संगीत

लखनऊतले दिवस - श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

विख्यात गायिका श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर फेब्रुवारी, २००९ ते सप्टेंबर, २०१५ या साधारण सहा वर्षांच्या काळात लखनऊ इथल्या भातखंडे संगीत संस्थानच्या विश्वविद्यालयात कुलपती म्हणून कार्यरत होत्या. संगीतविश्वात भातखंडे संस्थानाचं महत्त्व फार मोठं आहे. या विश्वविद्यालयातल्या व्यवस्थापनात अन् एकूणच संगीताच्या अभ्यासक्रमात त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केलं. भल्या-बुर्‍या अनुभवाला कणखरपणे सामोरं जात कुलपती म्हणून यशस्वी कारकीर्द पूर्ण केली...

***
प्रकार: 

भान

Submitted by महेश भालेराव on 27 September, 2016 - 01:38

भान

आम्ही षंढ झालो, बुद्धीने मनाने
विचारांचे आम्हा, कुठे भान आहे ?
लक्तरे उडाली , स्त्री समानतेचि
तयाची आम्हा ,कुठे जाण आहे ?

संस्कृतीही नाही , प्रकृतीही नाही
विकृतीच आता, ओकतो कुठेही
होऊनि हिंस्त्र, पशुसारखे त्या
लाज अंतरीची, सांडतो कुठेही

कुठे सभ्यतेची, व्याख्या मिळावी ?
जावे कुठे , शोधण्या शील-नीती ?
ओरबाडून घेतो, हवे जे आम्हा ते
कोल्हे गिधाडयांना, आता आमुची भिती !

पुढे जायची जिद्द , कुठेही कसेही
खोडी लबाडी, आमुचे कर्म आहे
सदा नित्य सलगी, लोभ लालसे शी
लुटनेच आता ,आमुचा धर्म आहे

संवेदना, भावना शब्द केवळ

विषय: 

'प्रेम पिसे भरले अंगी'

Submitted by संदीप ताम्हनकर on 25 September, 2016 - 11:19

तुम्हाला जर खरा आणि निखळ आनंद हवा असेल तर पुढील पोस्ट टाकतोय ती कृपया वाचा. (राहुदेत बाजूला ते मोदी, मार्टिअर, मराठे आणि मोर्चे)
पोस्ट वाचा, गाणे वाचा, गाणे ऐका - एका अप्रतिम आनंदाचा अनुभव घ्या.
एक जुनं मराठी गाणं आहे 'प्रेम पिसे भरले अंगी', गायलंय वाणी जयराम, संगीत - वसंत देसाई, सन - माहित नाही साधारण १९७० असेल.

विषय: 

पं. रघुनंदन पणशीकर यांची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची मैफिल - लाईव्ह प्रक्षेपण

Submitted by admin on 24 September, 2016 - 20:11

षडज, बॉस्टन आयोजीत
रघुनंदन पणशीकर यांची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची मैफिल
या मैफिलीचा काही भाग मायबोलीच्या फेसबुक पानावर लाईव्ह ऐकता येईल शनिवारी, म्हणजे २४ सप्टेंबर रोजी, साधारण ८:३० वाजता संध्याकाळी EST / ५:३० संध्याकाळी PST / ६:०० सकाळी IST)
www.facebook.com/maayboli
गायक : पं. रघुनंदन पणशीकर
तबला : भरत कामत
हार्मोनियमः निरंजन लेले

विषय: 

कोल्ड प्ले कॉन्सर्ट

Submitted by अश्विनीमामी on 15 September, 2016 - 03:26

कोल्डप्ले ह्या गॄपचे भारतात मुंबई येथे कॉ न्सर्ट होणार आहे. त्याच्या तिकीटा साठी झुंबड उडाली आहे.

जे झी पण येणार आहे. वहिनी येणार नाहीत बहुतेक. तर ह्या इवेंट ची चर्चा करण्या साठी धागा.
जगातील गरीबी दूर करण्यासाठी झटणार्‍या इनिशिएटिव्हतर्फे हा काँसर्ट होणार आहे. तिकीटी ५००० रु. पासून सुरू आहेत.

जसजशी माहिती मिळेल तसे इथे अपडेट करत जाईन.

विषय: 

संगीतक हे नवे - रिक्षावाला आणि मी

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 September, 2016 - 12:56

मजा घेत वाचा Happy

कामावर जायलाऽऽऽऽ...
उशीर व्हायलाऽऽऽऽ...
कामावर जायला, उशीर व्हायला.,
लावतोय रिक्षावालाऽऽ
ग्ग वाट माझी लावतोय रिक्षावाला..

साडेआठ वाजताऽऽऽऽ...
आलेय नाक्यालाऽऽऽऽ...
साडेआठ वाजता, आलेय नाक्याला,.
वाजले की आता बाराऽऽ
ग्ग वाट माझी लावतोय रिक्षावाला..

...

तर लोकहो,
दुपार तशी मस्त होती, पण गर्लफ्रेंड आपली, (रुनम्याची हो) त्रस्त होती
पोहोचायचे होते टायमावर, पण सारी लाईने व्यस्त होती

रिक्षा काही मिळत नव्हती, वेळ नुसती पळत होती
दिसत होती लांबून लांबून, पण येत नव्हती थांबून थांबून

जायचे होते तिला जिथे,
रिटर्न भाडे नव्हते तिथे

डबल भाडे द्यावे लागेल,

विषय: 

शास्त्रीय गायन - लाईव्ह प्रक्षेपण

Submitted by admin on 11 September, 2016 - 10:43

रविवारी, म्हणजे ११ सप्टेंबर रोजी, साधारण ११:३० वाजता सकाळी EST / ८:३० सकाळी PST / ९:०० रात्री IST या वेळेप्रमाणे मायबोलीच्या फेसबुक पानावर आम्ही "Tribute to Vidushi Dr Veena Sahasrabuddhe" हा संगीताचा कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपित करणार आहोत. तो जरूर पाहा आणि प्रक्षेपण व कार्यक्रम कसे वाटले, तेही कळवा.

https://www.facebook.com/Maayboli/

माहिती हवी आहे.

Submitted by केअशु on 4 September, 2016 - 10:21

खालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने इकडे आलो आहे.अाता सर्वजण गणेश आगमनाच्या तयारीत असतील.त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो.

1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल?

शब्दखुणा: 

कोक स्टुडिओ पाकिस्तान – सबकुछ!

Submitted by जिज्ञासा on 27 August, 2016 - 12:50

साल २००८ पासून सुरु झालेल्या ह्या कार्यक्रमाचा सध्या नववा सिझन चालू आहे. पाकिस्तानातील विविध पारंपरिक गानप्रकारांना नव्या वाद्यमेळासोबत आणि नव्या आवाजात पेश करणे ही ह्या कार्यक्रमाची प्रमुख ओळख. ह्या कार्यक्रमाची कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्याचे नाव रोहेल हयात. त्यानेच ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या सहा सिझन्सची निर्मिती केली आहे. २०१४ म्हणजे सिझन ७ पासून स्ट्रिंग्स ह्या प्रसिद्ध बँडने ह्या कार्यक्रमाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.

Pages

Subscribe to RSS - संगीत