एका आत्महत्या पंथाची अखेर : पुस्तक
गावोगावी उगवलेले बुवा-बाबांचे पीक, त्यांनी केलेली फसवणूक, नरबळी, लूट या गोष्टी आपल्याला नवीन नाहीत. किंबहुना आपला देश 'फॉरेन' च्या तुलनेत किती अंधश्रद्ध नि मागासलेला आहे हे दाखवायला अनेक लोक उत्सुक असतात पण असा अंधविश्वासू वर्ग अगदी अमेरिकेतही अस्तित्वात होता, आहे आणि असतो हे अगदी ठळकपणे दाखवून देणारे 'एका आत्महत्या पंथाची अखेर' हे पुस्तक आहे. ज्येष्ठ पत्रकार, 'सकाळ'चे माजी संपादक विजय कुवळेकर यांनी अतिशय अभ्यासपूर्वक आणि तपशीलवार लिहिलेले हे पुस्तक वाचले तेव्हा अक्षरशः चक्रावून गेलो होतो.