मौज
यंदाच्या (२०१४) 'मौज' व 'इत्यादी' दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका
दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोलीच्या खरेदीविभागातून तुम्ही दर्जेदार दिवाळी अंक विकत घेऊ शकता.
कुठले अंक विकत घ्यायचे, हे ठरवणं सोपं जावं, म्हणून काही महत्त्वाच्या अंकांच्या अनुक्रमणिका आपण मायबोलीवर प्रसिद्ध करणार आहोत.
एक दर्जेदार अंक म्हणून 'मौज'च्या दिवाळी अंकाची ख्याती आहे.
यंदाच्या 'मौजे'च्या अंकात -
ढग
चराचराला पोटात थिजवून
हा राखाडी ढग स्थिर - नक्षीदार पेपरवेट सारखा.
आगगाडीच्या वाऱ्याने
नाईलाजाने अंग घुसळवणारी ही चिंब ताठर झुडुपं,
ढगाला बोचकारत.
तितक्याच स्तब्धपणे
हे न्याहाळणारी मागची झाडांची रांग
हिरव्या पानांवरची राखाडी बुरशी सोसत.
त्याहीमागची
डोळ्यांवर ढग ओढून निश्चल
ढगाच्या आरपार बघण्यातला फोलपणा जाणवून.
ढगाला थोपवण्यासाठी
जमून आलेलं नदीचं घट्ट पाणी,
पृष्ठभागावरचा दाब, सतत इकडून तिकडे सरकवत, पेलणारं.
चराचराला व्यापून
फक्त अवाढव्य श्यामल ढग आहे.
अवाढव्य श्यामल ढग - फक्त आहे.