१० वी 'क' - भाग १
१० वी 'क' - भाग २
शाळेत जावं की नाही या विचारात असतानाच आईसाहेबांनी फर्मावलं "सच्चू, आज शाळेत जायचंय रे. आज कंटाळा करशील तर संपूर्ण वर्षभर दांड्याच मारत राहशील." आता मातोश्रींचा हुकूम मोडणं तर शक्यच नव्हतं. पहिलाच दिवस असल्यामूळे वर्गशिक्षक नेमण्यात, मुला-मुलींची ओळख करून घेण्यात आणि सर्व विषयांचं दिवसाचं आणि आठवड्याभराचं वेळापत्रक ठरवण्यातच दिवस जायचा म्हणून मग मराठी, हिंदी या दोन पुस्तकांसोबत एक वही दप्तरात टाकली आणि पाल्याच्या घरी निघालो.
पत्र....पत्रपेटीत चक्क भारतातून आलेलं पत्र! स्मिताला आश्चर्यच वाटलं. किती काळ उलटून गेला अशी पत्र
येऊन. इ मेल, फोनचा काळ सुरु झाल्यापासून जाहिराती, सवलती अशाच गोष्टीसाठी त्या पेटीचा उपयोग. घाईघाईने तिने पत्र कुणाकडून आलं आहे ते पाहिलं. मंजिरी सावंत. कोण ही मंजिरी? काही केल्या तिला नाव आणि चेहर्याची सांगड घालता येईना. स्मिताने घाईघाईने तिथेच पत्र उघडलं आणि उभ्या उभ्या वाचत राहिली.
प्रिय स्मिता,
रुचिता चपलेचा तुटलेला बंद पायाच्या अंगठ्यात आणि त्याच्या शेजारच्या बोटात घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत तशीच फरपटत चालत होती. ‘आत्ता जवळ मोबाईल असायला हवा होता...कोणालातरी घ्यायला तरी बोलावलं असतं. आता मेन रोड पर्यंत चालत जाव लागणार ! मग तिथे रिक्षा मिळेलच....’ कपाळावर आठ्या आणत ती स्वतःशीच पुटपुटत होती.
गारपिटीचा मारा असह्यच होता. उभं पीक जेमतेम १० मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे आडवं झालं होतं. गुडघ्यात डोके घालून धर्मा शेताकडे तासन्तास बघत राही. कर्जाच्या डोंगराखालि दबून गेलेला धर्मा आताशी कुठे वर यायची स्वप्ने बघू लागला होता. आणि या आक्रिताने त्या स्वप्नांची धूळधाण उडवली होती.
गारपीटग्रस्तांना मदत घोषित झाल्यावर धर्माला आशेचा किरण दिसला. आमदारसाहेबांनी स्वतः गावात येऊन २ शेतकर्यांना मदतीचे चेक स्वहस्ते दिले. मामलेदार कचेरीत जाऊन आता फक्त चेक घेऊन आले की आपल्याला कसलीच काळजी राहणार नाही अशी त्याची खात्रीच पटली.
वैभवी आणि मुक्ताची मैत्री झाली हे एक आश्चर्यच होतं. मुळात, त्यांच्या ओळखीला मैत्री म्हणणं हेच एक आश्चर्य होतं. पण इतरांना त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. इतरांच्या मते त्या दोघी पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच्या मैत्रिणी होत्या.
"उशीर होईल यायला. वाट नको पाहू." विकासने केस सारखे करत आरशात पुन्हा नजर टाकली.
"कुठे चालला आहेस?"
"च्यायला, विचारलंस कुठे म्हणून? लागली पनवती आता." हातातला कंगवा भिरकावीत तो सुमतीच्या दिशेने वळला.
"दादा..." खुर्चीत वाचत बसलेली कविता संतापाने उठली.
"तोंड आवर आणि हे काय वागणं तुझं."
"गप गं. सालीऽऽऽ मला शिकवते." शर्टाची कॉलर नीट करत विकास म्हणाला.
मी आणि प्रसाद एकाच कॉलेज मधले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरला एक शांत मुलगा चौथ्या -पाचव्या बाकावर येउन बसला आणि एक मितभाषी मुलगा अशी त्याची पहिली छाप माझ्यावर पडली. मी देखील फार बोलकी वगेरे नाही. पण ओळख आणि मैत्रीची खात्री पटली की मी अगदी मनापासून गप्पा मारते. हळू हळू कॉलेज मध्ये सर्वांशी ओळख होत होती आणि मित्र-मैत्रिणी ह्यांची संख्या वाढत होती. पण ह्याचे मितभाषी असणे अजूनही तसेच होते. जे काही शिकवले जायचे ते मात्र अगदी व्यवस्थित वहीत उतरवून घ्यायचा तो. आणि एके दिवशी 'फौंडेशन कोर्स' नावाचा विषय आम्हाला शिकवला जाणार हे कळले. एकंदर सामाजिक भान वाढविण्यासाठी हा विषय होता.
मार्च महीण्यातले रणरणते उनं..गावातला आठवडी बाजार गच्च फुललेला होता..लग्नसराईचे दिवस असल्यानं सगळ्याच दुकानवजा पालावर आजुबाजुच्या खेड्यावरील बाया,माणसे,मुला-मुलींची गर्दी मावत नव्हती..ज्या मुलींची लग्न ठरलेली होती त्या मैत्रिणीसोबत कटलरी-स्टेशनरी च्या दुकानावर 'नकपालीस',मेंदीकोण,पावडर,लाली,चमकी,बिंदी,'भारी'चे सेंट,हातरुमाल,छोटे आरसे घेतांना मध्येमध्येच वेड लागल्यागत खुदकन हसत होत्या..या सगळ्यामध्ये बिचार्या दुकानदाराची त्रेधातिरपिट उडत होती..
-------------------------------------------------
म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात ते कदाचित खरं असावं. माणसं कधी कधी काही विचित्रच हट्ट करतात. निदान आबांच्या वागण्यावरून तरी मला तसं वाटलं खरं .
साठी झाली की बुद्धी नाठी होते असं म्हणतात ते कदाचित खरं असावं.
परवाचाच अनुभव घ्या ना. आबा - म्हणजे दूरच्या नात्यातले आजोबा आमच्याकडे राहायला होते. ते नुसते रहात होते तिथपर्यंत ठीक होतं. एरव्ही त्यांचं वागणं नॉर्मल होतं, पण नंतर एके दिवशी मला जाणवलं त्यांना काहीतरी बोलावंसं वाटतंय. त्यांच्या मनात काही तरी आहे असं मला वाटलं. म्हाताऱ्या माणसांशी बोलावं, जर गप्पा माराव्यात म्हणजे त्यांना जर बरं वाटतं, असं म्हणतात म्हणून मी सहज त्यांना विचारलं,"आबा, अलीकडे थोडे गप्प वाटता. काय झालं?"