खालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने इकडे आलो आहे.अाता सर्वजण गणेश आगमनाच्या तयारीत असतील.त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो.
1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल?
2)संगीतकार यशवंत देव यांनी मल्याळी गायक के जे येसुदास यांच्याकडून गाऊन घेतलेलं "शब्दमाळा पुरेशा न होती स्पर्श सारेच सांगून जातो" हे सुप्रसिध्द गीत Mp 3 किंवा व्हिडिओ स्वरुपात आंजावर किंवा कोणाकडे मिळेल का?किंवा
खाली दिलेल्या लिंकवर ते आहे.
https://m.youtube.com/watch?v=GXVzBI34h4E
पण दर्जा खराब आहे.खरखर ऐकू येते.ते कोणते software वापरुन ते सुश्राव्य करता येईल?
3)खुप पूर्वी ईटीव्ही मराठीवर सुनिल बर्वे,रविंद्र मंकणी,रसिका जोशी,सुलभा देशपांडे यांची "भुमिका" नावाची मालिका लागायची.याचं शीर्षक संगीत नरेंद्र भिडे यांनी केलं होतं ते Mp3 स्वरुपात आंजावर कुठे मिळेल?
4)छ.शिवाजी महाराजांनी तमिळनाडूतील तंजावर पर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता.त्यांच्याबरोबर शेकडो मराठी कुटूंबे वेगवेगळ्या कार्यासाठी त्यांच्याबरोबर तिकडे गेली;तिथेच राहिली.
त्यांनी तिकडे मराठी भाषा,संस्कृती अद्यापही जपली आहे.यावर मुंबई दुरदर्शनने चेन्नई दुरदर्शनच्या सहकार्याने एक व्हिडीओ रिपोर्ट बनवला होता.तो आंजावर कुठे मिळेल?
5)
हा प्रश्न मायबोलीच्या धोरणात बसत नसल्याने संपादीत केला - वेबमास्तर
6)नाना पाटेकर दीप्ती नवल यांचा सुर्योदय नावाचा मराठी चित्रपट आहे(1991)यात "समदी दुनिया आमची" अशा नावाचं एक सुंदर गाणं अाहे.संगीतकार बहुधा देवदत्त साबळे.ते गाणं अांजावर कुठे मिळेल?
विशेष म्हणजे या सिनेमाचा उल्लेख नानांच्या विकिपेजवर नाही.
7)कृष्णमुर्ती ज्योतिष पध्दतीचे जनक प्रोफेसर के एस कृष्णमुर्ती यांनी या पध्दतीच्या प्रसारार्थ मलेशिया देशाचा दौरा केला होता.त्यावेळी त्यांनी मलेशियाच्या दूरदर्शनवरून एक व्याख्यान दिले होते.याचा व्हिडीओ कुठे मिळेल?त्यांचा हा एकमेव व्हिडिओ असावा असा अंदाज आहे.
सर्वांना उद्यापासून येणार्या गणेशागमनाच्या शुभेच्छा!!
क्रमांक ५ वरचा प्रश्न
क्रमांक ५ वरचा प्रश्न अप्रत्यक्षरित्या जाहिरात करणारा असल्याने काढून टाकला आहे.
केअशु, ही लिंक मायबोलीच्या
केअशु,
ही लिंक मायबोलीच्या धोरणात बसत नसल्याने पुन्हा काढली आहे. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. या व्हिडियोची प्रसिद्धी करायची असल्यास पैसे देऊन मायबोलीच्या जाहिरात सेवेचा वापर करता येईल.
आपणास जी माहीती,गाणी हवी
आपणास जी माहीती,गाणी हवी आहेत ती आंतरजालावर मिळण्याची शक्यता फार कमी आहे.या गाण्या संबंधीत व्यक्ती फेसबुकावर असल्यास त्यांच्याशी संपर्क केल्यास कदाचीत आपल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
सिंधुताई सपकाळांच्या आश्रमाचा
सिंधुताई सपकाळांच्या आश्रमाचा पत्ता कोणी सांगेल काय? मायबोली वर तीन लेख सापडले आणि प्र्त्येक लेखात वेगळा पत्ता आहे. २०११ मधील लेखात खालील पत्ता आहे -
सन्मती बालनिकेतन संस्था
शिवराज कॉम्प्लेक्स, बी-१, पहिला मजला,
मोईनतारा हॉस्पिटलच्या जवळ,
आशिर्वाद मोटर ड्रायव्हिंग स्कूल च्या वर,
हडपसर, पुणे - ४११ ०२८.
फोन नं : ०२०-२६८७०४०३, ९८८१३३७९१४.
ही माहिती बरोबर आहे का?