निळंशार आभाळ... त्याखाली निळाशार खळाळणारा स्वच्छ समुद्र. समुद्राच्या लाटा केवढ्या उंच! सोनेरी मऊशार वाळूवर पाय पोटाशी घेऊन पाठमोरं बसलेलं कुणीतरी. समुद्राकडे बघत. तीचं शरीर कमनीय. अंगावर रेशमी वस्त्र. मोकळे लांबसडक काळेभोर केस थेट वार्याशी गप्पा करणारे. डाव्या खांद्यावरून हवेत बेदरकारपणे उडणारा निळाशार पदर. ती हलत नाही, डुलत नाही. युगानुयुगे पुतळ्यासारखी ती जणू तिथंच थांबून राहिली आहे! थोडं पुढे होऊन तिला हलवुयात का? कोण बाई तु? कुठुन आलीस? इथे अशी का बसलीयस? विचारावे का? तिच्या दिशेने थोडेसे पाऊल पुढे टाकावे तर.... पोचलो तो थेट....
अंगात आल्यासारखा जय नुसता या रूममधून त्या रूममधे नाचत होता. त्याची घरभर चाललेली धावपळ बघत इशा शांत बसून होती. त्याच्या एकंदर गडबडीमधे तो नक्की काय म्हणत होता तेही तिला समजत नव्हतं. नुसतं "आता अचानक कसं काय" आणि "देवा परमेश्वरा" एवढंच तिला ऐकू येत होतं.
शेवटी पाचेक मिनिटांनी तो तिच्याजवळ आला.
परवा आलेला एक भयाण असामान्य अनुभव .....
कुठल्याश्या अनोळखी, अजिबात आवाज नसणाऱ्या...बिन छपराच्या, आकर्षक यानात बसून
असंख्य माणूस सदृश मेटालिक कपड्यातली लोक भराभर बाहेर पडलीत ......
आकाशातून उतरणाऱ्या छोट्या गोलाकार वस्तूतून खाली आलेल्या सलाखीने...
उत्खनन सुरु केले.....वाऱ्या पेक्षाही प्रचंड वेगाने जागा खणली जात होती.....
आणि टना पेक्षाही प्रचंड वजनाची माती दूर सारली जात होती.....
मी अजूनही हे सर्व बघते आहे...मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना.....
कुठून आलेत हे सर्व?....कोण आहेत?...आपण पूर्वी यांना कधीच कुठे कसे पहिले नाही ?
’ती’ आजही नेहमीसारखीच बसली होती खुर्चीत... खिडकीच्या बाहेर डोळे लावून.
थंडीतली उबदार दुपार होती. खिडकीबाहेर अंथरलेला रस्ता थोडासा सुतावल्यासारखा निवांत उन खात पहूडला होता. हा रस्ता एरवीही तसा निवांतच असायचा. हे घरच तसं आडवाटेला. शांत, निवांत परिसर. येणारे जाणारे या ’एरिया’चं कौतुक करायचे. पण शांततेतलाही गोंगाट ज्यांना ऐकू येतो... त्यांनी कुठे जावं?
प्रिय मन्नूस,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
पत्र लिहिण्यास उशीर झाल्या बद्दल क्षमस्व.
ह्या आधीचे.....
सियाचीन ग्लेशीयर ...भाग ३
....... कंट्रोल रूम मधली मंडळी गोंधळली. टीम लीडरला अजून वाटत होते व विश्वास होता की काही तरी चांगला सल्ला कंट्रोल रूम मधून मिळेल म्हणून. अशा परिस्थितीत कंट्रोल रूम मधल्या लोकांनी काहीतरी सल्ला देणे भागच होते................

(मी काढलेला फोटो)
"तुझ्याकडे स्नो स्कूटरर्स आहेत? उपयोग कर त्यांचा" बेस कमांडरने टीम लीडरला रेडिओवरून सल्ला दिला.
हरीअप्पा प्रभुदेसाई नेहमी प्रमाणे बरोबर गजर होण्याच्या काही क्षणच अगोदर जागे झाले. खरं तर आज तरी असं होण्याचं काही कारण नव्हतं. त्यांनी आजचा पहाटे पाचचा गजर लावला होता जरी नेहमी ते साडे पाचला उठत. त्यांना आपल्या शिस्तीचं कौतुक वाटलं. ते जागे पण उजव्या कुशीवर झाले होते याचा अर्थ आजचा दिवस चांगला सुरु झाला असा त्यांनी कयास बांधला. आपल्या शिसवी पलंगावरून त्यांनी पाय खाली घेतले आणि ते उठून बसले. पलंगावरील त्यांच्या डाव्या बाजूच्या खिडकीकडे त्यांनी नजर टाकली पण बाहेर अजून अंधारच होता.
सकाळचे सात वाजले होते. डिसेंबरच्या त्या बोचऱ्या थंडीत उठावेसे वाटत नसताना नाईलाजाने उठलो. रविवार असला तरीही नऊ वाजेपर्यंत आवरून तयार व्हायचे होते. कारण नऊ वाजता मि. स्मिथ भेटायला येणार होते. त्यांचे काहीतरी अत्यंत महत्वाचे काम होते हे मी त्यांच्या काळ रात्री आलेल्या फोनवरून ताडले होते. फोनवर बोलताना ते एकही वाक्य एकसंधपणे बोलले नव्हते. त्यांच्या आवाजातील धास्तावलेपणा स्पष्टपणे कळत होता. ते असे बोलत होते जसे कि त्यांच्या कानशिलावर रिव्हॉल्वर धरून त्यांना हे बोलायला भाग पाडले आहे.