’संगीतक हे नवे’ - रिक्शावाला आणि मी!
Submitted by कविन on 12 September, 2016 - 03:47
(ओ डिजेवाले बाबु मेरा गाना चला दो गाना चला दो गाणं वाजत होतं रिक्षात आणि मी त्याला स्टेशनवर यायला विनवत होतो तेव्हाचा आमचा संवाद... इंपॅक्ट अर्थात त्यावेळी वाजत असलेल्या गाण्याचा)
मी:
रिक्षावाले काका, मला ठेशनात सोडा ना
ठेशनात सोडा ना, ठेशनात सोडा ना
रिक्षावाले काका, मला ठेशनात सोडा ना
ओ रिक्षावाऽऽले, जरा लवकर तुम्ही चला नाऽ
माझी लोकल निघून जाईल नाऽ
ओ रिक्षावाऽऽले
रिक्षावाला :
ओऽय कॉलरवाले भाऊ, जरा दमान घे रे
खालीपिली डोका माझा नक्को खाऊ रे
शेअर नाय भेटला तर मी नाय नेणार रे
भेज्यात तुझ्या तू हे फ़िट करुन घे रे
ओऽय कॉलरवाले भाऊ जरा दमान घे रे
शब्दखुणा: