लोकलट्रेनमध्ये बसलो आहे. ऑफिसला चाललोय. काल झोपायला अंमळ जरा उशीरच झाला होता. झोप कमी झाली त्यामुळे अंग जरा आळसावल्यासारखे वाटतेय. गाडीने नुकतेच कल्याण सोडलेय. लोकलमधली अनाउन्सर बाई जीव खाऊन कोकलतेय. "पुढील स्टेशन ठाकुर्ली, अगला स्टेशन ठाकुर्ली, नेक्स्ट स्टेशन ठाकुर्ली". गाडीके 'पायदान पायदान' ऐकून ऐकून डोकं भिरभिरायला लागतं. शेजारील लेडीस फर्स्टक्लासच्या डब्यात एक गरीब म्हातारी हातात आपलं बोचकं घेऊन सीटवर बसली आहे. अजून पुष्कळ सीट रिकाम्या आहेत, पण इतर बायका तिला हळूच खुनन्सने बघतायत. थोड्यावेळाने त्यांचा उद्रेक होणारसं दिसतंय. पूर्वी कल्याण आणि ठाकुर्लीच्यामध्ये फक्त रान होतं.
भाग एक - http://www.maayboli.com/node/54368
भाग दोन - http://www.maayboli.com/node/54425
डायरीतील नोंद -- असलेली
अनासक्त योग पाण्यात राहून कमलपत्र लिप्त होत नाही, भाषा समजायला सोपी,पण आच्रायला अवघड. एरवी संथ असणाऱ्या सागरावर ६०-६० फुट उंचीच्या लाटा उठाव्यात,त्या वादळग्रस्त मनस्थितीत नव्हे,तर सदाच समुद्र सपाटी पासूनची उंची मोजली जावयाची, त्या पृष्ठभागावरचा स्थिर बुद्धीचा,जीवनाची उलथापालथ घडवून आणणारा निर्णय.
आज पितृदिन - खरेतर आपल्या पहिल्या दोन नात्यातील एका नात्याचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस . जे बंध जाचक वाटत नाहीत तर अगदी सह्य होतात ते म्हणजेच ऋणानुबंध .
आज या नात्या कडे पाहताना म्हातारा ,बाप ,पिताश्री, वडील अश्या अनेक उपाध्या मिरवणारे हे नाते प्रत्येकासाठी किती हळवे व गुंतागुंतीचे आहे याचा विचार करताना मन अनेकदा कातर होते. आई,वडिलांना सांभाळणे हे कर्तव्य मानणे इथ पासून ते आई कोणाकडे किती दिवस किंवा वडिलांना सांभाळणे हेच ' डील ' होताना दिसते तेंव्हा मन हतबल होते.
आज पितृदिनाचे निमित्ताने मी आपल्या समोर एक लेख मालिका ठेवत आहे, तिचे नाव आहे ' माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून '
ठिकाण घर वेळ मध्यरात्र - २/३ जानेवारी १९८८ - समोर टेबल वर अलकाने दिले पार्सल.मी एकटक याचे कडे पाहतोय मनात अतिशय उत्सुकता आहे. पण अद्याप धीर होत नाही आहे.मनात अनेक प्रश्न, अनेक विचार,शेवटी मनाचा हिय्या करून पार्सल उघडले तर त्यात काही रिपोर्ट्स,एकस रे , आणि अलकाचे प्रदीर्घ पत्र.मनात चर्र झाले.आणि मी पत्र वाचायला घेतले.
प्रिय वीरेंद्र !
दुसऱ्या दिवशी रुटीन सुरु करवयाचे असल्याने आम्ही रात्रीच परतीच्या प्रवासास लागलो. (क्रमशः)
१जानेवारी १९८८ नव वर्ष प्रारंभ- नवे संकल्प कि नवे प्रश्न- आज सकाळ पासून दिवस धावपळीतच गेला.कोकणातून परतायलाच उशीर झाला. जवळ जवळ सकाळी नऊ वाजता घर गाठले.रजा संपली असल्याने धावपळतच ऑफिस गाठले.दुपारी लंच घ्यायला पण उशीर झाला.त्यात नवीन वर्षाची सुरवात म्हणून, साहेबांनी मिटिंग ठेवली. दुपारी साडेतीन ते पाच वाजे पर्यंत मिटींगच चालली.
ठिकाण-घरी-३० डिसेंबर१९८७ वेळ रात्र.थोड्या वेळापूर्वीच एक जुना मित्र येवून गेला.शाळेतील मैत्री.त्यामुळे गप्पा सहजच रंगल्या.उद्या कोकणात एखाद्या अपरिचित बीचवर जावून यावर्षी कविता वाचन आणि आपली आठवण सांगत,नव वर्षाचे स्वागत करूयात.असा कार्यक्रम घेवून तो आला होता.इतका चांगला योग लवकर येणार नाही म्हणून,त्याला बसवून,पटकन अलकाच्या आईस फोन केला.खरे तर अनेक वर्षांनी घरी फोन केला होता.कोण फोन घेताय कोणास ठावूक? असे म्हणत,नंबर फिरवला.नशीब जोरावर होते.आईनेच फोन घेतला.त्यांना म्हटले,वीरेंद्र बोलतो आहे.मी उद्या बाहेरगावी जात आहे,तर पार्सलसाठी कोणी आले तर काय करायचे?
ठिकाण-घरीच,नाताळ-२५ डिसेंबर१९८७- काळ कसा वेगाने धावतो.कालच अलकाच्या आई घरी येवून गेल्या. त्यांनी निरोप दिला.खरेतर निरोपाचा अर्थ, मी रात्रभर विचार करून देखील उलगडलेला नाही.अलकाची कोण मैत्रीण? आणि ती मला कसले पार्सल देणार? काय असेल त्यात?बर हा निरोप आईकडून आणि तोही समक्ष,आई सोबत का दिला बरे या अलकानी! विचाराने अक्षरशः डोके फुटायची वेळ आली.
ठिकाण-हॉटेल जनसेवा,लक्ष्मीपथ.ऑक्टोंबर१९८७ -दिवाळीतील भर दुपार -मला माहित आहे कि,हि वेळ आणि हे ठिकाण,हे काही डायरी लिहण्याचे ठिकाण नाही. आणि पुण्यातील हॉटेले म्हणजे,खाद्य पदार्थ गरम असतीलच याची खात्री नाही,पण मालक मात्र केंव्हाही गरमच."या ठिकाणी टेबल खुर्ची खाण्याची सोय म्हणून असते,ती लिहण्यासाठी वापरू नये."या सारख्या पुणेरी सल्ल्याच्या पाट्या टाळून,मी इथे आलो होतो.आणि बाहेरील उन्हाने नाही,पण नुकत्याच पाहिलेल्या दृश्याने,पुरता करपलो होतो.
ठिकाण गरवारे कॉलेज मे १९८५ भर दुपार - मन कशात रमवायचे ?काही तरी ध्येय,काही तरी उद्दिष्ट हवे. नोकरीत प्रगती,बढती यात कर्तृत्वापेक्षा संस्थेची गरज मोठी म्हणून तिथे बढती झाली.जोशीबुवांसारखे काही वरिष्ठ मनातून करपले. पण त्यास आमचा,म्हणजे नव्या पिढीतील ज्यांनी बढती स्वीकारली त्यांचा काहीच दोष नव्हता. पदवीधर असणाऱ्या प्रत्येकास समान संधी होती. जावू दे,असे लोक भेटतच राहणार.आज मी ठरवले कि,पुढे शिकायचे आणि उठून थेट कॉलेज गाठले. एम.कॉम. साठी प्रवेश घेतला. मनात नोकरी आणि हे एकत्र जमेला का ? असा प्रश्न स्वतःला विचारत बाहेर पडलो आणि ध्यानी मनी नसताना समोर अलका आली. माझे येथे असणे तिलाही अनपेक्षित.
ठिकाण ऑफिस मार्च १९८५ -मला आठवतेय सोमवार होता. नवीन आठवड्याची सुरवात,थोड्या तापलेल्या वातावरणातच झाली. कारण दोन दिवसात अर्ज मागवून,सर्व पदवीधर स्टाफ करिता परीक्षा घेवून, बढतीची संधी देण्याचे ऑफिसने नक्की केल्याची सूचना लेखी आली होती. आमचा खडूस साहेब स्वतः बाहेर येवून,त्यांनी मला केबिन मध्ये बोलावले. आणि"हे पहा, धारवाडकर तुम्ही बी.कॉम.आहात मला तुमचा अर्ज पाहिजे". मला आता सरावाने माहित झाले होते कि, बोलताना हा साहेब अहो,जाहो करू लागला कि समजायचे कि ते एच.ओ.च्या वतीने बोलत आहे. मला काय,नोकरी महत्वाची म्हणून "हो"म्हणालो.अर्ज तिथेच भरून दिला.अर्ज घेत साहेब प्रसन्न चेहऱ्याने धन्यवाद!