ठिकाण घर वेळ मध्यरात्र - २/३ जानेवारी १९८८ - समोर टेबल वर अलकाने दिले पार्सल.मी एकटक याचे कडे पाहतोय मनात अतिशय उत्सुकता आहे. पण अद्याप धीर होत नाही आहे.मनात अनेक प्रश्न, अनेक विचार,शेवटी मनाचा हिय्या करून पार्सल उघडले तर त्यात काही रिपोर्ट्स,एकस रे , आणि अलकाचे प्रदीर्घ पत्र.मनात चर्र झाले.आणि मी पत्र वाचायला घेतले.
प्रिय वीरेंद्र !
काय म्हणू पुढे? तुझे एप्रिल फुल नसलेले दिनांक एक एप्रिल १९८५चे पत्र,तसेच मला आणि गुप्तजींना एकत्र पहिल्यानंतरचे तुझे पत्र दोन्ही मिळाली.एकात तू प्रेमाचा स्वीकार मी करावा म्हणून मनापासून विनंती केली आहेस.तर दुसऱ्या पत्रात माझ्या निरागसतेवर आक्षेप घेतला आहेस.अर्थात तरीही तू मला माझी बाजू मांडायची संधी ठेवलीस,ते वाचून मन भरून आले रे.नियतीने अनेकदा संधी दिली आणि परिस्थीतीच अशी बदलत गेली कि ........
जावू दे असे तुटक तुटक सांगून तुला कोड्यात ठेवण्यापेक्षा प्रथम पासून सर्वच सविस्तर सांगते.
२६ जानेवारी १९८४.आपण पुणे विद्यापीठात फिरायला गेलो होतो.जयकर ग्रंथालयाच्या पायरीवर बसून आपल्या गप्पा चालल्या होत्या.तू अगदी सहजतेने माझा हात हातात घेतलास. किती आश्वासक स्पर्श होता म्हणून सांगू.जणू पृथ्वीतलावरचे सारे सुख पायाशी चालत आले आहे असे वाटले.गेली एक दीड वर्षे मी तुला पाहतेय ,त्यातून तुझा माझा परिचय झाला.पण असा परिचय आणि साथीदारास ओळखणे,या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत,याची मला जाणीव होती तेंव्हा होती आणि आजही आहे.आणि म्हणूनच त्या पहिल्या आश्वासक स्पर्शाच्या वेळीच,मला माझ्या मित्रातील पुरुष,तपासून घ्यावा असे वाटले.आणि म्हणूनच तुला माझी पूर्वकहाणी नमूद केली.त्यावर तुझी प्रतिक्रिया उत्स्फूर्त सावध अशी वाटली.अर्थात मला मी काही चूक केली,असे कधीच वाटले नाही,पण तुझ्या प्रतिक्रियेने त्या दिवशी तरी नक्कीच हेलावले, घरी आले आणि डोके प्रचंड दुखू लागले ठणका थाबय्लाच तयार नाही.तशीच पडून राहिले,पण बिलकुल उतारा पडलाच नाही.आई माझी तळमळ बघून म्हणाली, "दिवसभर उन्हातान्हात फिरायचे आणि त्यावर वेडेवाकडे खाणे मग काय होणार? आत्ता थोडा तूप भात खा एक क्रोसिन घे आणि झोपून जा सकाळी बरे वाटेल " शेवटी तेच करून झोपले.
दुसरे दिवशी सगळे रुटीन नेहमीसारखे सुरु झाले. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. पुढे दर दोन चार दिवसांनी हा त्रास सुरु झाला. पुढे ऑफिसात देखील माझे हसरे वावरणे कमी झाले.तू मात्र त्याचा अर्थ कदाचित आपल्या विद्यापीठ भेटीशी जोडला असशील. पण प्रत्यक्षात तो माझा डोकेदुखीने हैराण होण्याचा काळ होता. मलाच समजत नव्हते कि काय झालेय. ऑफिस मध्ये आजारपणावर चर्चा नको म्हणून मी तुझ्याशीच काय पण कोणाशीच बोलले नाही. ऑफिस मध्ये येणाऱ्या सप्लायर्स पैकी श्री.डिसिल्व्हा यांनी एक दोनदा मला डोके ठणकत असताना पहिले. त्यांनी केवळ माझ्या डोके दाबण्याच्या पद्धतीवरून मला विशिष्ट प्रकारचा अर्धशिशीचा त्रास होतोय हे ओळखले मग एक दोन वेळा त्यांच्या परिचयाच्या डॉक्टर सांगून त्यांच्या कडे घेवून गेले.पण उतारा पडला नाही.
मग डिसिल्व्हांनीच गुप्ताजींची ओळख करून दिली.त्यांनी पहिल्या पासूनच जीव ओतून मदत करण्यास सुरवात केली.मलाही अगोदर थोडे आश्चर्य वाटले पण ते थेट घरी आले. आई बाबांशी बोलले त्यामुळे मी आपोआपच निर्धास्त झाले.पुढे मुंबईस जावून मी सर्व टेस्ट करून घेतल्या.त्याचा रिझल्ट आला.आणि त्या रिझल्टने माझे भावविश्वच कोलमडून पडले. आतापर्यंत फक्त मला आणि गुप्ताजीना ठावूक असलेली गोष्ट तुला सांगते. मी '... lymphoma.' या आजाराची बळी ठरलेली आहे.जो आजार पांढऱ्या पेशींच्या अनियंत्रित वाढीतून शरीरभर पसरतो. तर मी एक अशी दुर्मिळ अभागिनी आहे.
या आजारावर होणारे उपचार आणि त्याचा खर्च यांचे आकडे ऐकून माझे तर डोळेच पांढरे झाले.आज घडीला यावर करावयाच्या औषध उपचारांचा खर्च सुमारे ५ते ७ लाख असून सुमारे दीड वर्षांच्या औषध उपचारांच्या नंतर होणारा ऑपरेशनचा खर्च सुमारे ११ते १२ लाखाच्या दरम्यान आहे.बर ऑपरेशनची यशस्विता जरी ९८ टक्के असली तरी पुढे पाच ते सात वर्षात पुन्हा नव्याने त्रास होण्याची शक्यता ६० टक्के आहे.म्हणजे डॉक्टर मी व गुप्ताजी यांना हे सर्व सांगत होते.तेंव्हा माझ्या समोर अठरा ते वीस लाखाचा खर्च,आणि हातात राहिलेले तीन ते पाच वर्षांचे आयुष्य हे नुकसानीत टाकणारे उत्तर आले.पण हे आकडे आणि माहिती ऐकून गुप्त्ताजीचे डोळे मात्र चमकले होते.आणि का कोण जाणे पण त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव मात्र माझे काळीज चिरत गेले.
गुप्त्ताजींच्या आतील व्यवसायिक कसा जागा झाला आणि पुढे काय रामायण घडले हे लिहून तुला कळवण्याचे त्राण देखील आज राहिले नाहीत म्हणून मी इथेच थांबते. आणि पुढच्या आठवड्यात गुप्त्ताजींचे बिझनेस डील काय आहे ते तुला कळवते. कारण आजच्या त्यांच्या बुद्धिबळाचे चालीमध्ये मीच काय पण तू, सुजाता आणि माझे घरचे,सुजाताचे घरचे, इतकेजण प्यादी आहोत. त्यांची खेळी आणि त्यांचे चेक्स हे ऐकून या घडीला मी तरी चक्रावलेली आहे. पण विरू माणसे एखाद्याची आपत्ती देखील कशी इष्टापत्ती मानतात ते मी तुला सविस्तर कळवते, तोपर्यंत यावर तू कुणाशीही बोलायचे नाहीस.इतकेच माझे तुझ्याकडे मागणे आहे.
प्रिय वीरेंद्र !
तुला नुकत्याच पाठवलेल्या पार्सल मध्ये जे एक्सरे आहेत,ते मी तुला वास्तवाचे भान यावेत म्हणून पाठवले होते. नुकत्याच लिहलेल्या पत्रातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे, मला झालेला हा दुर्मिळ आजार आणि त्यावरचे उपचाराचे खर्च यांचे आकडे जेंव्हा गुप्तजींनी ऐकले, तेंव्हा त्यांनी मला सांगितले,यावर देखील मार्ग आहे. पण त्यासाठी तुझी साथ हवी आहे. मी सर्व तुझ्या आई बाबांशी बोलतो तू त्यासाठी मला परवानगी दे. मी सर्व तुझ्या समोर बोलेन पण मी हे सर्व का करयचे ठरवले आहे ते तुला नंतर सांगेन! तर प्रथम मी आई बाबाशी बोलू का हे तू सांग. एकूण समोर आलेली परिस्थिती आणि जगण्याची अनिश्चितता यातून त्यांनी माझ्या आई बाबांशी बोलणे हे मला जरासुद्धा गैर वाटले नाही.
त्याप्रमाणे मागील आठवड्यात ते आई आणि बाबांशी सविस्तर बोलले. अलकाचे आजारपण आणि त्यावरचा खर्च सुमारे २० लाख त्यांनी स्वतः करण्याची तयारी दर्शवली. पण त्यासाठी त्यांची एकाच अट आहे. सदर अट म्हणजे माझ्या आई बाबांनी माझे लग्न,गुप्तजींच्या एकुलत्या एक मुलाशी लावून द्यावे. सदर लग्नासाठी मला एक पैसा हि हुंडा मानपान म्हणून नको. उलट अलकाच्या लग्नातच,आपण तिच्या भावाचे लग्न करून घेवू. म्हणजे अलकाच्या जाण्याचे वेळीच,तुमच्या घरी सून येईल.आणि त्यामुळे तुमचे घरही आनंदाने भरून जाईल.त्यासाठी मी माझे मित्र सावंत यांची धाकटी मुलगी सविता हिचे स्थळ सुचवतो.आणि अल्कासाठी जरी हुंडा मानपान नको असले तरी,आपल्या मुलाचे लग्न व्यवस्थित रीतीरीवाजास धरून होईल याची जबाबदारी मी घेतो.
या त्यांच्या प्रस्तावाने मी आनंदले नाहीच पण पूर्ती चक्रावले.मला कळेना कि हा एवढा मदतीचा हात कशासाठी.बर ते मला आधीच म्हणाले होते कि,मी तुझ्याशी नंतर बोलेन, त्या प्रमाणे ते जे काही बोलले ते त्यांच्याच शब्दात ऐक.(क्रमशः)
गोष्ट अल्केची डायरीतील नोंदी,त्याही जशा हाताशी आल्या तश्या-भाग नऊ.
Submitted by किंकर on 13 March, 2011 - 11:03
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त चालु आहे कथानक थोडे
मस्त चालु आहे कथानक
थोडे मोठे भाग लिहीलेत तर बरे होईल..
पूढील भाग लवकर टाका
छान कथा आहे...लवकर पुढचा भाग
छान कथा आहे...लवकर पुढचा भाग टाका.
मस्त चाललीय. अगदी
मस्त चाललीय. अगदी उत्कंठावर्धक... पुढचे भाग येऊ द्या
खुप छोटासा पण मस्त भाग...
खुप छोटासा पण मस्त भाग... पार्सलचे गुपित तर आता उलगडले... पण उत्सुकता मात्र शमण्याऐवजी दुपटीने वाढली...काय असेल गुप्ताजींच्या मनात? लवकर पुढचा भाग लिहा