भाग १ - http://www.maayboli.com/node/39477
भाग २ - http://www.maayboli.com/node/39482
भाग ३ - http://www.maayboli.com/node/39503
वरून पुढे चालु
*****************************************************
"या मिस्टर अँड मिसेस देसाई. प्लीज हॅव अ सीट. मीट डॉ. सामंत. हे माझे जुने मित्र आहेत आणि मला तुमच्या केससाठी मदत करणार आहेत."
"डॉ. राव, काय झालयं मला?"
"मि. देसाई, खरं सांगायचं तर मलाही अजून नीट अंदाज येत नाहिये."
"डॉक्टर, ब्रेनशी संबंधित काही आहे का? हे बघा, जे काही असेल ते मला स्पष्ट सांगा. ब्रेन ट्युमर तर नाहिये ना मला?"
भाग १ - http://www.maayboli.com/node/39477
भाग २ - http://www.maayboli.com/node/39482
वरून पुढे चालु
*****************************************************
"नाही हो इन्स्पेक्टर साहेब, ह्या आधी तो कधीच असा वागला नाहिये. मुळातच त्याचा स्वभाव शांत आहे. मारामारी वगैरे तर अजिबात नाही करणार तो."
"आणि तुम्ही म्हणताय कि ह्यांना तुम्ही ओळखत नाही"
"नाही."
"मग त्यांनी ह्यांच्याशी काय उगाच मारामारी केली?"
"तेच कळत नाहिये हो मलापण."
"हम्म.. दारु वगैरे काही घेतात का ते?"
"अगदी क्वचित. ती पण बरोबरच्याला कंपनी देण्यापुरती. स्वतःहून कधीच नाही."
"आणि बाकिचं काही?"
>>http://www.maayboli.com/node/39477
वरून पुढे चालु
*****************************************************
वा! आज जरा लवकर बाहेर पडता आलं ते बरं झालं. बसला गर्दी पण नाहीये. घरी जरा लवकर पोचेन. संध्याकाळी नेहाला हिंडायला घेऊन जाता येईल. सारखी तक्रार करत असते, लग्नानंतर तुझा सगळा रोमँटिकपणा गायब झालाय म्हणून. आता कसं समजवायचं तिला.. मी काही टाटा बिर्लांचा मुलगा नाही, साधा मध्यमवर्गीय माणूस आहे. लग्नाआधी वेगळं होतं. आता एकट्याच्या पगारात घर चालवताना वाट लागतीये. रोमँटिकपणामधला र पण सुचत नाही.
मंडळी, मायबोलीवर कथा लेखनाचा पहिलाच प्रयत्न करतोय. सांभाळून घ्याल अशी आशा आहे.
*****************************************************
"विक्या, ए विक्या.."
मागून हाक आली तसं मी वळून बघितलं. आता खरं तर माझं नाव विकी वगैरे नाही , पण हाक ऐकल्यावर बघावसं वाटलं म्हणून बघितलं तर एक पंचवीस तीस वर्ष वयाचा तरूण माझ्याकडेच येत होता.
"काय राव, कुठे गायब आहेस? दोन आठवडे आलाच नाहीस? त्या व्हिसीसी च्या बॉलर्सनी वाट लावली यार आपली. लई मिस केला बघ तुला. तु तर असला धुतला असतास न एकेकाला.... ए हिरो.. हॅलो, काय झालं? असा का बघतोयस?"
"माफ करा, पण मी आपल्याला ओळखलं नाही", मी उत्तरलो.
कथा अमक्या-तमक्याची....
आटपाट नगर होतं... एकविसाव्या शतकातलं. तिथं एक मध्यमवर्गीय ब्राम्हण रहात होता... कुठल्या शतकातला ते तुम्ही ठरवा. त्याचं नाव होतं अमुक-तमुक. त्याची बायको अमकी-तमकी. आणि त्याची मुले... वगैरे वगैरे.
अमुक-तमुक रोज सकाळी निवांत उठायचा. अमकी-तमकीने दिलेला चहा चवी-चवीने प्यायचा. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचताना नियमितपणे न विसरता चुकचुकायचा आणि चेहरा विषण्ण करायचा. मग तो ’शुचिर्भूत’ व्हायचा. म्हणजे स्नान करायचा... वगैरे वगैरे.
आणि मग सुरू व्हायची त्याची देवपूजा!!
इथे तुम्हाला माहित असलेल्या वेगवेगळ्या रोचक पुराणकथा लिहा. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिस्ती, ग्रीक, रोमन आणि इतर धर्मांतील व देशांतील कथा माहित असतील तर इथे लिहा. हा बाफ अशा कथांच्या संकलनाकरता आहे. त्या कथांची सत्यासत्यता तपासण्यासाठी अथवा वैज्ञानिक कसोट्या लावण्यासाठी नाही.
इथे टिंगलटवाळी करणारे, एखाद्या धर्माला उद्देशून चेष्टा-मस्करी करणारे लिखाण करू नये ही विनंती.
रामाच्या मंदीरात प्रवचन सुरू होतं. कीर्तनकार बुवा सत्तरी उलटलेले. मोठ्या आत्मीयतेनं आणि रसाळ वाणीत श्रीरामाची कथा सांगत होते. प्रवचन-सप्ताहातला आज पाचवा दिवस होता. प्रवचन ऐकायला रोज लोक गर्दी करत होते. मन लावून प्रवचन ऐकायचे, माना डोलवायचे, आणि 'जय श्रीराम' म्हणत जाताना दक्षिणा-पेटीत पैसे टाकायचे. कुणी पन्नासची नोट टाकायचे, तर कुणी शंभराची. कुणी कीर्तनकार बुवांसाठी फुलांचा मोठ्ठा हारही घेऊन यायचे. मंदीराशेजारी राहणारी एक म्हातारी प्रवचनाला रोज येत होती. दिवसभर चार घरची कामं करून स्वतःचं पोट भरायची. घर जवळच असल्यानं प्रवचनाला सगळ्यात आधी हजर असायची.
"चलायचं?" शांत रस्त्यावर त्याचा दमदार आवाज त्यालाच घुमल्यासारखा वाटला.
"हो, तू सामान घेतलंस ठरल्याप्रमाणे?"
"कमॉन यार, फक्त एक रात्र. उद्या सकाळी परत येतोय आपण." ब्रायनने बेफिकीरपणे उत्तर देत सायकल दामटली. दोघांनीही शर्यंतीत भाग घेतल्यासारखा सायकलचा वेग वाढवला. गप्पांच्या नादात किती अंतर पार केलं ते लक्षात आलं नव्हतं, पण हळूहळू हिरव्यागार झाडीत दडलेल्या काळ्याभोर रस्त्यावरची वर्दळ कमी होत गेली. दोघांच्या सायकली टपरी सारख्या दिसणार्या दुकानासमोर थांबल्या तेव्हा पाय भरुन आले होते. वाफाळलेल्या कॉफीने ब्रायनच्या चेहर्यावर तरतरी आली.