समस्त मायबोलीकर,
आपणास कळविण्यास आनंद होतो कि ,आमचे सासरे स्वर्गीय. हरिहरराव देशपांडे यांचे द्वारा लिखित सन १९२८ ते १९६१ ह्या कालावधीत प्रकाशित सहा पुस्तकांचे ---
पुनर्मुद्रण व प्रकाशन सोहळा -- शनिवार दि. १२ जुलै २०१४-- गुरुपोर्णिमा --या मुहुर्तावर सकाळी १० -३० वा. आयोजित केला आहे. आपण सर्व या कार्यक्रमास आमंत्रित आहात. सोबत पत्रिका पाठवते आहे.
कै. हरिहर वामन देशपांडे लिखित सहा पुस्तक
१]अवनतीमय भारत,
२]दोन प्रख्यात युद्धतंत्रे,
३]राजपुत संस्क्रुती,
४]राजपुत राज्यांचा उदय व र्हास,
५]१८५७च्या वीर महिला,
६]शिखांचा शत-सांवत्सरिक इतिहास
कै. ह. वा. देशपांडे [१९०५ - १९६५] हे विदर्भातील एक सुविख्यात बहुआयामी व्यक्तिमत्व होते. स्वातंत्रसेनानी, कुशल संघटक,लेखक, पत्रकार, शिक्षण व शारीरिक शिक्षंणात तरबेज बहुश्रुत वक्ता, राजकीय विश्लेशक, आयुर्वेद, इतिहास, धर्मकारण इ. विषयाचे गाढे अभ्यासक व संशोधक, संस्क्रुत, मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांवर प्रभुत्व, स्थानिक स्तरापासुन तर आंतररास्ट्रीय स्तरापर्यंत जनसंपर्क ठेवणारे अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख तत्कालिन समाजाला होती. विविध विषयां वरील त्यांचे समयोचित व विपुल लिखाण काळाच्या ओघात विलुप्त होण्यापुर्वी व आजही ज्याची महत्ता यत्किंचितहि कमी झाली नसतांना पुन्हा एकदा तरुंण पिढीच्या वाचन व चिंतनासाठी उपलब्ध करुन द्यावे व त्यांचा साहित्य सुगंध दरवळत रहावा या उद्देशाने त्यांच्या काही पुस्तकांचे पुनर्मुद्रण व काही हस्तलिखितांचे प्रथम प्रकाशन करण्याचे
उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
सहर्ष निमंत्रण
Submitted by प्रभा on 5 July, 2014 - 13:31
ठिकाण/पत्ता:
श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ-- अमरावती
माहितीचा स्रोत:
ह. व्या. प्र. मं
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, July 11, 2014 - 21:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कार्यक्रमासाठी खुप खुप
कार्यक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा. निमंत्रणा बद्दल आभार.
आपल्या श्वशुरांच्या कार्याची चांगली ओळख करुन दिली आहे.
प्रभाताई, धन्यवाद आणि
प्रभाताई, धन्यवाद आणि शुभेच्छा
प्रभाताई, धन्यवाद आणि
प्रभाताई, धन्यवाद आणि शुभेच्छा>>..+१
वेल- कम
वेल- कम