महादेवला खरंच खूप उशीर झाला होता. त्याची ठाण्यावरून सुटणारी जलद गाडी चुकली तेंव्हाच त्याला जाणीव झाली कि आता मुंबईला पोचायला खूप रात्र होणार. पावसाने तर कहरच केला होता. नशिबाने गाड्या अजूनही विस्कळीत झाल्या नव्हत्या म्हणून बरे. तो जेंव्हा दुपारी दोन नवीन मृदुंग डिलिव्हरीसाठी घेऊन निघाला तेंव्हा त्याला वाटले नव्हते की हा गोंधळ होईल. एक तर त्या भजनी मंडळाचा पत्ता बरोबर नव्हता आणि तेथे पोचून त्यांच्या म्होरक्याला गाठून त्याला पैसे मिळेपर्यंत कितीतरी तास गेले. आषाढी एकादशी तोंडावर आली असताना डिलिव्हरी तर देणे गरजेचे होते. त्यात पांडुरंगची प्रकृती हल्ली बरी नसते, म्हातारा झाला.
फिलोमिनाला यायला अजून बराच वेळ होता. फ्रान्सिस पहाटेपासून जागा होता. आताशी त्याला झोप पण नीट लागत नसे. रात्री दिलेल्या सलाईन बरोबर झोपेचे औषध अथवा पेन किलर देत त्यामुळे थोडी तरी गुंगी येई पण सलग झोप आता लागेनाशी झाली होती. आणि पहाट होताच खिडकीच्या तावदानातून दिसणाऱ्या प्रकाशामुळे फ्रान्सिसला एका नवीन दिवसाची जाणीव व्हायची आणि मग तो डोळे उघडे ठेऊन फिलोमिनाची वाट पाहत पडून राहायचा. फिलोमिना सुद्धा पहाटे घरी जाताना त्याला उठवत नसे. आजकल फ्रान्सिसला हॉस्पिटलच जेवण जेवता येत नव्हतं तेंव्हा फिलोमिना घरी जाऊन तांदळाची पेज आणि मिठाच्या पाण्यात साठवलेली कैरी नाष्ट्या साठी घेऊन येई.
नवीन जागी तिची नजर भिरभिरत होती. मान वळवून ती चारी बाजूंचा अंदाज घेत होती. पाचेक मिनिटे मी शांत बसून राहिलो. घामाने अंग भिजून गेले होते. छातीची धडधड हळू हळू कमी झाली. आपल्या इटुकल्या पायांनी तेव्हढ्या वेळात तिने परस फिरून घेतला. माझ्या घरातून मी सुरा घेऊनच आलो होतो. एका हातात तिची मान घट्ट पकडून मी तिला दगडावर झोपवले.......
===
==
=
==
===
ब्रम्हदेव अतिशय प्रसन्न होते , कुणाला तरी वर दिल्या शिवाय त्यांना चैन पडेनासे झाले. पण गेल्या कित्येक शतकात हिमालयावर तपश्चर्या करण्याची फॅशन लयाला गेली होती. जेव्हा प्रसन्नता अगदीच अनावर झाली तेव्हा ब्रम्हदेव अप्सरे कडे निरोप ठेऊन त्वरीत पृथ्वीतलावर अवतरले . तिथे सतराशे साठ विघ्ने पार पाडून राम गणेश गडक-यांच्या ठकीचे लग्न अखेरीस जुळले होते. वरातीतील बॅन्ड बाजाचे सूर ऐकून ब्रम्हदेव अजूनच प्रसन्न झाले. कुणालाही वर द्यायचाच आहे ना तर इथेच वरदानाचे कार्य पार पाडून मोकळे व्हावे ह्या विचाराने त्यांनी वरातीसह कार्यालयात प्रवेश केला.
मुंजीमध्ये आपण बटूला भिक्षावळीत ऐपतीप्रमाणे, नात्याप्रमाणे काहीतरी टाकत असालच. त्याचबरोबर मी खाली दिलेला ’मुंजीचा कानमंत्र’ही देऊ शकता.
मुंजीचा कानमंत्र
काय करू मी देवा?, म्हणुनी कधी विचारू नये ।
प्रयत्न करुनीही देवा, कधी आळवू नये ॥
हात पाय बुद्धी देउनी पाठविले जगतात ।
नियोजिलेले काम बुद्धीने हात पाय करतात ॥
बुद्धी असता लुळे पांगळे मात करी व्यंगा ।
अंध सुरदासाची रचना सदा मना सांगा ॥
आळविता का जेव्हां तेव्हां, देव कुठे आहे?।
ओळखिले नाही का तुमच्या देव मनामधी आहे ॥
आळविण्याचा अर्थ असे की मला निग्रही बनवा ।
" नको रे कटकट करूस !!! माहिती आहे ना आज....." मीनल चं वाक्य पुर न करू देता रुची म्हणाली.
"सोमवार आहे !!!!" .
नेहेमी प्रमाणे अजित आणि रुची च्या खाणाखुणा झाल्या. आणि दोघे फिसफिसायाला लागले.
" मार देईन हा दोघांना !!! खा आता पुढ्यातल. आणि मादाम तुम्ही. लक्षात ठेवा की आपल्याला एक घर आहे. सुट्टी असली तरी घरातच राहायचं. सगळ जग उंडारत फिरायचं नाही. "
" ए आई, घे ना कलटी ... बाबा काय बोर आहे हो तुमची बायको. आज १० दिवसांनी ही ऑफिस ला जाते आहे आणि आमच्या डोक्याला ताप. "
बाबा काय लगेच तत्परतेने हासला. " मिनू डियर शांत हो पाहू. खूप दिवसांनी ऑफिसला जाते आहेस ना, मग शांत डोके ठेव. "
" ठीक आहे. सी यु देन. " मालिक ने राजीव ला म्हंटले. हस्तांदोलना साठी हात पुढे केला.
राजीव ने यंत्रवत हात पुढे केला. मालिक दुसऱ्या कामा साठी वळला. राजीव सुन्न मनास्थीतित आपल्या केबीन मध्ये आला.
एक मिनिट काय चालु आहे, आपण कुठे आहोत काहीच समजत न्हवते. भीषण शांतता.
"ट्रिंग ट्रिंग" अरेबापरे हे काय!! अरे फोन.
राजीव ने लगबगीने फोन घेतला. एच आर मधून होता. मधु बोलत होता.
"हां मधु !! बोल!!"
" मिस्टर राजीव गोडबोले, तुमचा इमेल आय डी पुढल्या ३ तासात फ्रीझ होइल. तुमचे रीलीव्हींग पेपर,
आणि handover साठी सायली येइल तुमच्या कड़े थोड्या वेळात. थँक्स."
भयानक
____________________________________________________________

____________________________________________________________
1
आमच्या छोट्या शहरी एक बऱ्यापैकी मोठा तलाव आहे. शहराच्या मध्यभागी असल्यामुळे सर्वांना तसा तो जवळ देखील आहे. तलावावर कमळांची सुंदर गादी तयार झालेली आहे आणि म्युन्सिपालटी ने थोडीशी दया दाखवून ती अनुभवायला तिकडे बसायची सोय देखील केली आहे. काठावरच छोटं देऊळ असल्यामुळे अनेक आजी-आजोबांची सकाळची फेरी आणि नंतर चर्चासत्र इकडेच रंगतात. आत अनेक देव असल्यामुळे 'वारांची वारी' अगदी ठरलेली! संध्याकाळी देखील कसली तरी व्याखानं, मध्येच एखादा गाण्यांचा कार्यक्रम, कुणाचा तरी कौतुक सोहळा, पत्त्यांचे सामने, कॅरम खेळणे हे इथल्या छोट्याशा व्यासपीठावर नित्याने होते असते.