" ठीक आहे. सी यु देन. " मालिक ने राजीव ला म्हंटले. हस्तांदोलना साठी हात पुढे केला.
राजीव ने यंत्रवत हात पुढे केला. मालिक दुसऱ्या कामा साठी वळला. राजीव सुन्न मनास्थीतित आपल्या केबीन मध्ये आला.
एक मिनिट काय चालु आहे, आपण कुठे आहोत काहीच समजत न्हवते. भीषण शांतता.
"ट्रिंग ट्रिंग" अरेबापरे हे काय!! अरे फोन.
राजीव ने लगबगीने फोन घेतला. एच आर मधून होता. मधु बोलत होता.
"हां मधु !! बोल!!"
" मिस्टर राजीव गोडबोले, तुमचा इमेल आय डी पुढल्या ३ तासात फ्रीझ होइल. तुमचे रीलीव्हींग पेपर,
आणि handover साठी सायली येइल तुमच्या कड़े थोड्या वेळात. थँक्स."
राजीव च्या हातात ला रीसीव्हर निर्जीव झाला होता. कान बधीर झाले होते. तो आता कोणी न्हावता. ह्या कंपनी साठी तो एक "माजी नोकर" होता. द एक्स एम्प्लोयी.
राजीव पुढली १५ मिनिटे फ़क्त लॅपटॉप च्या रिकाम्या स्क्रीन कड़े पहात होता. राजीव ला आठवले हा मधु आणि त्याने मारलेल्या गप्पा. केलेल्या चर्चा. आणि आता...... त्याही परीस्थितित त्याच्या चेहेऱ्यावर एक हसू आले.
तेवढ्यात दारावर टकटक झाले. सायली आत आली. एक मंद सुगंध सगळी कडे पसरला. " हॅल्लो सर! हाउ आर यु! हे घ्या तुमचे पेपर्स. आपण ते नीट भारुया. मी तुम्हाला मदत करते, म्हणजे काम लौकर होइल."
" हो म्हणजे तेवढेच लौकर तुम्ही मला हाकलू शकाल. हो ना " राजीव ने तिच्या कड़े रोखून बघत विचारल.
उत्तरादाखल ती खुप गोड हसली. तीचं कदाचित हे नेहेमीचं काम असावं. तिच्या सराईत पणा वरून तरी असच वाटत होत. तिच्या मदतीने राजीव ने सगळे फॉर्म भरले. कॅन्टीन चे पैसे भरले. सगळ्या औपचारिक बाबी पूर्ण केल्या.
तोवर ३ वाजले होते. आता काय... तेवढ्यात सायली परत आली.
तिने गाडी आणि केबिन च्या चाव्या, मोबाइल सिम कार्ड, लॅपटॉप सगळे आपल्या ताब्यात घेतले. राजीव म्हणाला," सूट पण काढुका? कारण हा पण कंपनीच्या अलाउंन्स मधला आहे."
" नाही सर फ़क्त गजेट्स द्या बाकी सगळे कॉम्पीमेंटरी आहे." ती अतिषय मख्ख चेहेर्याने म्हणाली.
राजीव ला आज जाणीव झाली की आपल्या कड़े फोन पण नाही. एक सिम कार्ड घ्यायला पाहिजे. कारण ह्या क्षणी तो नॉट रीचेबल होता. नीलू नेहेमी म्हणायची की एक पर्सनल सिम घेवुन ठेव. पण आपलाच कंटाळा!!! काय कळतच नाही काय करावं ते.
आता?? आता काय.... taxi पकडून घरी जायच.
तो केबिन च्या बाहेर आला. त्याची टीम बावरुन उभी होती. आपापसात गट पाडून सगळे कुजबुजत होते. तो बाहेर आलेला बघून सगली कड़े शांतता पसरली. त्याने नेहेमी प्रमाणे हसण्याचा प्रयत्न केला. काही लोक कसेनुसे हासले. तो बाहेर आला.
बाहेर अंजली होती. ती मात्र रडल्या सारखी वाटत होती. त्याने तिच्या कड़े एक कटाक्ष टाकला. एक वेदना चमकली. तो तसाच पुढे गेला.
बाहेर आल्यावर त्याने चालायला सुरवात केली. थोड़े पुढे आल्यावर त्याला जाणवले की त्याने सकाळ पासून काहीच खाल्लेले नाही. तो सरळ शेजारच्या हॉटेल मध्ये घुसला.
जरावेळाने टॅक्सी पकडून घरी आला. घरी कोणीच न्हवत.
कसे असणार !! नीलू college मधे आणि राणी शाळेत.
त्याला चावी सुध्धा शोधायलाच लागली. आशा अवेळी तो अनेक वर्षांनी घरी आला होता.
त्याने मस्त चहा करून घेतला. त्याच्या आवडत्या जागेवर बसून शांत पणे चहा चे घुटके घेता घेता सगळा जीवन पट डोळ्या समोर उभा राहीला.
राजीव लहान पणा पासून हुशार! एक चांगला शहाणा मुलगा. तो, दादा, आई आणि वडील एवढेच कुटुंब. सुखी. शांत. वडील सचिवालयात, आई शाळेत. त्यामुळे घर सुखवस्तू प्रकारात होत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नाही की कमतरता नाही. सगळ काटेकोर.
ह्या चित्राला धक्का लागला ते वडिलांच्या आकस्मिक मृत्यु ने. काय झाल कळलंच नाही. जगच बदलून गेलं. होत्याचं न्हवतं झालं. पुढे मग आईच्या एकट्या पगारात भागवताना पुरेवाट होवू लागली. नशीब रहात घर त्यांच होत. वडिल गेले तेंव्हा तो दहावीत होता. भाऊ १२ वीत. भावाने नेटाने परीक्षा देत चांगले मार्क मिळवले. पण एवढा खर्च झेपणार नाही म्हणून इन्जीनीअर मात्र होऊ शकला नाही. त्याने नाईलाजाने बी.एस.सी. करायच ठरवलं. राजीवने ही १० वीला खुप चांगले मार्क मिळवले. भावाच्या उदाहरणाने शहाणा होवून त्याने आधीच कॉमर्स ला प्रवेश घेतला. पुढे मग अंगाच्या हुशारीने बीकॉम होणे, मग छोट्या नोकऱ्या करत करत एम्.बी.ए. होणे, चांगल्या कंपनीत नोकरी. स्वत:चा उपनगरात flat , निलुशी लग्न,. ह्या पायऱ्या तो झटकन चढला.
पहिल्या पासून त्याने फायनान्स मध्ये काम करायचे ठरवलेच होते. त्या दृष्टीने त्याने वेळो वेळी नोकरीत निर्णय घेतले होते.
ह्या कंपनीची म्हणजे, टीएसएल फायनान्स सोल्युशन ची ऑफर त्याला मिळाली तेंव्हा टीएसएल एक मध्यम कंपनी होती. एका मोठ्ठ्या ग्रुप ची फायनान्स कंपनी एवढेच त्याला महत्व होते. मोठ्ठ्या ग्रुपचे सगळे फायानांसेस मिळवणारी त्यांची एक सिस्टर कन्सर्न एवढेच त्याचे स्वरूप होते. त्याला जेंव्हा ह्या कंपनीचा सी.इ.ओ. म्हणून ऑफर आली, तेंव्हा राजीवने मोठ्ठ्या ग्रुप मध्ये शिरकाव होतो आहे, ह्याच भावनेने हा जॉब घेतला. टीएसएलचे आधीचे स्वरूप त्याला खटकू लागले. कधी एकदा कंपनी स्वतंत्र पणे नावारूपाला आणतो असे त्याला झाले. त्याच्या हुशारीमुळे आणि कष्ट करण्यावर वरिष्ठ नेहेमीच खुश असत. त्याने कुठच्याच ग्रुप कंपनीला कधी पैसे कमी पडू दिले नाहीत. बँकर आणि फायनान्स institution ना कसे सांभाळायचे ह्याचे त्याचे एक टेकनिक बनून गेले होते. अनेक वेळेला त्याचा कस लागत असे. पण कसेही करून त्यातून बाहेर पडायची त्याची जिद्द त्याला नेहेमीच मदत करत असे.
करता करता त्याला इतर ग्रुप्स कडूनही फायनान्स manejment साठी विचारणा होऊ लागली.
स्वतंत्र पणे काम करण्याची परवानगी मोठ्या मिनतवारीने त्याच्या मुख्य कंपनीने दिली. आर्थात काही अटींवर!!!
हेही नसे थोडके असा विचार करून राजीव ने ते नवे आव्हान पेलले. हे होत असताना आपण नवे शत्रू
निर्माण करत आहोत ह्याचे भान त्याला राहिले नाही. मग कुठेतरी घाणेरड्या राजकारणाला
सुरुवात झाली. त्याच्या नकळत!!!
खंडेलवाल नेहेमी त्याच्या विरुध्ध सूर लावायचे. पहिले पहिले त्याला त्रास होत नसे. पण जेंव्हा स्वतंत्र प्रपोझल्स त्याची कंपनी करायला लागली तेंव्हा तो विरोधी सूर त्याला खटकू लागला. हळू हळू तो विरुध्ध खंडेलवाल अशी फळीच उभी राहिली. नवे डावपेच नव्या योजना. सगळी शक्ती इकडेच खर्च होवू लागली. आजची ही घटना अनपेक्षित होती, त्याच बरोबर अचंभित करणारी होती. निमित्त झालं होतं एक प्रकरण.
राजीव कडे एका मोठ्या टायर कंपनीचं काम आलं होतं. वरिष्ठांची परवानगी घेवूनच पुढे काम चालू होत. त्यातच त्याच्या एका सहकाऱ्याने आपल्या बायकोच्या बँकेत हे नवे प्रपोझल टाकले. आणि काडी पडली. खंडेलवाल ने पध्धत शीर पणे त्यांना अडकवायला सुरुवात केली. आधीच्या अनेक प्रपोझाल्स्ची नको तेवढी छाननी केली. कोणासही कळू न देता हे काम चालू होते. राजीव हळू हळू अडकत चालला होता.
रोज वेगळे मेमो, नवे खुलासे. त्याला नको जीव झाला. हाता खालच्या अनेकांची गच्छंती झाली. आणि शेवटी आजचा दिवस आला.
चहा पिता पिता हा सगळा जीवनपट राजीव च्या डोळ्या समोरून गेला. आज त्याच्या कडे घर होते, चांगली सुशीक्षित बायको होती, राणी सारखी मुलगी होती. अंजली सारखी मैत्रीण होती. भरपुर बँक बॅलन्स होता. मग चिंता कसली? बदनामीची? मग काय? ही रुख रुख कसली? ही टोचणी कसली? काय बरं खटकतं आहे?
लोक काय म्हणतील?
त्याने निलूला मुद्दामच फोन केला नाही. तिचं क्षेत्र वेगळ, आपलं वेगळ. ती एक प्रोफेसर. तिला ह्या गोष्टी कशा कळणार. तसं देखील ती खूप अबोल आणि अलिप्त असते हल्ली. तीच विश्वच वेगळं. खरं तर आपल्याला अंजली सारखी डायनामिक बायको मिळायला हवी होती.
अशाच विचारात तो असताना दाराची किल्ली उघडण्याचा आवाज आला. निलू? एवढ्या लौकर? आत्ता तर फक्त साडेपाच होतायेत? ती नीलूच होती.
"अरे तू? आज लौकर कसा? बरं आहे ना ?"
तो मस्त हासला. "अगं हो हो. अशी बघतेस काय भूत बघीतल्या सारखी?"
" अरे खूप दुर्मिळ प्राणी बघून दचकायला नाही होणार? माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस?"
मग त्याने तिला सावकाश सगळा प्रसंग सांगितला. " मग काय वाटतंय तुला? माझं काही चुकलं तर नाहीना?"
निलू सावकाश उठली. आणि बाल्कनीत फेऱ्या मारू लागली. तिची ही सवय राजीवच्या खूपच परिचयाची होती.
" अगं बोल ना!! मला सांग तरी!!!काय वाटतंय तुला."
" राजीव मी बोलतेय ते तू समजू शकशील कदाचित. कारण अजूनही तुझी निर्णय शक्ती शाबूत आहे."
" अजूनही म्हणजे!!!"
" अजूनही म्हणजे अजूनही. एवढे सगळे झाले तरी. आज एक वर्षाने जरी तू हे मला सांगितलेस तरी हे असे होणार ह्याचा मला अंदाज होताच. कारण एकंदर परिस्तिथी बघता तुझाच बकरा होणार हे तर दिसत होतच. " निलू ठाम पणे म्हणाली.
" बकरा ? अगं काय शब्द वापरतेस !!! तुझ्या नवर्याचा अपमान झालेला आहे. माझी बदनामी झालेली आहे. आय एम सॅक्ड!!! तु इतकं लाइटली कसं घेउ शकतेस?"
" राजीव तुला दुखावायाचा माझा उद्देश नाही. पण एकदा सांग की तू काहीच गैर व्यवहार केले नाहीस? तू एकदम सगळी डील्स काहीही गैर व्यवहारा शिवाय पार पाडलीस? सांग ना "
राजीव ने मान खाली घातली. मग उसळून म्हणाला, " अगं थोडं तर इकडे तिकडे चालतच ह्या पोझिशन ला आल्या वर. एकदम काही सगळं क्लीन नसतं. आर्थात ते तुझ्या सारख्या नाका समोर चालाणार्या बाईला समजणार नाही. धंदा वाढवायचा म्हणजे थोडं ओलं थोडं सुकं आलच की !!"
" राजीव मी नाकासमोरून चालणारी आहे तेच मला ठीक वाटतं. मी आणि माझं जग खूप सीमित आहे. मान्य आहे. पण त्यात काहीच चढ उतार नाहीत. पैसा नसेल तुझ्या एवढा पण मनाचं समाधान मात्र भरपूर आहे. हे रोजचं अस्वस्थ होणं, उशीरा उशीरा झोपण, नीट झोप न लागण, सतत इतरांवर कुरघोडीचे विचार. मी आणि माझं. बास दुसरं काही नाही. सतत मला पैसा कसा मिळेल, माझं भलं कसं होईल, मग त्या साठी मी माझी तत्व, माझा वैयक्तिक वेळ पणाला लावेन, पण सो कॉल्ड यश मिळवूनच दाखवेन. तुला कल्पना आहे घरात काय चाललं आहे?.... ते नाही कळलं तरी चालेल पण बँकेचा पी.एल.आर. किती आहे ह्याची चिंता..... आश्चर्य वाटलं का माझ्या तोंडून हे शब्द ऐकून!!! मी प्रोफेसर असले तरी अर्थशास्त्राची आहे हे तर तू विसरून गेला आहेस. आपली राणी आजकाल काय करते, कोणत्या क्लासला जाते, कोण तिचे मित्र मैत्रीण ह्याची खबर आहे तुला? ऑफीस मधलं यश म्हणजेच सर्वस्व नसतं. तो एक भाग असतो जीवनाचा, सर्वस्व नाही. पण तुला ही थीन लाईन कधी कळलीच नाही.
प्रत्येक गोष्ट म्हणजे एक डील नसतं रे. काही काही गोष्टी ह्या वेगळ्या रीतीने हाताळायाच्या असतात. आपलं माइंड मॅनेजमेंट आपणच करायचं असतं. तू पुढे पुढे चढण्याच्या नादात तुझ्या हातून काही चुरगाळल गेलं नसेल कशावरून ? मग आता तू कोणाच्या तरी हातातला बाहुला झालास तर त्याचं एवढं दुख: कशाला!!.
आपण डावलले जातोय हे समजण्या सारखे दुसरे दुख: नाही. आणि तेच तुला झालाय. आज तुझ्याकडे भरपूर पैसा आहे, घर आहे, मिळवती बायको आहे, हुशार मुलगी आहे. बाकी कसल्याच चिंता नाहीत. उद्या तू मार्केट मध्ये उभा राहिलास तरी तुला दुसरा जॉब मिळणार आहेच. कारण तुमच्या जगात हे असं नोकरी बदलणं वगैरे होतच असतं. तुझी स्वत: ची कन्सलटन्सी तर नक्कीच उत्तम चालेल. पण तुझ्या मानसिक समाधानाचं काय? ज्याला सो कॉल्ड भाषेत "जॉब सॅटीस्फॅक्शन" म्हणतात.
तू मनातून तोच १७ वर्षा पूर्वीचा राजीव आहेस का? जो खूप तत्व आणि स्वत्व जपणारा होता. आपण पूर्वी खूप गप्पा मारायचो. कारण आपलं कार्य क्षेत्र एकाच होतं. त्यावेळेसही मी हीच नोकरी करत होते.
पण आता.. आठव शेवटचं आपण कधी एकत्र बाल्कनीत बसलोय !! खूप वर्ष झालीत त्या गोष्टीला. तुझ्या दुष्टीने मी तशीच पूर्वीची निलु राहिलेली आहे साधी. मी साधी आधीही होते आणि आत्ताही आहे. पूर्वी माझा साधेपणा हा माझा गुण होता. आता तो दोष आहे. एस्पेशली अंजली भेटल्या पासून........ दचकू नको. मला माहित आहे तुला अंजली आवडते ते. आपल्या राणीलाही माहिती आहे. ... घाबरू नकोस. तिने एकदा तुझ्या मोबाईल मध्ये अंजलीचा मेसेज वाचला होता. आपली मुलगी आता मोठी झालीये. अरे आता १०वीत आहे ती!! सगळं समजतं तिला. मी समजावल्यावर तिने ही हे मान्य केलं की अनेक वर्षांच्या सहवासाने एखादी मैत्रीण आवडू शकते. पण त्या मुळे आपल्या नात्याला बाधा आलेली मला चालणार नाही.
राजीव खंबीर हो. विचार कर. खूपशा आघाड्यांवर तुला लढायचे आहे. आणि तेही तुझे तुलाच. मी फक्त पाण्याची वाट दाखवू शकते, पाण्याने ओंजळ भरून देऊ शकते. पण पाणी तुझे तुलाच प्यायचे आहे. हे सगळं मी तुला खचवायला नाही बोलत. हे सगळ तुला नीट पटेल जेंव्हा तू शांत डोक्याने विचार करशील. तुझं ओझं तुलाच वागवायचं आहे. "
राजीवचे डोळे भरून आले. आपल्या नीलुकडे बघताना एखादी नवी व्यक्ती भेटावी तसे वाटले. ही बाई आपल्या खूप जुन्या ओळखीची आहे, पण तिची ओळख आपल्याला आजच पटली आहे असे काहीसे झाले. खूप आभाळ भरून यावे तसे. तिचे डोळे पण आभाळा सारखे होते. प्रेमळ, विशाल, पण तरीही खंबीर. तिच्या कुशीत त्याचे शब्द विरले.
" हल्ली राजीव गोडबोले हरवला आहे गं !!! त्याला शोधायला माझी मदत करशील? "
.
.
मस्त
मस्त
छान
छान
आवडली. खुप छान
आवडली. खुप छान
छान कथा आहे.. माझ्या
छान कथा आहे.. माझ्या बायकोलाही वाचायला द्यायला हवी..
तिला मी एकाच वेळी अॅम्बिशस आणि फॅमिली ओरीएंटेटेड हे दोन्ही बनावे असे वाटत असते.. कसे शक्य आहे..
मोकिमी, कथा चांगली आहे. जरा
मोकिमी,
कथा चांगली आहे. जरा लवकर गुंडाळल्यासारखी वाटते. खूपदा उच्चपदस्थ लोक काम सोडण्याआधी रजेवर जातात. त्या सुट्टीतले प्रसंग अधिक उत्कटपणे रंगवता आले असते.
आ.न.,
-गा.पै.
आवडली.
आवडली.
धन्स तुमचा अभिषेक, रीमा,
धन्स तुमचा अभिषेक, रीमा, रावण, कंसराज, गापै, टोकु.....
हा माझा पहिलाच प्रयत्न.
गापै...
इकडे राजीव नोकरी सोडुन जात नाहिये, त्याला नोकरीतुन काढंलं आहे, त्याला एका दिवसात गुंडाळला आहे. पॅक केला आहे. डोळ्या समोर अनेक उच्च पदस्थ असे पॅक होताना पाहिले आहेत.
आवडली.
आवडली.
मी साधी आधीही होते आणि
मी साधी आधीही होते आणि आत्ताही आहे. पूर्वी माझा साधेपणा हा माझा गुण होता. आता तो दोष आहे.
लग्नाला काही वर्ष झाल्यानन्तर त्या नात्यात हे असच होत असत का?
आवडली.
लग्नाला काही वर्ष झाल्यानन्तर
लग्नाला काही वर्ष झाल्यानन्तर त्या नात्यात हे असच होत असत का?>>>>>
उज्वला..... अनेक नाती आपण सवयीने सांभाळतो. त्यातला चार्म संपलेला आहे हे आपल्याला जाणवतही नाही.
विनायकजी , उज्वला धन्स....
चांगली आहे गोष्ट.
चांगली आहे गोष्ट.
चांगली आहे गोष्ट.
चांगली आहे गोष्ट.
मोकिमी, फारच नाट्यमय
मोकिमी,
फारच नाट्यमय गच्छन्त्या बघितलेल्या दिसतात आपण.
जरी काढून टाकलं तरी एखाद आठवडा रजेवर पाठवतात. एका दिवसात हाकललं असेल तर अपराधही बराच मोठा असावा असतो. (असं ऐकून आहे)
मी तरी आजून उच्च्पदीय शीघ्रगच्छन्ति पहिली नाही.
आ.न.,
-गा.पै.
गापै.... अख्खे कॉर्पोरेट जगच
गापै....
अख्खे कॉर्पोरेट जगच फार नाट्य्मय आहे. सध्याच नवर्याच्या ऑफीस मध्ये एका डायरेक्टर ची अशीच एका दिवसात गच्छंती झाली आणि ही कथा सुचली. अरे बाबा मोठ्ठ्या पोस्ट वरचे प्रमादही मोठेच असतात. अशा लोकांना एकही दिवस ठेवत नाहीत. नाहीतर त्यांची न्युसन्स व्हॅल्यु फार असते. आमच्या ऑफीस मधे ही ५ वर्षां पुर्वी एका ग्रुप कंपनीच्या सी. इ. ओ ला असेच पळवले होते. मागच्या आठवड्यात एका लॉयर ची अशीच उचल बांगडी झाली.
सध्या हे असे प्रकार हा कॉर्पोरेट जगाचा एक भागच झालेला आहे. मीडिया साठी तो माणुस रजेवर असतो. पण प्रत्यक्षात त्याला त्या क्षणीच हकललेले असते.
कथेचा गाभा छानच आहे. पण,
कथेचा गाभा छानच आहे.
पण, खंडेलवालने टाकलेली काडी आणि त्याने भडकलेली आग याचा खुलासा नीट होत नाहीये.
शिवाय, एकाच प्रसंगात बायकोने केलेली कानउघडणी - असं मर्यादित स्वरूप न ठेवता काही मोजक्या प्रसंगांतून किंवा फ्लॅशबॅकमधून ते सूचित झालं तर वाचायला अधिक मजा येईल.
मो की मी शी सहमत... उलट
मो की मी शी सहमत... उलट उच्चपदस्थांना अश्या केसेस मध्ये तुरंत हाकलले जाते.. कॉर्पोरेटचे असे अनुभव मी देखील पाहिलेत.. सकाळी-दुपारी लेटर हातात की आजच तुमचा लास्ट डे... आणि ते फॉल्टमध्ये असल्याने गपचूप निघतातच.. बाकी न्यायनिवाडा त्या आधी चालू असतो.. त्यामुळे त्यांना धक्का असा बसत नाही, कल्पना आली असतेच..
तर बर्याचदा त्यांचे अधिकार, त्यांच्या हातातील प्रोजेक्ट काढून घेतात, आणि त्यांना कल्पना येते की आता आपले चार-चौदाच दिवस उरलेत..
छान आहे कथा. पण, खंडेलवालने
छान आहे कथा.
पण, खंडेलवालने टाकलेली काडी आणि त्याने भडकलेली आग याचा खुलासा नीट होत नाहीये.>> अनुमोदन.
शिवाय, एकाच प्रसंगात बायकोने केलेली कानउघडणी - असं मर्यादित स्वरूप न ठेवता काही मोजक्या प्रसंगांतून किंवा फ्लॅशबॅकमधून ते सूचित झालं तर वाचायला अधिक मजा येईल.>> अनुमोदन
अर्थात पहिलाच प्रयत्न असल्याने छानच.
पहिलाच प्रयत्न छान आहे. ऑफीस
पहिलाच प्रयत्न छान आहे.
ऑफीस मधलं यश म्हणजेच सर्वस्व नसतं. तो एक भाग असतो जीवनाचा, सर्वस्व नाही. >>> +१
good
good
लले... सुचना लक्षात ठेवेन.
लले... सुचना लक्षात ठेवेन. पुढल्या वेळेला .... कथेचं तंत्र नविन आहे मला. खुप धन्स
सगळ्या लोकांचे धन्यवाद. वेळ काढुन वाचलत आणि प्रतिक्रियांसाठी म्हणुन....
गुड वर्क. आवडली.
गुड वर्क. आवडली.
छान
छान
छान
छान
मोकिमी, तुम्ही आजून कॉर्पोरेट
मोकिमी,
तुम्ही आजून कॉर्पोरेट कथा लिहा! वाचायला आवडतील.
आ.न.,
-गा.पै.
कथा छानच आहे पण ती उत्तम
कथा छानच आहे पण ती उत्तम निश्चित होउ शकेल. अर्थात तुमचा हा पहिलाच प्रयत्न आहे त्या अर्थी तुमच्या कडुन अजुन भरपूर काही चांगल वाचायला मिळेल याची खात्री आहे..................... पुलेशु. फक्त आता कमर्शीयल ब्रेक घेवु नका.................... लिहीत रहा................... आम्ही वाचणार याची खात्री बाळगा...............
तुम्ही अजून कॉर्पोरेट कथा
तुम्ही अजून कॉर्पोरेट कथा लिहा! वाचायला आवडतील. >>> हो, हो... हे मात्र खरं.
अरे!!!! काय प्रतिक्रिया आहेत.
अरे!!!!
काय प्रतिक्रिया आहेत. खरच मी भारावले. आपलं लेखन लोकांना आवडलय ह्या सारखं सुख नाही. खरच तुम्हा सर्वांची मी आभारी आहे.
मी कथा प्रांतात नविन आहे. पण आवड खुप आहे. मी तुमच्या सगळ्या सूचना आमलात आणायचा मनापासून प्रयत्न करेन.
कॉर्पोरेट कथा>>> हा शब्द आवडला.
नीलूने अगदी योग्य शब्दात
नीलूने अगदी योग्य शब्दात राजीवची कानउघडणी केली. सडेतोड नीलू आवडली.
ऑफीस मधलं यश म्हणजेच सर्वस्व
ऑफीस मधलं यश म्हणजेच सर्वस्व नसतं. तो एक भाग असतो जीवनाचा, सर्वस्व नाही....
नात्यात हे अस होत असत का...??????
आवडली. खुप छान आहे....
Pages