सभामंडप लोकांनी भरलेला. स्टेज हारफुलांनी सजवलेलं. स्वयंसेवक इकडुन तिकडे करताहेत.
प्रत्येकाच्या चेहर्यावर उत्सुकता मंत्री महोदयाना पहाण्याची, त्यांचे भाषण ऐकण्याची.
" काय सुन्दरभाषण देतात ते..." एकमेकांमध्ये कुजबुज.
"अहो खरंच काय नि:स्वार्थी समाजसेवक आहेत हे"
" हा खरा समाज्सेवक आहे. अहो आतापर्यंत ह्यानी समाजाची कितीतरी कामं
केली आहेत. कुणाला नौकरी लावून देणं, कुणाला कॉलेजमध्ये दखला
मिळवून देणं कुणाचं कांही कुणाचं कांही."
लोकांचा गोन्धळ सुरु झाला. मंत्री महोदय आले. लोकांनी त्यांचा जयजयकार सुरू केला.
ठिकाण-हॉटेल जनसेवा,लक्ष्मीपथ.ऑक्टोंबर१९८७ -दिवाळीतील भर दुपार -मला माहित आहे कि,हि वेळ आणि हे ठिकाण,हे काही डायरी लिहण्याचे ठिकाण नाही. आणि पुण्यातील हॉटेले म्हणजे,खाद्य पदार्थ गरम असतीलच याची खात्री नाही,पण मालक मात्र केंव्हाही गरमच."या ठिकाणी टेबल खुर्ची खाण्याची सोय म्हणून असते,ती लिहण्यासाठी वापरू नये."या सारख्या पुणेरी सल्ल्याच्या पाट्या टाळून,मी इथे आलो होतो.आणि बाहेरील उन्हाने नाही,पण नुकत्याच पाहिलेल्या दृश्याने,पुरता करपलो होतो.
आज वसतिगृहातला शेवटचा दिवस होता.पाच वाजता निरोप समारंभ झाला. भरल्या मनाने,
भरल्या डोळ्याने सर्वांचा निरोप घेऊन सुमित्राबाई निघाल्या.घरी पोहोंचल्या तेंव्हा रात्रीचे नऊ वाजले होते.
पहाटे लवकर निघायचे होते. पाचला ट्रेन होती.थकून जाऊन त्या खुर्चीत बसल्या. सगळ्यांचे रडवेले चेहरे त्यांना आठवत होते. नर्मदा, रुक्मिणी, नादिरा त्यांचे भरलेले डोळे पुन्हा पुन्हा आठवत होते. आणि ती शामला... ती
तर किती लहान आहे. नेहमी घाबरल्यासारखी असते. कुणीतरी सतत जवळ असावसं तिला वाटत.त्यांचा
पाय तिथून निघत नव्हता. मुलीला सासरी सोडून निघताना काय वाटत असेल त्याची जाणिव झाली त्यांना.
तंद्रीभंग पावल्यावर, त्यांने इकडे-तिकडे पाहिले. हातातील वही त्यांने बाजूला ठेवली, सर्वत्र एक प्रकारची निरव शांतता पसरली होती. निरवपेक्षा भयाण हा शब्द शोभेल. समोर समुद्र गरजत होता, दुपारभर तळपत असलेला सुर्य थोडा सुस्तावला होता. हलकेच हसला देखील असावा, त्यांने मान इकडे तिकडे हलकेच हलवली, हलका चेहरा दिसला पण ओळख पटली नाही. कितीवेळ बसला होता कोण जाणे, वेळेचा हिशोब करणे शक्यतो त्यांने सोडून दिले होते, फाटके चप्पल, अस्ताव्यस्त कपडे, वाढलेली दाढी, न विंचरलेले केस, समोर पडलेले विडीचे थुटके हे सर्व साक्ष देत होते.
एकोणचाळीसाव्यावर्षी तिला तिच्या बारावीच्या सर्टिफिकीटची गरज लागली.एका डिप्लोमासाठी.अर्हता बारावी.पुढे पदवी मिळवली असली तरी बारावीचं सर्टिफिकीट मस्ट. विद्यापिठाचा नियम.पदविकेची दोन वर्ष होत आलेली.पुढचं वर्ष शेवटचं.आत्ता संस्थेनं सांगितलं, आणून द्या लवकर नाहीतर खरंच प्रॉब्लेम होईल.एफ वायचं आहे,एस वायचं आहे,टी वायचं तर आहेच पण बारावीचंच पायजे!आणि ते तर नाही! गेलं कुठे? त्याच्या छायांकित प्रति आहेत. पण त्या नाही चालत. ओरिजनलच पाहिजे!
शांत चेहेरय़ाच्या वसुधा अल्मेडा.चर्चच्या बाकावर बसलेल्या.शनिवार संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर.त्यांचे दोन्ही हात पुढ्यातल्या डेस्कवर कोपरापासून उभे.दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंफलेली.हनुवटीचं टोक गुंतलेल्या त्या पंज्यांवर अलगद टेकवलेलं.नजर आधीच शांत.त्या नजरेत अस्पष्टशी दैवी चमक.नेहेमीप्रमाणे त्यांचे डोळे लागलेले चर्चमधल्या संगमरवरी मूर्तीकडे.मेरीआई आणि तिच्या कडेवरचा गोंडस येशू.खाली, जमिनीवर उतरू बघणारा.ह्या मूर्तीमुळेच हे चर्च वसुधा अल्मेडांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन बसलेलं.
गेले दोन दिवस तिच्या अंगावर सुस्ती होती. अन्नावरची वासना उडाली होती. बारिकशी हालचाल करण्याचाही
उत्साह नव्हता अंगात. एक प्रकारचे जडत्व आले होते शरीरात. अंगाला डसणाऱ्य मुंग्यांचेही तिला काही
वाटत नव्हते. तिच्या अंधा-या घरात ती निपचित पडून होती. यापूर्वीही तिला असे झाले होते, दोन चार
वेळा. बेचैनी अगदी शिगेला पोहोचली होती.
पण आजचा दिवस उजाडला तोच मुळी नवे चैतन्य घेउन. तिच्या सर्व शरिराला त्या चैतन्याने व्यापले.
घरातल्या अंधारात थांबणे अशक्य झाले तिला. ती बाहेर पडलीच. मोकळ्या हवेत तिने श्वास घेतला.
दिवस नुकताच उजाडला होता. सूर्याची कोवळी किरणे सर्व आसमंताला कुरवाळत होती. तिच्या मूळच्याच
"चि. सुधीर, सौ. विद्या, अनेक आशीर्वाद.
आशा आहे की आत्तापर्यंत पोलिसाची चौकशी पूर्ण झाली असेल आणि माझ्या दोन ओळींची चिठ्ठीने त्यांचं समाधान झालं असेल. पण मी हे पाऊल का उचललं त्यामागचा हेतू तुम्हाला विस्तारानं सांगणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुमचा हक्कदेखील. म्हणून हे पत्र.
माझा मोबाईल नंबर मी फ़ार कुणाला देत नाही, त्यामूळे तिने माझा नंबर माझ्या कुठल्यातरी मित्राकडून
मिळवला आला असावा. पण ते तिलाच विचारला आले असते, प्रत्यक्ष भेटीत.
तर असाच एका संध्याकाळी मला फोन आला. नावाची वगैरे खात्री करुन झाल्यावर, मला तिने भेटायची
इच्छा दाखवली. माझ्या कुठल्यातरी एका जून्या कथेबाबत तिला माझ्याशी बोलायचे होते. खरे तर मला
त्या कथेचे नाव अजिबात आठवत नव्हते, अंजली देशपांडेची कथा असेच ती म्हणाली.
मला नाही वाटत कि असे काहिसे नाव मी कुठल्याही कथेला दिले असेल. त्या काळात नूकत्याच कथा
वगैरे लिहायला सुरवात केली होती, पहिल्यांदा जसे सगळेच अनुकरण करत असतात, तसेच मीही त्या
मायबोलीवर लिहिलेली हि माझी पहिली कथा.(कथा या निकषात बसतेय का ?) कदाचित जून्या मायबोलीवर अजून असेल. त्या काळात युनिकोड नव्हते. आम्ही शिवाजी फाँट्स वापरायचो, त्यामूळे ती कथा आता वाचायला कठीण जाते.
साधारणपणे पहिले लेखन असते तशीच ही आत्मकथा. यातल्या सर्व घटना खर्या. यातला हिंदीचा अतिरेक कदाचित खटकेल, पण मूळ संवाद जसे घडले तसेच लिहिलेत.
या घटना परदेशात घडलेल्या. त्या काळात मोबाईल, केबल टिव्ही वगैरे काहीच नव्हते. कथेतील कुटूंबाशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. पुढे तूरळक संपर्क होता, पण मग तो पारच तूटला. त्या काळात हि कथा लिहिलेली.