्मिला फडकेंनी लोकसत्ताच्या 'ती'चं जग मध्ये संयुक्ताचा उल्लेख केला आणि 'संयुक्ता'चं नाव सर्वांना माहीत झालं. तेव्हा ग्रुपची सुरुवात नुकतीच झाली होती. तशी कल्पना होती पण शर्मिला फडकेंनी असा विश्वास व्यक्त केला की लवकरच संयुक्ताचं काम सुरळीत आणि जोरात सुरु होईल. त्यामुळं आता काहीतरी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव झाली. म्हणजे नोबेल मिळाल्यावर ओबामाच्या शब्दांत 'कॉल टु अ‍ॅक्शन' हो. Happy त्या लोकसत्तातल्या बातमीचा सदस्यसंख्या वाढण्यासाठी मात्र खूप उपयोग झाला.

संयुक्तातर्फे घेण्यात आलेली गुंतवणूक बँकर समिता शहा यांची मुलाखत तुम्ही वाचलीच. अश्याच अजून काही येऊ घातल्या आहेत. याबरोबरच संयुक्ताच्या सदस्य असलेल्या काही स्त्रिया अश्याच वेगळ्या क्षेत्रात काम करतात. त्यांच्या कामाची माहिती देता यावी, अनुभवांची देवाण-घेवाण करता यावी यासाठी ग्रुपमध्ये एक नवीन कार्यक्रम "माझा छंद माझा व्यवसाय' सुरु केला आहे. करियरबद्दल किंवा छंदाबद्दल माहिती देणारे लेख या मालिकेत येतात. उद्देश असा की त्या क्षेत्रात कोणाला जाण्याची इच्छा असल्यास उपयोग व्हावा, नवीन क्षेत्रांची माहिती मिळावी.

सदस्य anudon हिच्या कल्पनेनुसार 'चिंतन' हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये स्त्रियांनी स्त्रीविषयक प्रश्नांवर लिहिलेले लेख, साहित्य वाचनासाठी उपलब्ध करुन त्यावर चर्चा करुन मते मांडावी असा विचार आहे. यामधील लेख स्त्रियांना चिंतन करायला भाग पाडून काही प्रश्नांची उत्तरे शोधायला, स्वतःला ओळखायला मदत करतील तर काही नवीन प्रश्नही तयार करतील.

माहिती संकलनाचे कामही सुरु आहे. यामध्ये जगभरातल्या स्त्रियांना मदत करणार्‍या संस्थांची माहिती एकत्र करण्यात येईल. यासाठी मायबोली प्रशासनाचीही मदत होत आहे. या प्रकारच्या माहितीची गरज भासेल अशा एक दोन केसेस नुकत्याच संयुक्ताकडे आल्या आहेत. कौटुंबिक समस्येशी सामना करणार्‍या या स्त्रियांना संयुक्ताचे सदस्य स्वतःच्या तसंच त्यांच्या इतर मैत्रिणींच्या अनुभवांतून मिळालेल्या माहितीचा उपयोग करुन या स्त्रियांना सर्वतोपरी मदत करायचा प्रयत्न करत आहेत. संयुक्ता मधून अशी एखादी संस्था उदयाला येईल का याचे उत्तर आत्ताच देता येणार नाही, पण ज्या संस्था आधीच या प्रकारचे काम करत आहेत त्यांच्या जोडीने संयुक्ताला नक्कीच काम करता येईल.

संयुक्ताचे क्षितीज अजून निश्चित झालेले नाही पण ते रुंदावण्याची संधी नक्कीच आहे. आम्ही 'आरंभशूर' नव्हतोच, काही मोजके पण सकस उपक्रम सातत्याने चालू ठेवण्याचा मानस आहे. यासाठी मायबोलीकरांच्या शुभेच्छा मिळाव्यात ही सदिच्छा!

धन्यवाद.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>अश्या प्रकारचे प्रश्न हल्ली अधूनमधून लोकांकडून ऐकले
काहीही... सरळ सांगा ना की या गृपची प्रसिध्धी करायची आहे ते...ऊगाच नसता आव कशाला? होतं असं. फक्त मेंबरशीप देवून गृप उघडला की कुणी ढुंकून पहात नाही अन मग शेवटी असं पब्लिकली सांगायची वेळ येते. काय? Happy

काहीही नाही हो, खरंच. लोक मला विचारतात, त्यामुळे ते मलाच माहित, तुम्हाला कसे कळणार? तसंच ग्रुपमध्ये काय चाललंय याची माहिती बाहेर लोकांना अधूनमधून देऊ हे आधीच सांगितले होते. काही सांगण्यासारखे झाले तेव्हा सांगितले.
या ग्रुपमध्ये मेम्बरशिप देण्याची जी पद्धत आहे ती बदलण्याचा विचार नाही. तुम्ही स्त्री असाल आणि मेंबर होण्याची इच्छा असेल तर संपर्क करा. पण तिथे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सहभाग घेणे महत्वाचे आहे. नुसतीच सभासद संख्या वाढवण्यात अर्थ नाही. काय? Happy

संयुक्ताच्या सर्व आईबहिणींना माझ्या शुभेच्छा!

हिवरे बाजारचे पोपटराव पाटिल जसे म्हणतात तसे तळागाळातील लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा. माझा छंद माझा व्यवसाय यातून फक्त व्यवसाय करणार्‍या स्त्रीयांची माहिती फक्त न मिळवता चार जणींना त्या व्यवसायाचा ... त्या माहितीचा कसा उपयोग होईल याचाही विचार करा.

माझं नाव अवंतिका. तुमचा उपक्रम खूपच चांगला आहे. मलाही जॉइन व्हायचं आहे. ग्रुपचे मेंबर नेमकं करतात? सहभाग कसा नोंदवावा?

तुम्ही मला माबोवरून संपर्क करा. त्यात तुमचा फोन नंबर द्या. मी तुम्हाला फोन करेन आणि मग तुम्हाला सदस्यत्व देता येईल.

छोटी सूचना :

माहिती संकलनाचे कामही सुरु आहे. यामध्ये जगभरातल्या स्त्रियांना मदत करणार्‍या संस्थांची माहिती एकत्र करण्यात येईल.>> अशी काही माहिती संकलित झाली असेल तर ती फक्त संयुक्तापुरती मर्यादीत ठेवू न ठेवता सर्वांना दिलीत तर त्याचा अधिक उपयोग होउ शकेल.

अच्छा हे पान आहे का , धन्यवाद हे उपक्रम असेच चालु ठेवावेत. यात महीला बचतगटांची ही माहीती जर एकत्र करता आली तर बर होइल आज बचत गटांच्या माध्यमातुन स्त्रीया विशेषतः ग्रामीन भागात एकत्र येण्याच प्रमाण खुप आहे
माझ्या कडुन सर्व सहकार्य आणि शुभेच्छा !!!!
महीला दिन जवळ आलाय त्या साठी काही उपक्रम करता येतील का

घारुआण्णा,
तुम्हाला अश्या बचतगटांबद्दल माहिती असेल तर इमेलने आम्हाला कळवू शकता.

>>महीला दिन जवळ आलाय त्या साठी काही उपक्रम करता येतील का
हो. पूर्वतयारी चालू आहे. लवकरच सर्वांना कळवू.

वा छान. अनेक शुभेच्छा!
मला वाटले होते तुम्ही नुसतेच 'हळदीकुंकु' करत, जाचक व खटकणार्‍या शब्दात पुरुषांना नावे ठेवता. म्हणून मी सभासदत्व घेतले नाही.
असो. तुमचे तुम्ही काय करता आहात ते करा, उगाच मी सभासद झालो, तर, जसे इथे मी लिहायला लागलो की बा. फ. बंद पडतात, तसे तुमचे व्हायला नको. तेंव्हा सभासद न होणे हेच मा़झे योगदान.

झक्की,
Lol Lol
मला वाटते फक्त स्त्रीयांचा ग्रुप आहे..तुम्ही मेंबर होतो म्ह्ट्ले तरी होता येणार नाही Lol
बरोबर ना लालू?

झक्की Rofl

लालू, खरय बर्‍याच लोकाना [मला पण] उत्सुकता होती की नक्की करतात काय.. सांगितल्याबद्दल धन्यवाद...

ही माहिती देऊन बरेच दिवस झाले. 'मराठी भाषा दिवस', महिला दिन, महिला दिन सर्वे इत्यादी बरेच उपक्रम सर्व मायबोलीकरांच्या सहभागासाठी किंवा त्यांच्या फक्त वाचनासाठी संयुक्तातर्फे घेतले/उपलब्ध केले गेले. असे असूनही बर्‍याच मायबोलीकरांना (पुरुष आणि स्त्रियांनाही) इथे असा काहे ग्रूप आहे याची अजूनही कल्पना नाही ही वस्तुस्थिती आहे. ग्रूपच्या कामाबद्दल वर लिहिल्याप्रमाणे वेळोवेळी माहिती देण्यात येईलच पण मायबोलीवर 'संयुक्ता'ची ( आणि यासारखे अजून काही खास ग्रूप्स आहेत) त्यांची माहिती सहजासहजी मिळावी असं काहीतरी करण्याचा विचार आहे.

या ग्रूपबद्दल सार्वजनिक धाग्यांवर बोलणे पूर्ण निषिद्ध वगैरे काही नाही. कोणालाही माहिती हवी असेल, सदस्य व्हायचे असेल तर माहिती आणि खालील लिन्क्स द्यायलाच हव्यात. पण फक्त सदस्यांसाठी असलेल्या ग्रूपच्या, ग्रूपमध्ये मोकळेपणाने होणार्‍या चर्चेबद्दल काय बोलावे याचे काही संकेत सदस्यांनी पाळणं आवश्यक आहे. याबद्दल काही शंका, प्रश्न असल्यास जरूर विचारा.

वर्षू, तुम्ही सदस्य होण्यासाठी आवश्यक ती माहिती कळवा. ग्रूपमधले धागे वाचून तुम्हाला कल्पना येईल किंवा विचार करता येईल.

धन्यवाद.

मराठी भाषा दिवस
http://maayboli.com/marathibhashadin/2010

महिला दिन
http://maayboli.com/mahiladin/2010

सर्व्हे रिपोर्टस
http://maayboli.com/node/14027

निंबुडा, तुम्ही आवश्यक ती माहिती कळवली असेल तर रैना फोन करेल.
तुम्हाला व्यक्तिशः ओळखणारी कोणी सदस्य असेल तर सांगा.

तुम्हाला व्यक्तिशः ओळखणारी कोणी सदस्य असेल तर सांगा.

कविता नवरे....आम्ही डोंबिवली गटगला भटलो आहोत.
आणि जाईजुई.... आम्ही दोघी एकाच कंपनीत कामाला आहोत.

मलासुद्धा संयुक्ता मधे प्रवेश हवा आहे. मुग्धानंद माझी मैत्रिण आहे आणि बस्के माझी मामेनणंद आहे. त्या दोघींनी या गटात ये म्हणून सांगितले आहे पण जॉईन कसे करतात हे माहित नाही.

Pages