मोराची रांगोळी
लक्ष्मीपूजनादिवशी ही मोराची रांगोळी काढली होती.
लक्ष्मीपूजनादिवशी ही मोराची रांगोळी काढली होती.
घरामधे काही कॅन्ड़ी होया, त्या दिसयल आणि चवीला सुद्धा औषधासारख्य होत्या, त्यमुळे असा उपयोग केला
साहित्य: एका खोकयअचे क्व्हर, काळा कागद, सेलो टेप, ग्लू, कॅन्ड़ी, स्ट्रॉ
कृती: खोकयअचया कव्हर ला काळा कागद सेलो टेप ने लाउन फ्रेम चा बेस तय्यार केला. त्यावार स्ट्रॉ कापून चिकटावलया. कॅन्ड़ी वेग वेग्ळ्या फूलाच्या आकारमधे ठेव्ल्या. नंतर एकाएका कॅन्ड़ीला ग्लू लाउन चिक्ट्वल्या.
(मा. बो. व्रर खूप दिवासा नी लिहीत आहे, त्या मुळे मराठी टायपिंग बददल क्षमस्व)
सावलीने केलेला आकाशकंदील प्रचंड आवडला. सीटिएमएमने ह्या वर्षी आकाशकंदील स्पर्धा ठेवली होती आणि त्यात हाच आकाशकंदील करुयात म्हणुन ठरविले. सावलीने टेंपलेट तर पाठविली पण बाकी सामानाची जमवा जमव करे पर्यंत शुक्रवार उजाडला, स्पर्धा शनिवारी. शुक्रवारी ४ वाजता सुरु करुन रात्री ११ पर्यंत काम चालले. सावली तु खरचं महान आहेस. हा आकाशकंदील करताना सगळे टुल्स व्यवस्थित जमविले पाहिजेत. बारीक कापायचे काम साध्या पेपर कटरने केल्याने बराच वेळ लागला. क्विलींग टुल वापरताना मज्जा आली. छोट्या फुलपाखरांवर थोडं स्पार्कल लावलं.
सावली खुप खुप धन्यवाद!
आम्हाला दुसरं बक्षिस मिळालं.
मिनी साइझ कॉफी फ्रेम्स
साइझ : 8 x 10 in.
आधी केलेल्या फ्रेम्स च्या साइझ पेक्षा लहान आहेत म्हणुन मिनि साइझ फ्रेम्स असे शीर्षक दिले .
नेहमी प्रमाणे comments ची वाट बघते आहे.
तुम्हाला आणि तुमच्या आप्तस्वकीयांना दिवाळी निमित्त फराळी शुभेच्छा!!!
गुलमोहरातल्या कला विभागात पाऊल वाकडं पडेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण होतात काही चुका हातून, पुन्हा पुन्हा होतात. नवीन लेखनाची सुरुवात करताना लाजेकाजेस्तव का होइना कला, हस्तकला अशा शब्दखुणा घ्याव्या लागतात. तर ही त्या चुकांची बाळं(*)-
आला, आला, भुताटकीचा आनंदी सण आला. सगळ्यांना हॅप्पी हॅलोविन!!
मागच्या वर्षी हॅलोविनच्या या धाग्याला माबोकरांनी खूप छान प्रतिसाद दिला. तुमच्या प्रोत्साहनाने हुरूप आला. यावर्षी देखील त्याच उत्साहाने आणि त्याच धावपळीत या वर्षीची सजावट केली. भोपळे आणले , चित्रं काढली, आणि कोरीव काम केले. यंदा ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चित्रीत करण्याचा हा प्रयत्न.
सर्वप्रथम शेतातून भोपळे आणले. त्या वरची माती, पालापाचोळा, धुवून टाकला. स्वच्छ झालेले हे टवटवीत भोपळे.
प्रचि १
नमस्कार मंडळी !
झाली का दिवाळीची तयारी ?
दिवाळी म्हणजे फ़राळ. . . तो फ़राळाचा दरवळ, दिवाळी म्हणजे तोरणे रांगोळ्या फुलांच्या सजावटी . . . . दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, माळा…. पणत्या आणि मुख्य म्हणजे आपला घरादाराची शान वाढवणारा आकाशकंदिल.
मी शक्यतो पारंपरिक पद्धतीचा रंगित कागदाचा बनवलेला आकाशकंदिल प्रेफर करते. आणि तो मला स्वत:ला बनवायला आवडतो. मागच्या वर्षी इथे शेअर करायला उशीर केला म्हणून काही फ्रेंड्स नाराज होते. म्हणून आज दिवाळीच्या आधीच तुमच्याशी हे फोटो शेअर करतेय.
यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !
परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!