विवेकाला फाशी दिली होती तेव्हाची गोष्ट - श्री. नितीन चव्हाण
समाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी लढा देणार्या, जनजागृतीचे प्रयत्न करणार्या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची पुराणमतवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतरचा धार्मिक उन्माद यांनी पुरोगाम्यांनाच नव्हे, तर सर्वच शांतताप्रेमी नागरिकांना अस्वस्थ केलं.