कथा

लव्ह - ट्रँगल (Love-Triangle)

Submitted by बोबो निलेश on 4 April, 2014 - 13:33

-----------------------------------------------------------------------------------

रिचाचं आणि माझं तसं सारं व्यवस्थित चाललं होतं, रिचा दिवसातला बराच वेळ मला देत असे. त्या व्यतिरिक्त नित्यनियमाने फोनवर बोलणे होत असे . कधी ती फोन करत असे तर कधी मी. पण गेल्या जवळ जवळ वर्षभरात हे चित्र बदललं होतं.आता फक्त मीच फोन करत होतो. आणि पूर्वी तासन तास फोन वर बोलणारी रिचा मात्र फोन उचलल्या पासून "ठेवू का?" चा घोष लावत असे.

शब्दखुणा: 

इच्छा

Submitted by मोहना on 3 April, 2014 - 20:18

आज ’अगत्य’ बंगल्यात दादांची तिन्ही मुलं मुक्कामाला होती. किती वर्षांनी तिघं भावंडं एकत्र आली होती.

शब्दखुणा: 

आठवण ..!!

Submitted by मी मी on 21 March, 2014 - 05:59

तिने पुन्हा एकदा टेबलवरच्या डायरीमधला तो कागदाचा चिटोरा उचलला. परत त्यावरच्या नंबरवरून नजर फिरवली. पुन्हा टेबलवर ठेवलेल्या मोबाइलवर नजर खिळली, पुन्हा मन do or do not मध्ये अडकले. मनातल्या मनात पुन्हा येऊ शकणारे सगळे reactions तपासून पाहिले. नजर शून्यात लागलेली … आज सकाळ पासून हे असंच चाललंय तिचं …… घरातल्या कुठल्याही कामात मनंच लागत नव्हतं.

नाही ! मानेला हलकासा झटका देत तंद्रीतून बाहेर पडत ती पुटपुटली

शब्दखुणा: 

स्वप्न आणि वास्तव - भाग २ ( अंतिम )

Submitted by बोबो निलेश on 19 February, 2014 - 14:57

वाचा - स्वप्न आणि वास्तव - भाग १
-----------------------------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 

स्वप्न आणि वास्तव - भाग १

Submitted by बोबो निलेश on 17 February, 2014 - 22:05

मॅनेजरसाहेबांनी रोहनच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि ते म्हणाले,"रोहन, मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. मला हे सांगायला आनंद वाटतो कि तू आपल्या कंपनीचा स्टार सेल्समन आहेस. जर आपल्या प्रत्येक सेल्समनने तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर कंपनी ची प्रचंड प्रगती होईल." मॅनेजरसाहेबांचे बोलणे ऐकून रोहनची छाती अभिमानाने भरून आली. "आणि हि आहे तुझ्या कष्टांची पावती, तुझे अप्रेजल लेटर.", असे म्हणत मॅनेजरसाहेबांनी एक एन्वलप पुढे केले. रोहन चा आनंद गगनात मावेना. त्याने थरथरत्या हातांनी एन्वलप घेऊन उराशी घट्ट कवटाळले.

शब्दखुणा: 

कातरवेळ – २

Submitted by अमृतवल्ली on 7 February, 2014 - 01:06

-------------------------------------------------------------
खरतर बर्याच दिवसांनी कातरवेळचा पुढचा भाग टाकते आहे. काही गोष्टी वेळच्या वेळी पूर्ण कराव्या हेच खर! पण गोड मानून घ्या.
पहिल भाग :
http://www.maayboli.com/node/45045
------------------------------------------------------------------------------------------------------
घड्याळाने ४ चा टोल दिला. या खोलीतली तिची एकमेव वस्तू. रोज नियमाने तिला साद घालणारी. अगदी याच वेळेला. प्रत्येक टोलाबरोबर येणारा एक प्रश्न “ किती दिवस टाळणार आहेस?’

शब्दखुणा: 

भेट

Submitted by स्पार्टाकस on 24 January, 2014 - 16:16

 

महायुध्दाला सुरवात होऊन सोळा दिवस उलटले होते.

" राजमाता, आपल्या दर्शनासाठी एक देवी आल्या आहेत. " दुताने वर्दी दिली.
" आता ? या वेळी ?" राजमातेने आश्चर्याने विचारलं. रात्रीच्या दुसरा प्रहर सुरू झाला होता.
" हो !"
" कोण आहे ?"
" नाव सांगितलं नाही राजमाता, परंतु आपल्याच दर्शनाची त्यांची आग्रही विनंती आहे !"

राजमातेने मानेनेच होकार दिला. राजमातेच्या शेजारीच बसलेली द्रौपदीही विचारात पडली होती.

काही क्षणांतच मुख आच्छादलेली एक स्त्री राजमातेसमोर आली. राजमातेसमोर येताच तिने त्रिवार वाकून राजमातेला वंदन केलं.

" आयुष्मान भव !" राजमातेने आशीर्वाद दिला, " अखंड..."

विषय: 
शब्दखुणा: 

कृतार्थ

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 16 December, 2013 - 07:31

''मोतीबाबू आहेत का?'' सुरेशबाबूंनी बाहेरूनच विचारले. आश्रमातील बंगल्याच्या व्हरांड्यात पायाशी शेगडी ठेवून, वेताच्या खुर्चीत आरामात वर्तमानपत्र वाचत बसलेल्या जयंतीबेन त्यांना पाहून जरा दचकल्याच!
''या, या सुरेशबाबू.... आज आमच्या बंगल्याची पायधूळ कशी काय झाडलीत? या ना, बसा, बसा. मोतीबाबू आत जप करत आहेत. येतीलच पाच-दहा मिनिटांत. काही काम होतं का?'' जयंतीबेन हातातील वर्तमानपत्र बाजूला सारत उद्गारल्या.

शब्दखुणा: 

संभ्रम

Submitted by मोहना on 24 October, 2013 - 20:54

"किंचाळणं बंद कर तुझं आधी, बंद कर म्हणते ना." खडीची घमेली उचलणार्‍या मजूर बाईच्या अंगावर मीना जोरात ओरडली. तिच्या चढलेल्या आवाजाने गप्प होण्याऐवजी त्या बाईला अधिकच चेव चढला.

शब्दखुणा: 

तेरी मेरी लव स्टोरी

Submitted by nishabagul on 26 September, 2013 - 06:20

“कही दबी दबी सी…कही छुपी छुपी सी….तेरी मेरी लव स्टोरी….कभी बारिशो में भीगी तो महक उठी….तेरी मेरी लव स्टोरी !!!”

सकाळी ऑफिसला जाताना अचानक तिचे लक्ष टीव्ही कडे गेले. स्टार प्लस वर एक नवीन सिरीयल सुरु होणार होती त्याच हे शीर्षक गीत होते. हे गाणे आणि त्या सिरीयलची जाहिरात तिला भयंकर आवडायची. तिने रिंगटोन पण याच गाण्याची ठेवली होती. एरव्ही “सिरीयल” या शब्दाने सुद्धा ती वैतागायची. पण “ऑफिसच्या कामाच्या गडबडीतून एकमेकांना दिलेली १० मिनिट” या concept मुळे ती या सिरीयल कडे आकर्षित झाली

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कथा