संगीतक हे नवे

संगीतक हे नवे - रिक्षावाला आणि मी

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 September, 2016 - 12:56

मजा घेत वाचा Happy

कामावर जायलाऽऽऽऽ...
उशीर व्हायलाऽऽऽऽ...
कामावर जायला, उशीर व्हायला.,
लावतोय रिक्षावालाऽऽ
ग्ग वाट माझी लावतोय रिक्षावाला..

साडेआठ वाजताऽऽऽऽ...
आलेय नाक्यालाऽऽऽऽ...
साडेआठ वाजता, आलेय नाक्याला,.
वाजले की आता बाराऽऽ
ग्ग वाट माझी लावतोय रिक्षावाला..

...

तर लोकहो,
दुपार तशी मस्त होती, पण गर्लफ्रेंड आपली, (रुनम्याची हो) त्रस्त होती
पोहोचायचे होते टायमावर, पण सारी लाईने व्यस्त होती

रिक्षा काही मिळत नव्हती, वेळ नुसती पळत होती
दिसत होती लांबून लांबून, पण येत नव्हती थांबून थांबून

जायचे होते तिला जिथे,
रिटर्न भाडे नव्हते तिथे

डबल भाडे द्यावे लागेल,

विषय: 

’संगीतक हे नवे’ - रिक्शावाला आणि मी!

Submitted by कविन on 12 September, 2016 - 03:47

(ओ डिजेवाले बाबु मेरा गाना चला दो गाना चला दो गाणं वाजत होतं रिक्षात आणि मी त्याला स्टेशनवर यायला विनवत होतो तेव्हाचा आमचा संवाद... इंपॅक्ट अर्थात त्यावेळी वाजत असलेल्या गाण्याचा)

मी:

रिक्षावाले काका, मला ठेशनात सोडा ना
ठेशनात सोडा ना, ठेशनात सोडा ना

रिक्षावाले काका, मला ठेशनात सोडा ना

ओ रिक्षावाऽऽले, जरा लवकर तुम्ही चला नाऽ
माझी लोकल निघून जाईल नाऽ

ओ रिक्षावाऽऽले

रिक्षावाला :

ओऽय कॉलरवाले भाऊ, जरा दमान घे रे
खालीपिली डोका माझा नक्को खाऊ रे
शेअर नाय भेटला तर मी नाय नेणार रे
भेज्यात तुझ्या तू हे फ़िट करुन घे रे

ओऽय कॉलरवाले भाऊ जरा दमान घे रे

संगीतक हे नवे - रिक्शावाला आणि मी!

Submitted by सोनू. on 10 September, 2016 - 14:52

या दूरच्या दूर ओसाड जागी
किडे पाखरांवीण नाही कुणी
जावे कसे काम करण्यास आता
पहावे कुठे एक रिक्षा जुनी

तितक्यात भरधाव धाऊनी आली
पॉ पॉ करूनी रिक्षा कशी
साशंक मन हे आनंदी झाले
परी आज ये भूवरी ही जशी

आर्जवी होवोनी मी त्यास पुसले
नेशील का रे इच्छीत स्थळी
देईन तुजला योग्य ती बिदागी
निघू लवकरी वेळ नाही मुळी

मुर्दाड स्वरात तो मजसी वदला
मार्ग माझा वेगळाला असे
वाहन तुम्ही दुसरे पहावे
वेळ ना मज मी जातो कसे

म्हटले तया का हो निष्ठूर होता
असे आडवाट अन् वाहनेही कमी
उशीर होईल कामास जाण्या
दुजी मिळेल रिक्षा ही नाही हमी

परोपरी मी विनविले तयासी
देईन पैसे ज्यादा ही मी

विषय: 

संगीतक हे नवे( रिक्षावाला व मी)

Submitted by अश्विनीमामी on 7 September, 2016 - 02:42

सूत्रधारः

नमस्कार, आदाब, गुड मॉर्निन्ग.

तर रसिकहो. जमाना बदलला,
डायनासोर गेले डास राहिले.
पंत गेले राव गेले.
शुक्ल अन श्रिवास्तव आले.
थालीपीठ गेले अन बर्गर आले

एक उत्साही आवाजः हो वॉफल्स व क्रीम सुद्धा आले..

ट्रिंग ट्रिंग फोन जाउन स्मार्ट फोन आला.
नौवारी सहावारी पाचवारी ब्यागेत बंद झाले..

प्रेक्षकातून आडून आवाजः तरीही दुपारी दोन ते चार बंदच राहिले चितळे.

सूत्रधारः

हे बघा, नका करू युध्द सुरू
जीवनातला बारक्या लढाया जिंकून आम्ही
पुरून उरू.......

विषय: 
Subscribe to RSS - संगीतक हे नवे